
सांधेदुखी
5
Answer link
संधिवात
सांधेदुखी (Joint Pain) किंवा सांध्यांना सूज येणं याला याला वैद्यकीय भाषेत 'आर्थरायटीस' असं म्हटलं जातं.
सोप्या किंवा सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, 'आर्थरायटीस' म्हणजे संधिवात.
तज्ज्ञांच्या मते, भारतात 15 टक्के म्हणजे जवळपास 180 दशलक्ष लोकं 'आर्थरायटीस'च्या समस्येने ग्रस्त आहेत. वाढतं वय आणि शरीराची झीज झाल्यामुळे होणारा हा आजार आहे.
जेवणाची वेळ कोणती आहे यावरून ठरतो तुमच्या कंबरेचा घेर...
तुम्ही काय खाताय यावर तुमचं मानसिक आरोग्य अवलंबून आहे का?
तुमच्या ताटात किती रंगांचे पदार्थ असतात?
पण, संधिवात म्हणजे काय? महिलांना संधिवात जास्त का होतो? संधिवात होण्याचं कारण काय? World Arthritis Day च्या निमित्ताने आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आर्थरायटीस म्हणजे काय?
शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला 'आर्थरायटीस' किंवा संधिवात म्हणतात.
हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची नाकारता येत नाही.
'आर्थरायटीस'मध्ये सांधे (joints), सांध्यांच्या आसपास असणाऱ्या पेशी, आणि इतर कनेक्टिव्ह पेशींना इजा होते.
'आर्थरायटीस'मध्ये नेमकं काय होतं?
अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपल्या शरीरातील दोन सांध्यांमध्ये एक द्रव पदार्थ असतो. हा थर सांध्यांना एकमेकांवर घासण्यापासून सुरक्षा देतो.
मुंबईतील 'आर्थरायटीस' आणि ज्वॉइंट रिप्लेसमेंटतज्ज्ञ डॉ. प्रदीप भोसले सांगतात, "आर्थरायटीसमध्ये सांध्यांमधील जागा कमी होते. सांध्यांमधील द्रव पदार्थाचं प्रमाण कमी होत जातं."
संधिवात
यामुळे सांधे जास्त संवेदनाक्षम बनतात आणि त्यांचं हळूहळू डी-जनरेशन होण्यास सुरूवात होते.
ते पुढे म्हणाले, "कार्डिलेजची धक्का सहन करण्याची क्षमता (Shock Absorbing) कमी झाल्यामुळे सांधे एकमेकांवर घासण्याचं प्रमाण वाढतं." सांधे सातत्याने एकमेकांवर घासल्यामुळे किंवा घर्षणामुळे कार्टिलेजला सूज येते किंवा त्यांची ताठरता वाढते.
संधिवाताचे प्रकार कोणते?
अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आर्थरायटीसचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत.
अॅन्कलूझिंग स्पॉन्डिलोसिस, ऑस्टेओ-आर्थरायटीस, रुमेटाईड आर्थरायटीस, लहान मुलांमध्ये आढळून येणारा इडिओपॅथीक आर्थरायटीस, रिअॅक्टिव्ह आर्थरायटीस, सेप्टिक आर्थरायटीस, गाऊट आणि पॉली आर्थरायटीस इत्यादी.
पण यातील ऑस्टेओ-आर्थरायटीस आणि रुमेटाईड आर्थरायटीस हे दोन प्रकार भारतात सामान्यत: बहुतांश रुग्णांमध्ये आढळून येतात.
संधिवाताची लक्षणं काय?
सांध्यांमध्ये सातत्याने तीव्र वेदना जाणवत असतील तर, आर्थरायटीसची सुरूवात असण्याची शक्यता असते. वारंवार उद्भवणाऱ्या सांधेदुखीकडे वेळीच लक्ष दिलं नाही. तर, ही समस्या गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संधिवाताच्या प्रकारानुसार याची विविध लक्षणं दिसून येतात. पण, आर्थरायटीसची प्रमुख पाच लक्षणं आहेत.
सांधेदुखी
सांध्यांमध्ये जाणवणारी ताठरता (stiffness)
सूज
सांध्यांजवळचा भाग लाल होणं
चालण्या-फिरण्यात किंवा हालचाल करण्यात येणारा अडथळा
रुमेटाईड आर्थरायटीस म्हणजे काय? त्याची लक्षणं कोणती?
रुमेटाईड आर्थरायटीसला सामान्य भाषेत आपण संधिवात म्हणून ओळखतो. रुमेटाईड आर्थरायटीस अनेक लोकांमध्ये आढळून येतो.
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संदिप भोसले सांगतात, "यामध्ये शरीरातील अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये ताठरता (stiffness) जाणवतो. सर्वांत महत्त्वाचं कोणत्याही वयोगटात हा आजार होऊ शकतो."
संधिवात
वेळीच निदान आणि उपचार करण्यात आले तर, रुमेटाईड आर्थरायटीस बरा होऊ शकतो. पण यासाठी अनेक वर्ष औषध घ्यावी लागतात.
फोर्टिस रुग्णालयाच्या अस्थिरोग आणि ज्वॉइंट रिप्लेसमेंट विभागाचे संचाल डॉ. कौशल मल्हान यांनी रुमेटाईड आर्थरायटीसच्या लक्षणांबद्दल माहिती दिली.
सांध्यांना आलेली सूज
थकवा, ताप किंवा कमी झालेली भूक
सांध्यांमध्ये येणारा ताठरता
तीव्र सांधेदुखी आणि सांध्यांचा भाग लाल होणं
डीप्रेशन
अनेक सांधे दुखणं
डॉ. मल्हान पुढे सांगतात, "रुमेटाईड आर्थरायटीसने ग्रस्त अनेक रुग्णांमध्ये सांधेदुखीपेक्षा वेगळी लक्षणं दिसून येतात." सांधे नसलेल्या कोणत्या अवयवात रुमेटाईड आर्थरायटीसची लक्षणं दिसून येतात. याची ते पुढे माहिती देतात.
त्वचा, डोळे
फुफ्फुस, हृदय आणि किडनी
लाळ ग्रंथी, बोन मॅरो
रक्तवाहीन्या
गुडघे, हात आणि बोटांमध्ये रुमेटाईड आर्थरायटीस जास्त होण्याची शक्यता असते.
या आजारात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चुकीने शरीरातीलच पेशींवर हल्ला करण्यास सुरूवात करते. त्यामुळे सांध्यांच्या लाईनिंगला इजा होते.
ऑस्टेओ-आर्थरायटीसचा धोका कोणाला?
भारतात सामान्यत: लोकांना होणारा दुसऱ्या प्रकारचा आर्थरायटीस म्हणजे ऑस्टेओ-आर्थरायटीस.
वाढणारं वय, शरीराची हालचाल आणि शरीराची होणारी झीज या कारणांमुळे ऑस्टेओ-आर्थरायटीस होतो. प्रामुख्याने वयाच्या पन्नाशीनंतर अनेकांना हा आजार होतो.
डॉ. सचिन भोसले म्हणतात, "गुडघे शरीराचं संपूर्ण वजन पेलतात. सांध्यांची झीज झाल्यामुळे गुडघ्यांना सर्वात आधी त्रास होण्याची शक्यता असते."
काही लोकांमध्ये हा आजार इतका बळावतो की, गुडघे बदलाची शस्त्रक्रिया (Knee Replacement) करावी लागते.
लहानपणापासूनच योग्य काळजी घेतली तर, ऑस्टेओ-आर्थरायटीसपासून बचाव करता येऊ शकतो. पण, यासाठी वजनावर नियंत्रण आणि दररोज व्यायाम गरजेचा आहे.
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मल्हान म्हणाले, पुरूषांच्या तुलनेत ऑस्टेओ-आर्थरायटीसग्रस्त महिलांना अत्यंत तीव्र वेदना होतात.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार भारतात 22 ते 39 टक्के लोक ऑस्टेओ-आर्थरायटीसने ग्रस्त आहेत.
आर्थरायटीसचा प्रकार गाऊट म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, अति-जास्त प्रमाणात मांसाहार आणि मद्यपान करणाऱ्यांना या आर्थरायटीसचा धोका जास्त आहे.
, "यात शरीरात मोठ्या प्रमाणात युरिक अॅसिड तयार होतं. ज्यामुळे सांधे आणि हृदयावर परिणाम होतो. किडनी विकार आणि काही आजारांमुळे गाऊट होण्याची शक्यता असते."
संधिवात
योग्य प्रमाणात अन्नाचं सेवन केल्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्याने झालेल्या या आर्थरायटीसवर नियंत्रण ठेवता येतं
लहान मुलांमध्ये आढळणारा इडिओपॅथीक आर्थरायटीस काय आहे?
तज्ज्ञ म्हणतात, लहान मुलांमध्ये आढळून येणारा इडिओपॅथीक आर्थरायटीसची लक्षणं वयाच्या 16 व्या वर्षाआधी दिसून येतात.
, "हा आजार रोगप्रतिकार शक्तीशी निगडीत आहे. संसर्ग आणि जीवाणूंवर हल्ला करण्याऐवजी निघालेल्या 'फ्लेमेबल सिंथेटीक द्रव पदार्थ'मुळे पेशींचं नुकसान होतं."
हा द्रव पदार्थ सांध्यांना नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. सांध्यांचा भाग लाल होतो आणि अवयवांची हालचाल कठीण होते.
इडिओपॅथीक आर्थरायटीसची लक्षणं
रॅश
भूक लागण्याचं प्रमाण कमी
खूप ताप
सांध्यांना सूज येणं किंवा सांधे गरम होणं
डोळ्यांनी कमी दिसू लागणं
16 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला सांध्यात महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त दुख़त असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे.
, "लहान मुलांमधील इडिओपॅथीक आर्थरायटीसवर काही ठोस उपाय नाहीत. रुग्णांना होणारी वेदना कमी करणं हाच उपाय आहे. यामुळे विविध उपाययोजनांचा वापर करून तात्काळ उपचार सुरू केले पाहिजेत."
इडिओपॅथीक आर्थरायटीसवरील उपचारात खालील गोष्टी प्रमुख आहेत.
सांधे आणि अवयवांमध्ये जाणवणाऱ्या तीव्र वेदनेचं नियंत्रण
अवयवांची हालचाल योग्य होत राहिल याची काळची घेणं
महिलांना रुमेटाईड आर्थरायटीसचा धोका जास्त का आहे?
पुरुषांच्या तूलनेत महिलांमध्ये आर्थरायटीचं प्रमाण जास्त आहे.
"पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये रुमेटाईड आर्थरायटीसचं प्रमाण तीन पट जास्त आहे. महिलांना लहान वयातच हा आजार होतो," तज्ज्ञ पुढे म्हणतात.
आर्थरायटीस असलेल्या महिलांना तीव्र वेदना होतात आणि त्यांना रुमेटाईड आर्थरायटीसचा धोका अधिक आहे.
संधिवात
फोटो स्रोत,GETTY IMAGES
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात 60 वर्षांवरील 18 टक्के महिलांमध्ये आर्थरायटीसची लक्षणं आहेत. तर, संधिवाताची लक्षणं असलेल्या पुरूषांचं प्रमाण 9.6 टक्के आहे.
रुमेटाईड आर्थरायटीसचा त्रास महिलांना जास्त का होतो, याची कारणं डॉ. मल्हान पुढे सांगतात,
महिलांची रोगप्रतिकार शक्ती रिअॅक्टिव्ह असल्याने त्यांना रोगप्रतिकार शक्तीशी निगडीत आजार पुरूषांपेक्षा जास्त होतात
हॉर्मोन्समुळे रुमेटाईड आर्थरायटीसचा धोका वाढतो. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन्सची लेव्हल मासिक पाळी, गर्भावस्था आणि मेनोपॉजमध्ये सतत बदलत असते
महिलांची हिप (Hip) रुंद असल्यामुळे गुडघ्यांच्या अलाइनमेंटवर परिणाम होतो. त्यामुळे झीज जास्त झाल्याने तीव्र वेदना होतात
गर्भवती महिलांमध्ये गर्भावस्थेत रुमेटाईड आर्थरायटीसची लक्षणं दिसून येत नाहीत. पण बाळाच्या जन्मानंतर लक्षणं दिसू लागतात.
दोन वर्षं स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये या आजाराचा धोका 50 टक्के कमी होतो, असं तज्ज्ञ म्हणतात.
गर्भवती महिलांचं वजन वाढलेलं असतं. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना होतात. अशा महिलांना गुडघा, मणका आणि पाठीत तीव्र वेदना सुरू होतात.
अॅन्कलूझिंग स्पॉन्डिलोसिस काय आहे?
युवा वर्गात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा हा आर्थरायटीसचा एक प्रकार आहे. यामध्ये मणक्यात तीव्र वेदना किंवा सूज येते.
अॅन्कलूझिंग स्पॉन्डिलोसिसची लक्षणं वयाच्या तिशीच्या आधीच दिसून येतात. मणक्यात ताठरता आणि पाठदुखी ही प्रमुख लक्षणं आहेत.
हिप, गुडघे, खांदेदुखी तर काही रुग्णांमध्ये डायरिया, वजन अचानक कमी होणं आणि डोळ्याच्या दुसऱ्या लेअरमध्ये सूज येणं अशी लक्षणं दिसून येतात.
या रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी, शरीराची हालचाल योग्य सुरू राहण्यासाठी आणि आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी उपचार देण्यात येतात.
शारीरिक हालचाल महत्त्वाची का आहे?
तज्ज्ञ सांगतात आर्थरायटीसने ग्रस्त अनेक रुग्ण दैनंदिन कामं करता येत नाहीत अशी तक्रार करतात.
आर्थरायटीसने ग्रस्त रुग्णांना शरीराची हालचाल थांबवावी? अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप भोसले म्हणतात, "रुग्णांनी हालचाल अजिबात बंद करू नये. आर्थरायटीस असला तरी शरीराची हालचाल अत्यंत महत्त्वाची आहे. "
आर्थरायटीसमुळे सांध्यात कायमची ताठरता निर्माण झाली तर, दैनंदिन काम करताना अडथळा निर्माण होऊ शकतो.
फिजिओथेरपी आणि व्यायामामुळे सांध्यातील ताठरता कमी होण्यास मदत होते आणि सांध्यांची हालचाल सुधारते.
आर्थरायटीस असेल तर या गोष्टी जरूर करा
अस्थिरोगतज्ज्ञांशी चर्चा करून दिर्घकाळ व्यायाम किंवा उपचार पद्धत आखून घ्या
शरीराची हालचाल करत रहा. तुमची काम थांबवू नका. तीव्र वेदना होत असतील तरी देखील व्यायाम आणि रोजची काम सुरू ठेवा
रोज थोडा वॉक, स्ट्रेचिंग आणि स्नायूंना बळकट करण्याचा प्रयत्न करा
शरीराची रोज हालचाल केल्यामुळेच आपण या आजाराचा सामना करू शकतो.
0
Answer link
सांधेदुखी (संधिवात) या आजारावर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
घरगुती उपाय:
- हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे तत्व असते, ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. दूधात हळद मिसळून प्यायल्याने सांधेदुखी कमी होते. संशोधन (इंग्रजी)
- आले: आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने किंवा आल्याचा रस लावल्याने सांधेदुखी कमी होते. arthritis.org (इंग्रजी)
- मेथी: मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.
- लसूण: लसणामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. लसूण खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते.
- सफरचंद व्हिनेगर: सफरचंद व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. एक ग्लास पाण्यात दोन चमचे सफरचंद व्हिनेगर मिसळून प्यायल्याने सांधेदुखी कमी होते.
औषधोपचार:
- वेदना कमी करणारी औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदना कमी करणारी औषधे घ्यावीत.
- स्टेरॉईड्स: सांधेदुखी जास्त असल्यास डॉक्टर स्टेरॉईड्स देऊ शकतात.
- इतर औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर औषधे घ्यावीत.
इतर उपाय:
- व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने सांधेदुखी कमी होते.
- वजन कमी करणे: वजन जास्त असल्यास सांध्यांवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे सांधेदुखी वाढते. त्यामुळे वजन कमी करणे फायदेशीर ठरते.
- फिजिओथेरपी: फिजिओथेरपीच्या मदतीने सांधेदुखी कमी करता येते.
- शस्त्रक्रिया: काही गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
2
Answer link
आयुर्वेदिक गोळी 100% अराम
7 day
गुढगे दुखी , कंबर दुखी, गाठीया वात, सायटीका, जोडो का दर्द, =: - पथ्य पालणे -:= उडद डाळ, डालडा, भात, लोणचं, वांगे, मिरची, तळलेले पदार्थ, आंबट वस्तू. या सर्व वस्तू दवाई चालु असतानी खायच्या नाही
1]ही जडी बुटी चालू असतानी कोणत्याही दुखण्याची गोळी खायची नाही. 2] पॅकेट ला खोलल्या नंतर हवाबंद डब्यात ठेवणे. 3] पॅकेट कोरड्या जागी ठेवा. 4] ही गोळी जेवणानंतर घेने. 5] गोळीला चावून किंवा ठेचून खाणे. 6] ही जडी बुटी खाल्ल्यानंतर दुसरी गोळी 2 तासानंतर खाऊ शकता. 7] ही गोळी लकवा वाले रुग्ण पण घेऊ शकतात..
फक्त आणि फक्त 5 ते 7 दिवसात.. हो फक्त आणि फक्त 5 ते 7 दिवसात फरक पडतो.. गुडघे दुखीला कंटाळला असाल किंवा गुडघ्याचे ऑपेरेशन करण्याची वेळ आली असेल तर चिंता करू नका..
गुडघ्याचा ऑपेरेशनने व्यक्ती बरी होत नाही तर अधू होते.. ऑपेरेशन हा अंतिम पर्याय नाही ..
तुमचे आजी-आजोबा, आई-वडील, ईतर नातेवाईक किंवा स्वतः गुडघ्याचा आजाराने त्रस्त असाल तर नक्की घेऊन बघा रिजल्ट हा अवश्य मिळतो..
आपल्या घरातील कोणाला गुडघे दुखीचा त्रास असेल तर अवश्य एकदा वापरून बघा रिजल्ट हा 100 टक्के मिळेल..
हवे असल्यास व्हॅट्स अप किंवा कॉल करा:-
डॉ. वैभव राऊत
8378863861
https://wa.me/918378863861?text=%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%20
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे:
गुडघेदुखीसाठी काही घरगुती उपाय आणि औषधोपचार खालीलप्रमाणे आहेत:
घरगुती उपाय:
- हळदीचे दूध: हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे, रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने आराम मिळतो. माय उपचार - हळदीचे दुध पिण्याचे फायदे
- मेथीचे दाणे: मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने गुडघेदुखी कमी होते.
- आले: आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने किंवा आल्याचा लेप लावल्याने आराम मिळतो.
- लसूण: लसूण खाल्ल्याने गुडघेदुखी कमी होते.
- योगा आणि व्यायाम: नियमित योगा आणि व्यायाम केल्याने गुडघेदुखी कमी होते आणि सांधे मजबूत होतात.
आयुर्वेदिक उपचार:
- त्रिफळा चूर्ण: त्रिफळा चूर्ण घेतल्याने सांध्यांमधील सूज कमी होते.
- गुग्गुल: गुग्गुलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे गुडघेदुखी कमी होते.
- अश्वगंधा: अश्वगंधा सांध्यांना बळकट करते आणि वेदना कमी करते.
ॲलोपॅथी उपचार:
जर घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांनी आराम नाही मिळाला, तर ॲलोपॅथी डॉक्टर खालील औषधे देऊ शकतात:
- वेदना शामक (Painkillers): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक गोळ्या घ्याव्यात.
- स्टेरॉइड इंजेक्शन्स: काही प्रकरणांमध्ये, डॉक्टर स्टेरॉइड इंजेक्शन्स देण्याचा सल्ला देऊ शकतात.
इतर उपाय:
- वजन कमी करा: जास्त वजन असल्याने गुडघ्यांवर ताण येतो, त्यामुळे वजन कमी करणे फायदेशीर ठरते.
- योग्य आहार: कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्या.
- धूम्रपान टाळा: धूम्रपान केल्याने हाडे कमजोर होतात आणि गुडघेदुखी वाढू शकते.
Disclaimer: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
0
Answer link
सर्वायकल स्पॉन्डिलायटिस (Cervical spondylitis) असताना किंवा पोट/ कंबर/ सांधेदुखीचा त्रास असताना लघवीचे प्रमाण वाढल्यास दुखणे वाढू शकते का, याबद्दल निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मात्र, काही शक्यता आणि विचार पुढे मांडले आहेत:
- सर्वायकल स्पॉन्डिलायटिस (Cervical spondylitis): या आजारात मणक्यांच्या सांध्यांमध्ये घर्षण होते. त्यामुळे नसांवर दाब येऊ शकतो. याचा परिणाम मूत्राशयाच्या कार्यावर होण्याची शक्यता कमी आहे.
- पोट/कंबर/ सांधेदुखी: या दुखण्यांमध्ये लघवीच्या प्रमाणावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी असते. परंतु, काही अप्रत्यक्ष कारणे असू शकतात:
- औषधे: वेदनाशामक औषधे (Pain killers) घेतल्याने किडनीवर परिणाम होऊन लघवीचे प्रमाण वाढू शकते.
- शरीरातील पाण्याची पातळी: जास्त पाणी प्यायल्याने लघवीचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे काहीवेळा दुखणे वाढल्यासारखे वाटू शकते.
- मूत्रमार्गातील संक्रमण (Urinary Tract Infection): UTI मुळे लघवीला जास्त जावे लागते आणि दुखणे वाढू शकते.
जर तुम्हाला लघवीच्या प्रमाणात अचानक वाढ झाली असेल आणि त्यामुळे दुखणे वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते योग्य निदान करून योग्य उपचार देऊ शकतील.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीपर आहे आणि ती वैद्यकीय सल्ला नाही.
1
Answer link
गोखलेजी, कृपया या लिंकवर जाऊन त्या पानावरची माहिती वाचा. पंचकर्मबद्दल उत्तम उपाय दिलेले आहेत.
https://www.pudhari.news/news/Aarogya/Continuous-waist-unhappy-and-Ayurveda/m/
https://www.pudhari.news/news/Aarogya/Continuous-waist-unhappy-and-Ayurveda/m/