सांधेदुखी फरक रोग आणि उपचार आरोग्य

संधिवात, सांधेदुखी व सर्व्हायकल स्पाँन्डिलायटिस या तिघात काय फरक आहे?

2 उत्तरे
2 answers

संधिवात, सांधेदुखी व सर्व्हायकल स्पाँन्डिलायटिस या तिघात काय फरक आहे?

5

संधिवात

सांधेदुखी (Joint Pain) किंवा सांध्यांना सूज येणं याला याला वैद्यकीय भाषेत 'आर्थरायटीस' असं म्हटलं जातं.

सोप्या किंवा सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, 'आर्थरायटीस' म्हणजे संधिवात.

तज्ज्ञांच्या मते, भारतात 15 टक्के म्हणजे जवळपास 180 दशलक्ष लोकं 'आर्थरायटीस'च्या समस्येने ग्रस्त आहेत. वाढतं वय आणि शरीराची झीज झाल्यामुळे होणारा हा आजार आहे.

जेवणाची वेळ कोणती आहे यावरून ठरतो तुमच्या कंबरेचा घेर...
तुम्ही काय खाताय यावर तुमचं मानसिक आरोग्य अवलंबून आहे का?
तुमच्या ताटात किती रंगांचे पदार्थ असतात?
पण, संधिवात म्हणजे काय? महिलांना संधिवात जास्त का होतो? संधिवात होण्याचं कारण काय? World Arthritis Day च्या निमित्ताने आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आर्थरायटीस म्हणजे काय?
शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला 'आर्थरायटीस' किंवा संधिवात म्हणतात.

हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची नाकारता येत नाही.

'आर्थरायटीस'मध्ये सांधे (joints), सांध्यांच्या आसपास असणाऱ्या पेशी, आणि इतर कनेक्टिव्ह पेशींना इजा होते.

'आर्थरायटीस'मध्ये नेमकं काय होतं?
अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपल्या शरीरातील दोन सांध्यांमध्ये एक द्रव पदार्थ असतो. हा थर सांध्यांना एकमेकांवर घासण्यापासून सुरक्षा देतो.

मुंबईतील 'आर्थरायटीस' आणि ज्वॉइंट रिप्लेसमेंटतज्ज्ञ डॉ. प्रदीप भोसले सांगतात, "आर्थरायटीसमध्ये सांध्यांमधील जागा कमी होते. सांध्यांमधील द्रव पदार्थाचं प्रमाण कमी होत जातं."

संधिवात

यामुळे सांधे जास्त संवेदनाक्षम बनतात आणि त्यांचं हळूहळू डी-जनरेशन होण्यास सुरूवात होते.

ते पुढे म्हणाले, "कार्डिलेजची धक्का सहन करण्याची क्षमता (Shock Absorbing) कमी झाल्यामुळे सांधे एकमेकांवर घासण्याचं प्रमाण वाढतं." सांधे सातत्याने एकमेकांवर घासल्यामुळे किंवा घर्षणामुळे कार्टिलेजला सूज येते किंवा त्यांची ताठरता वाढते.

संधिवाताचे प्रकार कोणते?
अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आर्थरायटीसचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत.

अॅन्कलूझिंग स्पॉन्डिलोसिस, ऑस्टेओ-आर्थरायटीस, रुमेटाईड आर्थरायटीस, लहान मुलांमध्ये आढळून येणारा इडिओपॅथीक आर्थरायटीस, रिअॅक्टिव्ह आर्थरायटीस, सेप्टिक आर्थरायटीस, गाऊट आणि पॉली आर्थरायटीस इत्यादी.

पण यातील ऑस्टेओ-आर्थरायटीस आणि रुमेटाईड आर्थरायटीस हे दोन प्रकार भारतात सामान्यत: बहुतांश रुग्णांमध्ये आढळून येतात.

संधिवाताची लक्षणं काय?
सांध्यांमध्ये सातत्याने तीव्र वेदना जाणवत असतील तर, आर्थरायटीसची सुरूवात असण्याची शक्यता असते. वारंवार उद्भवणाऱ्या सांधेदुखीकडे वेळीच लक्ष दिलं नाही. तर, ही समस्या गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संधिवाताच्या प्रकारानुसार याची विविध लक्षणं दिसून येतात. पण, आर्थरायटीसची प्रमुख पाच लक्षणं आहेत.

सांधेदुखी
सांध्यांमध्ये जाणवणारी ताठरता (stiffness)
सूज
सांध्यांजवळचा भाग लाल होणं
चालण्या-फिरण्यात किंवा हालचाल करण्यात येणारा अडथळा
रुमेटाईड आर्थरायटीस म्हणजे काय? त्याची लक्षणं कोणती?
रुमेटाईड आर्थरायटीसला सामान्य भाषेत आपण संधिवात म्हणून ओळखतो. रुमेटाईड आर्थरायटीस अनेक लोकांमध्ये आढळून येतो.

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संदिप भोसले सांगतात, "यामध्ये शरीरातील अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये ताठरता (stiffness) जाणवतो. सर्वांत महत्त्वाचं कोणत्याही वयोगटात हा आजार होऊ शकतो."

संधिवात

वेळीच निदान आणि उपचार करण्यात आले तर, रुमेटाईड आर्थरायटीस बरा होऊ शकतो. पण यासाठी अनेक वर्ष औषध घ्यावी लागतात.

फोर्टिस रुग्णालयाच्या अस्थिरोग आणि ज्वॉइंट रिप्लेसमेंट विभागाचे संचाल डॉ. कौशल मल्हान यांनी रुमेटाईड आर्थरायटीसच्या लक्षणांबद्दल माहिती दिली.

सांध्यांना आलेली सूज
थकवा, ताप किंवा कमी झालेली भूक
सांध्यांमध्ये येणारा ताठरता
तीव्र सांधेदुखी आणि सांध्यांचा भाग लाल होणं
डीप्रेशन
अनेक सांधे दुखणं
डॉ. मल्हान पुढे सांगतात, "रुमेटाईड आर्थरायटीसने ग्रस्त अनेक रुग्णांमध्ये सांधेदुखीपेक्षा वेगळी लक्षणं दिसून येतात." सांधे नसलेल्या कोणत्या अवयवात रुमेटाईड आर्थरायटीसची लक्षणं दिसून येतात. याची ते पुढे माहिती देतात.

त्वचा, डोळे
फुफ्फुस, हृदय आणि किडनी
लाळ ग्रंथी, बोन मॅरो
रक्तवाहीन्या
गुडघे, हात आणि बोटांमध्ये रुमेटाईड आर्थरायटीस जास्त होण्याची शक्यता असते.

या आजारात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चुकीने शरीरातीलच पेशींवर हल्ला करण्यास सुरूवात करते. त्यामुळे सांध्यांच्या लाईनिंगला इजा होते.

ऑस्टेओ-आर्थरायटीसचा धोका कोणाला?
भारतात सामान्यत: लोकांना होणारा दुसऱ्या प्रकारचा आर्थरायटीस म्हणजे ऑस्टेओ-आर्थरायटीस.

वाढणारं वय, शरीराची हालचाल आणि शरीराची होणारी झीज या कारणांमुळे ऑस्टेओ-आर्थरायटीस होतो. प्रामुख्याने वयाच्या पन्नाशीनंतर अनेकांना हा आजार होतो.

डॉ. सचिन भोसले म्हणतात, "गुडघे शरीराचं संपूर्ण वजन पेलतात. सांध्यांची झीज झाल्यामुळे गुडघ्यांना सर्वात आधी त्रास होण्याची शक्यता असते."

काही लोकांमध्ये हा आजार इतका बळावतो की, गुडघे बदलाची शस्त्रक्रिया (Knee Replacement) करावी लागते.

लहानपणापासूनच योग्य काळजी घेतली तर, ऑस्टेओ-आर्थरायटीसपासून बचाव करता येऊ शकतो. पण, यासाठी वजनावर नियंत्रण आणि दररोज व्यायाम गरजेचा आहे.

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मल्हान म्हणाले, पुरूषांच्या तुलनेत ऑस्टेओ-आर्थरायटीसग्रस्त महिलांना अत्यंत तीव्र वेदना होतात.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार भारतात 22 ते 39 टक्के लोक ऑस्टेओ-आर्थरायटीसने ग्रस्त आहेत.

आर्थरायटीसचा प्रकार गाऊट म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, अति-जास्त प्रमाणात मांसाहार आणि मद्यपान करणाऱ्यांना या आर्थरायटीसचा धोका जास्त आहे.
, "यात शरीरात मोठ्या प्रमाणात युरिक अॅसिड तयार होतं. ज्यामुळे सांधे आणि हृदयावर परिणाम होतो. किडनी विकार आणि काही आजारांमुळे गाऊट होण्याची शक्यता असते."

संधिवात

योग्य प्रमाणात अन्नाचं सेवन केल्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्याने झालेल्या या आर्थरायटीसवर नियंत्रण ठेवता येतं

लहान मुलांमध्ये आढळणारा इडिओपॅथीक आर्थरायटीस काय आहे?

तज्ज्ञ म्हणतात, लहान मुलांमध्ये आढळून येणारा इडिओपॅथीक आर्थरायटीसची लक्षणं वयाच्या 16 व्या वर्षाआधी दिसून येतात.

, "हा आजार रोगप्रतिकार शक्तीशी निगडीत आहे. संसर्ग आणि जीवाणूंवर हल्ला करण्याऐवजी निघालेल्या 'फ्लेमेबल सिंथेटीक द्रव पदार्थ'मुळे पेशींचं नुकसान होतं."

हा द्रव पदार्थ सांध्यांना नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. सांध्यांचा भाग लाल होतो आणि अवयवांची हालचाल कठीण होते.

इडिओपॅथीक आर्थरायटीसची लक्षणं
रॅश
भूक लागण्याचं प्रमाण कमी
खूप ताप
सांध्यांना सूज येणं किंवा सांधे गरम होणं
डोळ्यांनी कमी दिसू लागणं
16 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला सांध्यात महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त दुख़त असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे.

, "लहान मुलांमधील इडिओपॅथीक आर्थरायटीसवर काही ठोस उपाय नाहीत. रुग्णांना होणारी वेदना कमी करणं हाच उपाय आहे. यामुळे विविध उपाययोजनांचा वापर करून तात्काळ उपचार सुरू केले पाहिजेत."

इडिओपॅथीक आर्थरायटीसवरील उपचारात खालील गोष्टी प्रमुख आहेत.

सांधे आणि अवयवांमध्ये जाणवणाऱ्या तीव्र वेदनेचं नियंत्रण
अवयवांची हालचाल योग्य होत राहिल याची काळची घेणं
महिलांना रुमेटाईड आर्थरायटीसचा धोका जास्त का आहे?
पुरुषांच्या तूलनेत महिलांमध्ये आर्थरायटीचं प्रमाण जास्त आहे.

"पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये रुमेटाईड आर्थरायटीसचं प्रमाण तीन पट जास्त आहे. महिलांना लहान वयातच हा आजार होतो," तज्ज्ञ पुढे म्हणतात.

आर्थरायटीस असलेल्या महिलांना तीव्र वेदना होतात आणि त्यांना रुमेटाईड आर्थरायटीसचा धोका अधिक आहे.

संधिवात
फोटो स्रोत,GETTY IMAGES
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात 60 वर्षांवरील 18 टक्के महिलांमध्ये आर्थरायटीसची लक्षणं आहेत. तर, संधिवाताची लक्षणं असलेल्या पुरूषांचं प्रमाण 9.6 टक्के आहे.

रुमेटाईड आर्थरायटीसचा त्रास महिलांना जास्त का होतो, याची कारणं डॉ. मल्हान पुढे सांगतात,

महिलांची रोगप्रतिकार शक्ती रिअॅक्टिव्ह असल्याने त्यांना रोगप्रतिकार शक्तीशी निगडीत आजार पुरूषांपेक्षा जास्त होतात
हॉर्मोन्समुळे रुमेटाईड आर्थरायटीसचा धोका वाढतो. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन्सची लेव्हल मासिक पाळी, गर्भावस्था आणि मेनोपॉजमध्ये सतत बदलत असते
महिलांची हिप (Hip) रुंद असल्यामुळे गुडघ्यांच्या अलाइनमेंटवर परिणाम होतो. त्यामुळे झीज जास्त झाल्याने तीव्र वेदना होतात
गर्भवती महिलांमध्ये गर्भावस्थेत रुमेटाईड आर्थरायटीसची लक्षणं दिसून येत नाहीत. पण बाळाच्या जन्मानंतर लक्षणं दिसू लागतात.

दोन वर्षं स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये या आजाराचा धोका 50 टक्के कमी होतो, असं तज्ज्ञ म्हणतात.

 गर्भवती महिलांचं वजन वाढलेलं असतं. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना होतात. अशा महिलांना गुडघा, मणका आणि पाठीत तीव्र वेदना सुरू होतात.

अॅन्कलूझिंग स्पॉन्डिलोसिस काय आहे?
युवा वर्गात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा हा आर्थरायटीसचा एक प्रकार आहे. यामध्ये मणक्यात तीव्र वेदना किंवा सूज येते.

अॅन्कलूझिंग स्पॉन्डिलोसिसची लक्षणं वयाच्या तिशीच्या आधीच दिसून येतात. मणक्यात ताठरता आणि पाठदुखी ही प्रमुख लक्षणं आहेत.

हिप, गुडघे, खांदेदुखी तर काही रुग्णांमध्ये डायरिया, वजन अचानक कमी होणं आणि डोळ्याच्या दुसऱ्या लेअरमध्ये सूज येणं अशी लक्षणं दिसून येतात.

या रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी, शरीराची हालचाल योग्य सुरू राहण्यासाठी आणि आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी उपचार देण्यात येतात.

शारीरिक हालचाल महत्त्वाची का आहे?
तज्ज्ञ सांगतात आर्थरायटीसने ग्रस्त अनेक रुग्ण दैनंदिन कामं करता येत नाहीत अशी तक्रार करतात.

आर्थरायटीसने ग्रस्त रुग्णांना शरीराची हालचाल थांबवावी? अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप भोसले म्हणतात, "रुग्णांनी हालचाल अजिबात बंद करू नये. आर्थरायटीस असला तरी शरीराची हालचाल अत्यंत महत्त्वाची आहे. "

आर्थरायटीसमुळे सांध्यात कायमची ताठरता निर्माण झाली तर, दैनंदिन काम करताना अडथळा निर्माण होऊ शकतो.

फिजिओथेरपी आणि व्यायामामुळे सांध्यातील ताठरता कमी होण्यास मदत होते आणि सांध्यांची हालचाल सुधारते.

आर्थरायटीस असेल तर या गोष्टी जरूर करा
अस्थिरोगतज्ज्ञांशी चर्चा करून दिर्घकाळ व्यायाम किंवा उपचार पद्धत आखून घ्या
शरीराची हालचाल करत रहा. तुमची काम थांबवू नका. तीव्र वेदना होत असतील तरी देखील व्यायाम आणि रोजची काम सुरू ठेवा
रोज थोडा वॉक, स्ट्रेचिंग आणि स्नायूंना बळकट करण्याचा प्रयत्न करा
 शरीराची रोज हालचाल केल्यामुळेच आपण या आजाराचा सामना करू शकतो.


उत्तर लिहिले · 18/1/2022
कर्म · 121765
0
संधिवात, सांधेदुखी आणि सर्व्हायकल स्पाँडिलायटिस यांच्यातील फरक:

1. संधिवात (Arthritis):

  • संधिवात हा एक सांध्यांचा आजार आहे. यात सांध्यांमध्ये वेदना होतात आणि सांध्यांना सूज येते.
  • संधिवात अनेक प्रकारचा असतो, जसे की ऑस्टियोआर्थरायटिस (Osteoarthritis), रूमेटॉइड आर्थरायटिस (Rheumatoid Arthritis) आणि गाउट (Gout).
  • ऑस्टियोआर्थरायटिस मध्ये, सांध्यातील कूर्चा (cartilage) झिजते, ज्यामुळे हाडे एकमेकांवर घासतात आणि वेदना होतात.
  • रूमेटॉइड आर्थरायटिस हा एक ऑटोइम्यून आजार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्या सांध्यावर हल्ला करते.

2. सांधेदुखी (Joint Pain/Arthralgia):

  • सांधेदुखी हे केवळ एक लक्षण आहे. हे लक्षण संधिवात, दुखापत किंवा इतर वैद्यकीय स्थितीमुळे उद्भवू शकते.
  • सांधेदुखी म्हणजे सांध्यांमध्ये होणारी वेदना. ही वेदना सौम्य ते तीव्र असू शकते.
  • सांधेदुखी कोणत्याही एका सांध्यात किंवा अनेक सांध्यांमध्ये एकाच वेळी होऊ शकते.

3. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस (Cervical Spondylitis):

  • सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस हा मानेच्या मणक्यांचा (vertebrae) आजार आहे.
  • या स्थितीत, मानेच्या मणक्यांमधील कूर्चा (cartilage) आणि हाडे झिजतात, ज्यामुळे मणक्यांमध्ये वेदना होतात.
  • मानेच्या दुखण्यासोबत डोकेदुखी, चक्कर येणे, हात आणि बोटांना मुंग्या येणे असे त्रास होऊ शकतात.

सारांश:

  • संधिवात हा सांध्यांचा आजार आहे, सांधेदुखी हे त्याचे लक्षण आहे, तर सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस हा मानेच्या मणक्यांचा आजार आहे.

अधिक माहितीसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

कोरोनामुळे ज्या लोकांचे जीव गेले तशा लोकांचे पोस्टमार्टम का गेले नाही त्याबद्दल आपले मत टिपा लिहा?
कुत्रा चावला तर रेबीज होईल का?
विषमज्वर कोणत्या रोगजंतूमुळे होतो?
कोरोनामुळे च्या लोकांचे जीव गेले अशा लोकांचा पोस्टमार्टम का केला गेला नाही त्याबद्दल आपले मत लिहा?
क्षयरोग हा कोणत्या जंतूमुळे होणारा रोग आहे?
टिपा लिहा कोरोनामुळे ज्या लोकांचे जीव गेले तशा लोकांचे पोस्टमार्टम का केले गेले नाही त्याबद्दल आपले मत लिहा?
पांढऱ्या पेशी कमी करणारे घटक?