अन्न पाणी पिणे आरोग्य

कमीत कमी किती लिटर पाणी रोज प्यायला पाहिजे व जास्तीत जास्त किती लिटर पाणी रोज प्यायला पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

कमीत कमी किती लिटर पाणी रोज प्यायला पाहिजे व जास्तीत जास्त किती लिटर पाणी रोज प्यायला पाहिजे?

4
मानवी शरीरामधील अधिकांश म्हणजे ६६ टक्के भाग हा जलमय आहे. साहजिकच शरीराला सर्वाधिक गरज ज्या घटकाची असते, तो म्हणजे पाणी.
सर्वसामान्य वातावरणामध्ये सर्वसाधारण निरोगी शरीरामधून २४  तासांमध्ये दीड लीटर (१५०० मिली) पाणी मूत्रविसर्जनावाटे, पाऊण लीटर (७५०मिली लीटर ) पाणी घामावाटे, ४०० मिलीलीटर पाणी बहिश्र्वसनावाटे व १५० मिली पाणी मलावाटे बाहेर फेकले जाते. या गणितानुसार  सामान्य वातावरणामध्ये  दिवसभरातून अंदाजे सात ते आठ ग्लास म्हणजे दीड लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, तो तसा योग्यच म्हटला पाहिजे.
शरद व ग्रीष्म या ऋतूंमधला उन्हाळा, हेमंत व शिशिर या ऋतूंमधला हिवाळा आणि प्रावृट व वर्षां या ऋतूंमधला पावसाळा या तीन भिन्न-भिन्न मोसमांमध्ये जलप्राशन सारखेच असावे, हा विचारच मुळात चुकीचा आहे. हिवाळा व पावसाळा या शीत ऋतूंमध्ये शरीर जेव्हा मूत्रविसर्जन वाढवून शरीरातले पाणी कमी करण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा तहानेची जाणीव कमीतकमी निर्माण करून जलप्राशन नियंत्रणात आणले जाते; याउलट ऑक्टोबरच्या व एप्रिल-मेमधल्या उन्हाळ्यामध्ये शरीर जेव्हा मूत्रविसर्जन नियंत्रणात आणून शरीरातले पाणी वाचवण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा शरीराला पाण्याची अधिक गरज असल्याने अधिकाधिक तहान लागून जलप्राशन वाढवले जाते. मात्र तहानेसारख्या मूलभूत नैसर्गिक मागणीचा विचारही न करता केलेले अतिजलप्राशन अनेक आजारांमागचे मूळ कारण बनते. शरीरकोषांना नितांत गरजेचे असलेले पाणी गरजेपेक्षा अधिक मात्रेमध्ये मिळाल्यास त्यांचा चयापचय बिघडवण्यास आणि पर्यायाने संपूर्ण शरीराचे आरोग्य ढासळण्यास कारणीभूत होते. आपण सध्या ज्या अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याचा अनुभव घेत आहोत, त्या घामाच्या धारा बरसणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला जर दिवसभर उन्हामध्ये फिरावे लागत असेल तर मात्र सामान्य वातावरणाच्या तुलनेमध्ये दुप्पट पाणी घामावाटे शरीराबाहेर फेकले जाते, अंदाजे दीड लीटर (१५०० मिली) वा त्याहून अधिक! त्यामुळेच या उष्णतेच्या दिवसांमध्ये निदान तीन लीटर पाणी प्राशन केले पाहिजे, जे होते अंदाजे १४ ते १६ ग्लास दिवसभरातून! अशावेळी साधारण पाऊण-एक तासाने पाणी प्यावे.
उत्तर लिहिले · 25/2/2018
कर्म · 210095
0

शरीराला आवश्यक असणारे पाण्याचे प्रमाण अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमचे वय, लिंग, शारीरिक हालचाल आणि हवामान. त्यामुळे, पिण्याच्या पाण्याचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असू शकते.

कमीत कमी किती लिटर पाणी प्यावे:

  • Mayo Clinic च्या माहितीनुसार,पुरुषांनी दररोज सुमारे 15.5 कप (3.7 लिटर) आणि महिलांनी दररोज सुमारे 11.5 कप (2.7 लिटर) पाणी प्यावे.
  • हे प्रमाण कमीत कमी असून तेवढे पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

जास्तीत जास्त किती लिटर पाणी प्यावे:

  • जास्तीत जास्त पाणी पिण्याची मर्यादा व्यक्तीच्या आरोग्यावर आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते.
  • साधारणपणे, जास्त प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, कारण त्यामुळे रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते (Hyponatremia).
  • त्यामुळे, तहान लागल्यावर पाणी पिणे आणि जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळणे चांगले.

टीप: जर तुम्हाला किडनी किंवा इतर आरोग्याच्या समस्या असतील, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

1 दिवसात किती लिटर पाणी प्यावे?
माणसाने दररोज किती लिटर पाणी प्यावे?
पावसाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?
मे महिन्यात रोज किती पाणी प्यावे?
दिवसातून किती वेळा कोमट पाणी प्यावे?
एका दिवसाला किती लिटर पाणी प्यावे कि ज्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहील?