Topic icon

पाणी पिणे

2




1 दिवसात किती लिटर पाणी प्यावे?


 पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे. तर जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा आपल्याला तहान लागते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रौढ पुरुषाच्या शरीरात त्याच्या एकूण वजनाच्या 65% आणि प्रौढ महिलेच्या शरीरात तिच्या एकूण वजनाच्या 52 टक्के पाणी असते. पाणी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करते, ते पचनास मदत करते.

 
हे सुरळीत काम करण्यास मदत करते, आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते, वजन नियंत्रणात मदत करते, रक्तातील ऑक्सिजन परिसंचरण सुधारते. शरीरात पाण्याच्या कमतरतेची अनेक लक्षणे दिसतात. जसे डिहायड्रेशनमुळे होणारा गोंधळ, डिहायड्रेशनमुळे श्वासाची दुर्गंधी येणे, लवकर थकवा येणे, लघवी कमी होणे, हृदय गती वाढणे इ. 
 
एका माणसाने 1 दिवसात किती लिटर पाणी प्यावे?
पुरुषांसाठी 1 दिवसात सुमारे 3.7 लिटर आणि महिलांसाठी 1 दिवसात सुमारे 2.7 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुम्ही रोज इतके पाणी प्यायले नाही तर भविष्यात डिहायड्रेशन आणि इतर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.


उत्तर लिहिले · 21/8/2023
कर्म · 53720
3
शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. श्रमिक, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता यांनी पाणी अधिक प्यावे. वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी कमी होते.

पाण्याची गरज
खेळाडू व व्यायाम करणाऱ्यांनी प्रत्येक तासाच्या व्यायामाला अतिरिक्त पाणी प्यायला हवे.
उन्हामध्ये प्रवास करणारे वा अधिक श्रमाचे काम करणाऱ्या श्रमिकांनी पाण्यासह लिंबू-मीठ-साखरेचे पाणीही घ्यावे.

पाणी गार हवे की गरम?
आपण गार पाणी पितो, तेव्हा घशामधील तहान कमी होते. गार पाणी हे आतड्यात खूप लवकर शोषले जाते. म्हणूनच तहान भागल्याची संवेदना साध्या पाण्यापेक्षा गार पाण्याने अधिक लवकर जाणवते. फ्रीजमधील खूप थंड पाणी मात्र आरोग्यास तितकेसे हितकारक नाही. यात थोडे साधे पाणी मिळवून माठातल्या पाण्याच्या तापमानाला हे पाणी आणून मग घ्यावे. ज्यांना वरच्यावर कफ होतो, सर्दी-खोकला किंवा दम्याचा त्रास आहे, अशांनी मात्र गार पाणी न पिता साधे किंवा कोमट पाणी प्यावे. आम्लपित्त, लघवीची तक्रार असलेल्यांनी गार पाणी प्यायल्यास चालू शकते. स्थूल व्यक्ती, अपचन, पोटात गॅस होणे, अजीर्ण, आमवात, कंबरदुखी, टी. बी., कफाचे विकार, घशाचे विकार असे त्रास असणाऱ्यांनी कोमट पाणी प्यायची सवय ठेवावी. पाणी हा आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमध्ये सहभागी असणारा महत्त्वाचा रासायनिक घटक आहे. परंतु, एका निरोगी माणसाने दिवसभरात किती पाणी प्यावे याबाबत अनेक गैरसमज आहेत. मात्र, आहारतज्ज्ञ दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी प्यावे असे सांगत असतात
आपण पाणी पित असतोच पण चहा, कॉफी, थंड पेये, सोडा आणि निरनिराळ्या प्रकारचे रसही पीत असतो. त्यातूनही आपल्या पोटात पाण्याचा अंश जात असतो. त्यांचा हिशोब केला असता दिवसभरामध्ये १२ ते १५ ग्लास आपल्या पोटात जात असतात.

पाणी कसे हवे?


अर्थातच शुद्ध हवे. आजकाल घरोघरी फिल्टर आले आहेत. त्यामुळे स्वच्छ पाण्याची चिंता कमी झाली आहे. पाणी जंतुविरहीत करायचे असल्यास प्रथम पांढऱ्या स्वच्छ फडक्‍यातून गाळून घेणे. नंतर हे पाणी गरम करण्यास ठेवणे. पाण्याला उकळी आल्यानंतर पुढे दहा मिनिट हे पाणी उकळू द्यावे व त्यानंतर गॅस बंद करून झाकून ठेवावे. हे पाणी सर्वाधिक शुद्ध असते. त्यावर निर्धास्तपणे विसंबून राहता येते.

उत्तर लिहिले · 7/12/2019
कर्म · 34235
13
पाणी जितके जास्त प्याल तितके शरीरास आरोग्यदायक ठरते...
पाणी हे दर दोन दोन तासाने प्यावे... पाणी प्यायल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि शुष्क पणा कमी होतो...
पाण्याची कमतरता शरीरास लागु देऊ नये... नाहीतर अनेक आजार उद्भवतात...
असो..

पावसाळ्यात व हिवाळयात मनुष्य कमी पाणी पितो...
म्हणूनच पाण्याची नैसर्गिक भर शरीरास मिळण्यासाठी सिझन वाइज फळे उपलब्ध होतात... ती रसाळ फळे खावी...

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते... उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते... श्रमिक, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता यांनी पाणी अधिक प्यावे. वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी कमी होते...

उत्तर लिहिले · 11/6/2018
कर्म · 458560
0
दिवसाला किती पाणी प्यावे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमचे आरोग्य, तुम्ही किती सक्रिय आहात आणि हवामान कसे आहे. तरीही, काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे:

पुरुषांसाठी:

पुरुषांनी दररोज सुमारे 3.7 लीटर पाणी प्यावे. ह्यामध्ये पाणी, इतर पेये आणि अन्नपदार्थांमधील पाण्याचे प्रमाण देखील समाविष्ट आहे.

महिलांसाठी:

महिलांनी दररोज सुमारे 2.7 लीटर पाणी प्यावे. ह्यामध्ये पाणी, इतर पेये आणि अन्नपदार्थांमधील पाण्याचे प्रमाण देखील समाविष्ट आहे.

मे महिन्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. म्हणून, ह्या महिन्यात जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

तुम्ही तहान लागल्यास पाणी प्यावे आणि जास्त शारीरिक हालचाल करत असाल तर जास्त पाणी प्यावे.

टीप: ही केवळ सामान्य माहिती आहे. तुमच्या विशेष गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम राहील.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980
4
मानवी शरीरामधील अधिकांश म्हणजे ६६ टक्के भाग हा जलमय आहे. साहजिकच शरीराला सर्वाधिक गरज ज्या घटकाची असते, तो म्हणजे पाणी.
सर्वसामान्य वातावरणामध्ये सर्वसाधारण निरोगी शरीरामधून २४  तासांमध्ये दीड लीटर (१५०० मिली) पाणी मूत्रविसर्जनावाटे, पाऊण लीटर (७५०मिली लीटर ) पाणी घामावाटे, ४०० मिलीलीटर पाणी बहिश्र्वसनावाटे व १५० मिली पाणी मलावाटे बाहेर फेकले जाते. या गणितानुसार  सामान्य वातावरणामध्ये  दिवसभरातून अंदाजे सात ते आठ ग्लास म्हणजे दीड लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, तो तसा योग्यच म्हटला पाहिजे.
शरद व ग्रीष्म या ऋतूंमधला उन्हाळा, हेमंत व शिशिर या ऋतूंमधला हिवाळा आणि प्रावृट व वर्षां या ऋतूंमधला पावसाळा या तीन भिन्न-भिन्न मोसमांमध्ये जलप्राशन सारखेच असावे, हा विचारच मुळात चुकीचा आहे. हिवाळा व पावसाळा या शीत ऋतूंमध्ये शरीर जेव्हा मूत्रविसर्जन वाढवून शरीरातले पाणी कमी करण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा तहानेची जाणीव कमीतकमी निर्माण करून जलप्राशन नियंत्रणात आणले जाते; याउलट ऑक्टोबरच्या व एप्रिल-मेमधल्या उन्हाळ्यामध्ये शरीर जेव्हा मूत्रविसर्जन नियंत्रणात आणून शरीरातले पाणी वाचवण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा शरीराला पाण्याची अधिक गरज असल्याने अधिकाधिक तहान लागून जलप्राशन वाढवले जाते. मात्र तहानेसारख्या मूलभूत नैसर्गिक मागणीचा विचारही न करता केलेले अतिजलप्राशन अनेक आजारांमागचे मूळ कारण बनते. शरीरकोषांना नितांत गरजेचे असलेले पाणी गरजेपेक्षा अधिक मात्रेमध्ये मिळाल्यास त्यांचा चयापचय बिघडवण्यास आणि पर्यायाने संपूर्ण शरीराचे आरोग्य ढासळण्यास कारणीभूत होते. आपण सध्या ज्या अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याचा अनुभव घेत आहोत, त्या घामाच्या धारा बरसणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला जर दिवसभर उन्हामध्ये फिरावे लागत असेल तर मात्र सामान्य वातावरणाच्या तुलनेमध्ये दुप्पट पाणी घामावाटे शरीराबाहेर फेकले जाते, अंदाजे दीड लीटर (१५०० मिली) वा त्याहून अधिक! त्यामुळेच या उष्णतेच्या दिवसांमध्ये निदान तीन लीटर पाणी प्राशन केले पाहिजे, जे होते अंदाजे १४ ते १६ ग्लास दिवसभरातून! अशावेळी साधारण पाऊण-एक तासाने पाणी प्यावे.
उत्तर लिहिले · 25/2/2018
कर्म · 210095
2
जेवढी तहान असेल तेवढ्या वेळा, तसेच माणसाला प्रत्येक दिवशी ३ ते ४ लिटर पाण्याची गरज असते.
उत्तर लिहिले · 22/10/2017
कर्म · 40
9
जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील वात वाढतो.

म्हणून, जेव्हा तहान लागते तेव्हाच पाणी प्यायले पाहिजे.

साधारणतः दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी प्यायले पाहिजे, जे पुरेशे आहे. 

थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी पिणे कधिही चांगलेच, कारण, थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी पचायला हलके असते.
उत्तर लिहिले · 7/9/2017
कर्म · 80330