3 उत्तरे
3 answers

प्रवासात उलटी का होते?

22
वाहन लागणे म्हणजे 'मोशन सिकनेस'. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी मेंदू पर्यंत पोहोचवण्याचं काम कान, डोळे आणि स्नायुंच्या आधारे होतं. डोळे थेट समोर दिसणारं मेंदू पर्यंत पोहोचवतात तर कान त्याच्या मधल्या भागात असलेला तीन वक्राकृती हाडांचा संच आणि त्यातल्या द्रवाच्या हालचालींच्या मदतीने शरीराचं स्थान समजून त्याचे संकेत मेंदूकडे पाठवतो.

जेव्हा आपण एखाद्या वाहनात बसतो तेव्हा आपले कान, डोळे आणि स्नायू हे आवाज, वेग आणि दृश्य यात गोंधळतात आणि भिन्न भिन्न प्रकारचे संकेत मेंदू पर्यंत पोहोचवू लागतात. या तिन्ही प्रकारच्या संकेतात कुठेही ताळमेळ बसत नसल्याने मेंदूचा गोंधळ उडतो. यातून मेंदू स्वतःचा असा निष्कर्ष काढतो की हे सगळं विषबाधेमुळे होत असावं. आणि यावर मेंदूचा एकच उपाय ठरलेला असतो तो म्हणजे पोटातलं विष उलटी मार्फत बाहेर काढणे.
काहीवेळा बस किंवा रेल्वेने प्रवास करताना वाहनांचे धूर, माणसांच्या घामाचे वास यातूनही मळमळू शकतं, मात्र हे सगळं नसूनही जर उलटी होत असेल तर याला फक्त वरील कारण लागू पडतं.
उत्तर लिहिले · 4/2/2018
कर्म · 458560
2
*🤷🏻‍♀प्रवासादरम्यान येणाऱ्या उल्टीवर रामबाण उपाय*


_कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात. या कारणांमुळे चक्‍कर येते किंवा मळमळ होते._

*लवंग :* लवंगचे तसे अनेक फायदे आहेत. पण यामुळे मळमळदेखील होत नाही. प्रवासादरम्यान एक लवंग चघळत राहिल्याने मळमळ होत नाही.

*लिंबू :* लिंबूमध्ये असेलेले सिट्रिक अॅसिड उल्टी आणि मळमळ होण्याची समस्या दूर करते. यासाठी एक कप गरम पाण्यात एक लिंबूचा रस आणि मीट टाकून प्यायलं पाहिजे. लिंबू पाण्यात मध टाकून देखील तुम्ही ती घेऊ शकता.

*अद्रक -* प्रवास करण्‍यापूर्वी एक कप अद्रकचा चहा पिल्‍याने होणारी उल्‍टी होत नाही. एक कप अद्रक चहामुळे मळमळही थांबते.

*पुदिना -* पुदिन्‍यामुळे मोशन सिकनेसच्‍या समस्‍येपासून ताबडतोब आराम मिळतो. पुदिन्‍यातील मेथॉंलमुळे पोटातील मांसपेशी शांत होतात व मळमळ कमी होते. तसेच मोशन सिकनेसच्‍या समस्‍येला दूर करण्‍यासही पुदिना मदत करतो
उत्तर लिहिले · 29/8/2019
कर्म · 569225
0

प्रवासात उलटी होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

1. गती आणि संतुलन बिघडणे (Motion Sickness):
  • आपल्या शरीराच्या आतील कान, डोळे आणि स्नायू यांसारख्या अवयवांना गतीची जाणीव होते. जेव्हा या अवयवांकडून मेंदूला मिळणारे संदेश जुळत नाहीत, तेव्हा motion sickness चा अनुभव येतो.
  • उदाहरणार्थ, कारमध्ये बसल्यावर डोळे स्थिर वस्तू पाहत असतात, पण आतील कान गती अनुभवत असतो. या गोंधळामुळे मेंदूला उलटीचा संकेत मिळतो.
2. तणाव आणि चिंता (Stress and Anxiety):
  • प्रवासाच्या विचाराने किंवा प्रत्यक्ष प्रवासादरम्यान काही लोकांना तणाव आणि चिंता जाणवते, ज्यामुळे मळमळ आणि उलटी होऊ शकते.
3. शारीरिक आणि मानसिक थकवा (Physical and Mental Fatigue):
  • प्रवासापूर्वी व्यवस्थित झोप न झाल्यास किंवा जास्त शारीरिक आणि मानसिक थकवा असल्यास उलटी होऊ शकते.
4. आहारातील बदल (Dietary Changes):
  • प्रवासात तेलकट, मसालेदार किंवा अपरिचित पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते आणि उलटी होऊ शकते.
5. वास (Smell):
  • पेट्रोल, डिझेल किंवा इतर तीव्र वासांमुळे काही लोकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ शकतो.
6. औषधे (Medications):
  • काही औषधांच्या साइड इफेक्टमुळे देखील उलटी होऊ शकते.

उपाय:

  • प्रवासापूर्वी व्यवस्थित झोप घ्या.
  • हलका आणि सहज पचेल असा आहार घ्या.
  • प्रवासात ताजी हवा खेळती ठेवा.
  • लिंबू किंवा आले (ginger) सोबत ठेवा.
  • आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्या.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

व्हिटॅमिन डी व कॅल्शियम कोणकोणत्या पदार्थांमधून व आणखी कशामधून मिळू शकते?
माझे वय ३७ वर्ष आहे आणि माझे समोरील खालचे दोन दात हलतात, ते पक्के करण्यासाठी काही उपाय सांगा आणि याचा वजनाशी काही संबंध असू शकतो का?
माझं वय ३७ वर्ष आहे आणि माझे वजन फक्त ४३ किलो आहे, तरी वजन वाढवण्यासाठी काय खावे व काही आयुर्वेदिक उपाय सांगा?
सेक्सवर नियंत्रण कसे ठेवावे?
शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी काय करावे?
पायाच्या अंगठ्याचा कोपरा दुखत आहे, ते बरे होण्यासाठी कोणते लिक्विड ऑइंटमेंट (liquid ointment) त्यावर सोडावे?
इलायचीचे फायदे काय?