Topic icon

मळमळ

8
लांबचा प्रवास करताना आपल्याला अचानक घाम फुटू लागतो, मळमळ होते, मग काही वेळाने उलटी सुद्धा होते. यालाच गाडी लागणे किंवा वाहन लागणे म्हणतात. प्रवासादरम्यान अनेकांना याचा त्रास होतो. कार, बस, रेल्वे, अगदी जहाजा मधूनही प्रवास करताना हा त्रास होऊ शकतो आणि यात लहान मोठा असा फरक नसतो.
गाडीने प्रवास करताना मधेच तुम्हाला जाणवत कि काहीतरी गडबड होतेय. पोट मळमळायला लागतंय. श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतोय आणि डोकं हे जड होतंय. लवकरच समजत कि तुम्हाला गाडी लागतेय. म्हणजेच तुम्हाला उलटी होणार आहे. प्रवासा मध्ये हीच बाब बऱ्याच जणांच्या आड येते. आणि प्रवासाचा आनंद आपल्याला घेता येत नाही.मग चालकाला तुम्ही सांगता थोडी साईड ला घे रे गाडी! मग चालकाचा पण मूड ऑफ होतो आणि गाडी त्याला थांबवावीच लागते. थांबवली नाही तर तुम्ही गाडीत उल्टी करून मोकळे होता आणि गाडीत घाण होते ती वेगळी पण दुर्गंध ही येतो.
*ऊलटीची भावना का होते*
शास्त्र मध्ये ह्याला “मोशन सिकनेस” नाव दिलं आहे. मोशन म्हणजे हालचाल आणि सिकनेस म्हणजे आजारपण. ह्याचाच अर्थ हालचाली मुळे येणारं आजारपण. हे आपल्याला विमान प्रवास, बोटीचा प्रवास आणि गाडीच्या प्रवासात येऊ शकते.डोळे आणि कानांचा सुटलेला किंवा न जमलेला ताळमेळ ज्याला काँफ्लिटिंग सिग्नल्स थेअरी असेही म्हणू शकता.


गाडी सुरु झाल्या नंतर तुम्ही आरामात पाठ टेकून बसलेला असता. तुमचे डोळे गाडीच्या आतमध्ये असलेल्या सर्व गोष्टी बघत असतात अगदी ड्राइवर च्या सीट पासून ते बाजूला बसलेल्या माणसाकडे. गाडी तर चालू असते पण गाडीतल्या वस्तू गाडी बरोबरच पुढे जात असतात म्हणजेच फारशी काही मुव्हमेंट नसते. पण त्याच वेळी मात्र आपले कान सर्व काही ऐकत असतात. गाड्यांचा मागे जाणारा आवाज, हॉर्न आणि बरंच काही आपले कान ऐकत असतो आणि मेंदू कडे पाठवत असतो. त्याच वेळी डोळे सुद्धा आपली माहिती मेंदू कडे पाठवण्याचं काम करतात. आणि मग होतो मेंदू च्या डोक्याचा शॉट!आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,कान आणि डोळे हे दोन शिपाई आहेत त्यांचं काम असतं मिळालेली माहिती कमांड हेडकॉर्टर पर्यंत पोहोचवणे, हा कमांड हेडकॉटर म्हणजे आपला मेंदू. हा कमांड हेडकॉटर माहिती गोळा करतो आणि निर्णय घेऊन टाकतो. निर्णय आदेश असतात आणि सर्वच शिपाई त्या आज्ञे च पालन करतात. प्रवास करताना डोळे आणि कान वेगवेगळी माहिती देतात. डोळे म्हणतात हालचाल नाहीये. तर कान म्हणतात हालचाल आहे. ह्या दोघांचे सिग्नल बघून हेडकॉटर म्हणतो, दया, कुछ तो गडबड है! मग लगेच पोटासाठी आदेश निघतो… बाहेर काढा बाहेर काढा! पोट पण आदेशाचं पालन करतो आणि मग नको असलेलं घडतं. मेंदू ला अशे सिंग्नल्स मिळणे म्हणजे शरीरात नुरोटॉक्सिन्स चा प्रवेश झाला आहे असं मेंदू ला वाटत म्हणजेच शरीरात विषाचा प्रवेश झाला आहे, मग मेंदू लगेच पोटाला सर्व बाहेर काढायला सांगतो आणि आपल्याला उलटी होते.
*ऊलटी होऊ नये म्हणुन हे करा*
प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते.
*वेलची* : प्रवासात जाण्याच्या आधी वेलची टाकलेला चहा पिल्यास प्रवासात आरामात मिळतो. तसेच सोबत वेलची नेऊन चघळल्यास मळमळ होत नाही.
https://bit.ly/3kcwJ2Q
*आले* : आल्यामध्ये अँटी एमेटिक तत्व असतात त्यामुळे आल्याचे प्रवासात सेवन केल्यास ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो.
*लवंग* : तुम्ही प्रवासात असाल तेव्हा कुटलेली एक चिमूट लवंग साखर किंवा काळ्या मिठासोबत खाल्ली की मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात नेहमी लवंग सोबत ठेवावी.
*लिंबू* : लिंबू हे ओकारी आणि मळमळीवर एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे प्रवासाला जाताना लिंबू सोबत घेऊन जा. जेव्हा मळमळ वाटेल तेव्हा लिंबाचा वास घ्या.
*आवळा सुपारी* प्रवासात आवळा सुपारी सुध्दा परिणामकारक ठरू शकते.
0

कारमध्ये AC बंद करून खिडक्या उघड्या ठेवल्या तरी काही लोकांना उलट्या होण्याची समस्या जाणवते. याची काही कारणे आणि उपाय खालीलप्रमाणे आहेत:

कारणे:

  • गतीज आजार (Motion Sickness): গাড়ির वेग आणि शरीराचा समतोल राखणाऱ्या इंद्रियांच्या गोंधळामुळे motion sickness होऊ शकते. खिडक्या उघड्या ठेवल्याने वारा येतो, पण motion sickness कमी होण्याची शक्यता कमी असते.
  • दमट हवामान: दमट हवामानामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामुळे मळमळ होऊ शकते.
  • वास: कारमधील पेट्रोलचा वास किंवा इतर तीव्र वासामुळे मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.
  • अस्वस्थता: काही लोकांना कारमध्ये बसल्याने अस्वस्थ वाटते आणि त्यामुळे त्यांना उलट्या होऊ शकतात.

उपाय:

  • पुरेशी हवा: AC बंद ठेवल्यास खिडक्या पूर्णपणे उघड्या ठेवा.
  • आरामदायक Position: गाडीमध्ये आरामात बसा. शक्य असल्यास, गाडीच्या दिशेने तोंड करून बसा.
  • लक्ष विचलित करा: संगीत ऐका किंवा गप्पा मारा.
  • हलका आहार: प्रवासाला निघण्यापूर्वी जड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.
  • लिंबू किंवा आले: लिंबू किंवा आल्याचा छोटा तुकडा चघळल्याने मळमळ कमी होते.
  • औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्याने motion sickness कमी करणारी औषधे घ्या.
  • ताजी हवा: वेळोवेळी गाडी थांबवून ताजी हवा घ्या.

हे उपाय करूनही त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040
22
वाहन लागणे म्हणजे 'मोशन सिकनेस'. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी मेंदू पर्यंत पोहोचवण्याचं काम कान, डोळे आणि स्नायुंच्या आधारे होतं. डोळे थेट समोर दिसणारं मेंदू पर्यंत पोहोचवतात तर कान त्याच्या मधल्या भागात असलेला तीन वक्राकृती हाडांचा संच आणि त्यातल्या द्रवाच्या हालचालींच्या मदतीने शरीराचं स्थान समजून त्याचे संकेत मेंदूकडे पाठवतो.

जेव्हा आपण एखाद्या वाहनात बसतो तेव्हा आपले कान, डोळे आणि स्नायू हे आवाज, वेग आणि दृश्य यात गोंधळतात आणि भिन्न भिन्न प्रकारचे संकेत मेंदू पर्यंत पोहोचवू लागतात. या तिन्ही प्रकारच्या संकेतात कुठेही ताळमेळ बसत नसल्याने मेंदूचा गोंधळ उडतो. यातून मेंदू स्वतःचा असा निष्कर्ष काढतो की हे सगळं विषबाधेमुळे होत असावं. आणि यावर मेंदूचा एकच उपाय ठरलेला असतो तो म्हणजे पोटातलं विष उलटी मार्फत बाहेर काढणे.
काहीवेळा बस किंवा रेल्वेने प्रवास करताना वाहनांचे धूर, माणसांच्या घामाचे वास यातूनही मळमळू शकतं, मात्र हे सगळं नसूनही जर उलटी होत असेल तर याला फक्त वरील कारण लागू पडतं.
उत्तर लिहिले · 4/2/2018
कर्म · 458560
11
⚀काही प्रवासी उलट्या होतात हे माहीत असूनही टच्च जेवण करून येतात. व उलट्या होऊ नये म्हणून उलटी दाबण्यासाठी औषधी गोळ्या घेतात. हे तर त्याहूनही हानिकारक व रोगकारक आहे. त्यामुळे नको असलेले खाद्यपदार्थ पेय शरीराबाहेर टाकू इच्छिते व आपण उलट त्यास पुन्हा आतमध्ये दाबतो. त्यामुळे त्यापासून होणारा पोषक रस हा दुष्ट होऊन पुढील रक्त खराब होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे पुढे अनेक प्रकारचे रोग ही संभवतात.
0
प्रवासात आपण सतत हालत असतो गाडी बरोबर
त्यामुळे कंपनामुळे अपल्याला उचमळत असावे
त्याकरता आपण एखादी उलटीची गोळी घ्यावी
पण ती तुमच्या फॅमिली डॉक्टर च्या सल्ल्यानुसारच
उत्तर लिहिले · 19/4/2017
कर्म · 3190