औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय पोटाचे विकार पचनसंस्था आरोग्य

मला दररोज पित्ताचा त्रास होतो यावर उपाय आहे का?

3 उत्तरे
3 answers

मला दररोज पित्ताचा त्रास होतो यावर उपाय आहे का?

15
घरामध्ये जर दररोजच्या जेवणात शेंगदाण्याचे तेल वापरात आणत असाल तर कमी वापर होईल असे पहा... शेंगदाण्याचे तेल हे शरीरासाठी चांगले असते पण रोजच्या आहारात ते अधिक प्रमाणात योग्य नव्हे... त्याने पित्त/ आम्लपीत्त/ खोकळा अश्या व्याधी होण्याच्या शक्यता असतात... सोबतच दररोज सकाळी कोमट पाणी घेऊन त्यात आठ ते दहा लिंबुचे थेंब मिसळून प्यावे... पित्ताचा त्रास कमी होतो... आल्याची चहा करुन प्यावे...
जर तुम्ही एखादी टॅबलेट किंवा इतर औषधे रिलीफ मिळण्यासाठी घेत असाल तर कृपया ते औषध/गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांशी कंसल्टिंग करुन घ्या.. कोणतेही मेडिकल औषध डॉक्टरांना विचारुनच घ्यावे...
धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 8/1/2018
कर्म · 458580
3
तुम्ही ओमी डी किंवा ओमेफोर्ड हे टॅब घ्या. या टॅबचा रिझल्ट खूप छान आहे.
उत्तर लिहिले · 7/1/2018
कर्म · 11195
0
पित्ताशयाचा (Gallbladder) त्रास कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • आहार:
    • काय खावे: फळे, भाज्या, पातळ पदार्थ, आणि फायबरयुक्त (Fiber) पदार्थ भरपूर खा.
    • काय टाळावे: तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न (Processed food) आणि जंक फूड (Junk food) टाळा.
  • नियमित भोजन: ठराविक वेळेवर जेवण करा आणि जेवणाच्या वेळांमध्ये जास्त अंतर ठेवू नका.
  • पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
  • तणाव व्यवस्थापन: योगा, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करून तणाव कमी करा.
  • वजन नियंत्रण: जास्त वजन असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा: ह्या सवयी पित्ताशयाच्या त्रासाला वाढवू शकतात.
  • डॉक्टरांचा सल्ला: नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा.
हे काही सामान्य उपाय आहेत. तुमच्या प्रकृतीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2800

Related Questions

कोठा फुटणे म्हणजे काय?
प्रत्येक घास खाताना पोट गच्च व घास अडकल्यासारखे होते का?
मानवी शरीरात पित्त कोणत्या अवयवात तयार होते?
मला खाल्ल्याबरोबर लगेच टॉयलेटला जावे लागते, दिवसातून ५ वेळा. काय करू? जगावे वाटेना.
ऍसिडिटी कशामुळे होते?
वलयी संघात कोणते पचननाचे अवयव असतात?
पचन कुठून सुरू होते?