पचनसंस्था
आरोग्य
मला खाल्ल्याबरोबर लगेच टॉयलेटला जावे लागते, दिवसातून ५ वेळा. काय करू? जगावे वाटेना.
2 उत्तरे
2
answers
मला खाल्ल्याबरोबर लगेच टॉयलेटला जावे लागते, दिवसातून ५ वेळा. काय करू? जगावे वाटेना.
1
Answer link
जेवल्यानंतर घ्यावी लागते टॉयलेटकडे धाव? हा आजार असू शकतं कारण
जेवल्यानंतर घ्यावी लागते टॉयलेटकडे धाव? हा आजार असू शकतं कारण
रात्रीचं जेवण वेळेवर घ्यायची सवय लावा.
शौचाचा त्रास असेल तर, कुठेही बाहेर गेल्यावर जेवण्याची भीती वाटते. त्यामुळे भूक लागलेली असूनही जेवण टाळायची सवय लागते.
: विचार करुन पाहा एखाद्या कार्यक्रमाला, पार्टीला गेले आहात, चविष्ठ पदार्थठेवलेले आहेत. भूकही लागली आहे आणि तोंडाला पाणी सुटलं आहे. पण, त्यांना हात लावायची भीतीवाटते आहे. कारण, जेवल्यावर लगेच टॉयलेटकडे जावं लागेल हे माहिती आहे. हा त्रास ज्यांना आहे तेच ही कल्पना करू शकतात. हा त्रास फक्त भीती पूरताच मर्यादित नाही तर, खूपदा हा त्रास जास्त प्रमाणात होतो. कारण, शौचाच्या या त्रासाने वजन कमी व्हायला लागतं. काही लोक या त्रासाला कंटाळून जेवण कमी करतात. पण, त्याचाही उलटा त्रास व्हायला लागतो. अशक्तपणाही येऊ शकतो. हा त्रास म्हणजे नेमका काय असतो जाणून घेऊयात.
जेवल्यानंतर लगेच शौचाला जावं लागत असेल तर, त्याला गॅस्ट्रोकॉलिक रिफलक्स (Gastroesophageal reflux) म्हणतात. ज्या लोकांना वेळेवर शौचाला जाण्याची सवय नसते किंवा बराच काळ शौचाला रोखून धरणाऱ्यांना पुढे जाऊन हा त्रास होतो. या समस्येवर कोणते उपाय करता येतात ते जाणून घेऊयात.
उपाय -
जेवण व्यवस्थित चघळून खा. फायबरयुक्त आहार घ्या. एकदम जेवण्याऐवजी थोड्याथोड्या वेळाने जेवा.
हे पदार्थ आहारात असू द्या -
हा त्रास होत असेल तर, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. नासपती, सफरचंद, मटार, ब्रोकोली, तांदूळ, डाळींचा समावेश करा. दही, सॅलड, आलं, अननस, पेरू हे पदार्थही खायला सुरूवात करा. केळं, आंबा, पालक, टोमॅटो, ड्रायफ्रुट आणि शतावरी सारख्या पदार्थांमध्ये असणारं पोटॅशियम या त्रासात फायदेशीर असतं.
रात्रीचं जेवण वेळेवर करण्याची सवय लावा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन झोपा.
सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या. तरीही हा त्रास कमी होत नसेल तर, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. वेळीच पोटाच्या विकारांवर उपाय न केल्यास मोठ्या आजारांना तोंड द्यावं लागू शकतं. पोटाचे विकार वाढले तर, शस्त्रक्रिया कराव्या लागतात. ज्यामुळे खर्च आणि त्रास दोन्हीही वाढण्याची शक्यता असते.
यासाठी आधीच काळजी घेणं गरजेचं आहे. पचनसंस्था सुधारण्यासाठी नियमित पोषक आहार घ्यावा, मुबलक पाणी प्यावं आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करावेत. ज्यामुळे बिघडलेली पचनसंस्था पुन्हा पूर्ववत होऊ शकते. निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हा पोटाचे विकार दूर ठेवण्याचा सोपा मार्ग आहे.
असा त्रास मला लहान पणापासून आहे जसं वय वाढत जातं तसं हे प्रमाण कमी कमी होत जातो मग शौचास दोन तीन दिवस होत नाही मग हे आपल्या शरीराला त्रास होणं सुरू होतं मग गॅस पोटात गॅस होणं हा माझा त्रास मी सांगितलं तुम्ही जो त्रास मी हि सहन केला आहे हे सर्व आपल्या जेवणामुळे होतो वेळेत न केल्या मुळे
0
Answer link
मला तुमच्या त्रासाची जाणीव आहे. खाल्ल्याबरोबर लगेच टॉयलेटला जावे लागणे आणि दिवसातून ५ वेळा जावे लागणे यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल. काही उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कारणे:
- आहार: काही विशिष्ट पदार्थ, जसे की मसालेदार पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने Potty लागू शकते.
- आतड्यांसंबंधी समस्या: Irritable Bowel Syndrome (IBS) किंवा Inflammatory Bowel Disease (IBD) सारख्या समस्यांमुळे असे होऊ शकते.
- संसर्ग: आतड्याला संसर्ग झाल्यास देखील Potty लागू शकते.
- औषधे: काही औषधांमुळे side effects म्हणून Potty लागू शकते.
उपाय:
- आहारात बदल: कोणत्या पदार्थांमुळे त्रास होतो ते ओळखा आणि ते टाळा. हळू हळू खा आणि चांगले चावून खा.
- पुरेसे पाणी प्या: दिवसातून भरपूर पाणी प्या.
- तणाव कमी करा: तणावामुळे Potty लागू शकते, त्यामुळे योगा, ध्यान, किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
- डॉक्टरांचा सल्ला: gastroenterologist (जठरोग तज्ञ) डॉक्टरांना भेटून तपासणी करा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
जीवनशैलीतील बदल:
- नियमित व्यायाम करा.
- वेळेवर झोप घ्या.
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
टीप: हा त्रास कमी करण्यासाठी काही साधे उपाय आहेत, पण डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.