औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय पोटाचे विकार पचनसंस्था आरोग्य

पोटात सारखे गॅस तयार होते कोणता उपाय करावा?

4 उत्तरे
4 answers

पोटात सारखे गॅस तयार होते कोणता उपाय करावा?

17
महिन्यातून तिन चार वेळा अशी तक्रार भेड़सावत असल्यास हे सामान्य आहे... परंतु सारखे पोटाची समस्या उद्भवत असल्यास थोड़ीफार तरी चिंताजनक बाब आहे... म्हणूनच प्रथम तुम्ही वैद्यकीय तपासणी करुन घ्या... तरीही घरातील काही आवश्यक असलेले पदार्थपासून तात्पुरती आराम मिळेल यासाठी एक उपाय सांगते...
दररोज सकाळी उकळून ठेवलेले कोमट पाणी अवश्य प्यावे...
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात जीरे आणि ओव्याची बारीक पूड अर्धा किंवा एक चमचा टाकावे व ते प्यावे...
तुर्तास तरी दुधाची चहा पिऊ नका... आले(अद्रक) टाकलेले काळी चहा घ्या.., दिवसातून किमान दोन वेळाच घ्या... अती चहा घेऊ नका...
मोसंबीचे रस घरात बनवून प्या... त्यात सैंधव मीठ टाकून प्या...

(महत्त्वाची टिप:-सारखे पोटात गॅस होते म्हणून इनोे जास्त घेत राहु नका... कृपया डॉक्टरांचा सल्ला देखील अवश्य घ्या...)
उत्तर लिहिले · 23/1/2018
कर्म · 458580
4
गॅस अन्न न पचल्यामुळे होते । जेवणापूर्वी 1 तास अगोदर पाणी प्यावे । जेवण करतांना पाणी कमी प्यावे । प्रत्येक घास 32 वेळा चावा। बाहेरचे खावू नका।
सकाळी कोमट पाण्यात तूप टाकुन प्यावे त्याने शौचास साफ होते। काही दिवस असे करावे व त्यासोबत दिवसा हलके पचणीय अन्न घ्या। वेळच्यावेळी शौचास जा। रोखून धरू नका।
उत्तर लिहिले · 2/1/2018
कर्म · 5940
0
पोटात वारंवार गॅस तयार होण्याची समस्या असल्यास खालील उपाय करून पहा:

घरगुती उपाय:

  • हिंग: हिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून प्यायल्याने गॅसची समस्या कमी होते.
  • ओवा: ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे गॅस आणि अपचनाच्या समस्यांवर गुणकारी आहे. एक चमचा ओवा गरम पाण्यात टाकून प्या.
  • आले: आल्यामध्ये असलेले जिंजरॉल (Gingerol) नावाचे तत्व पचनक्रिया सुधारते आणि गॅस कमी करते. आल्याचा चहा प्यायल्याने आराम मिळतो.
  • लसूण: लसूण देखील गॅसच्या समस्येवर फायदेशीर आहे. लसणीच्या दोन पाकळ्या बारीक करून पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी प्या.
  • पुदिना: पुदिन्याची पाने चघळल्याने किंवा पुदिन्याचा चहा प्यायल्याने गॅस कमी होतो.

आहार बदल:

  • पचनास जड असलेले पदार्थ टाळा.
  • जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा.
  • फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक करा.
  • जेवणानंतर लगेच झोपू नका.
  • दिवसभर पुरेसे पाणी प्या.

डॉक्टरांचा सल्ला:

जर घरगुती उपायांनी आराम नाही मिळाला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2400

Related Questions

प्रत्येक घास खाताना पोट गच्च व घास अडकल्यासारखे होते का?
मानवी शरीरात पित्त कोणत्या अवयवात तयार होते?
मला खाल्ल्याबरोबर लगेच टॉयलेटला जावे लागते, दिवसातून ५ वेळा. काय करू? जगावे वाटेना.
ऍसिडिटी कशामुळे होते?
वलयी संघात कोणते पचननाचे अवयव असतात?
पचन कुठून सुरू होते?
पचनसंस्थेची रचना आणि लेबलिंग?