कायदा माहिती अधिकार ग्रामपंचायत माहितीचा अधिकार

ग्रामपंचायतमध्ये माहितीचा अधिकार वापरण्यासाठी कोणते मुद्दे आवश्यक आहेत?

2 उत्तरे
2 answers

ग्रामपंचायतमध्ये माहितीचा अधिकार वापरण्यासाठी कोणते मुद्दे आवश्यक आहेत?

8
🎆माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते.
🎗ही माहिती पुढील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थामधून घेता येते.
१) न्यायालये (सर्व) २) संसद (लोकसभा व राज्यसभा) ३) विधिमंडळ (विधानसभा/विधान परिषद), विविध महामंडळे४) आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, ५) तहसील कार्यालये, जिल्हा परिषदा (अंतर्गत सर्व कार्यालये),६) पंचायत समिती (अंतर्गत सर्व विभाग),ग्रामपंचायती  ७) महानगरपालिका, नगरपालिका८) गृह विभाग (पोलीस यंत्रणा) ९) मंत्रालयीन विविध विभाग तथा सर्व शासकीय कार्यालये१०) शासकीय अनुदानित सहकारी, खाजगी, सेवाभावी संस्था उदा :- साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, दूध संघ, सहकारी बँका.
🎟अशी मिळवा माहिती
माहिती मिळविण्यासाठी अर्जदार हा कोर्या कागदावरसुद्धा जनमाहिती अधिकार्याकडे अर्ज करु शकतो. त्या अर्जावर १० रु. चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा अथवा रोख रक्कम/डिमांड ड्राफ्ट/बँकर्स चेक द्यावा. अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर कोणतेच शुल्क द्यावे लागणार नाही.असा अर्ज सादर करताना पुढील १२ बाबींची पूर्तता करावी१) कार्यालयाचे नाव २) कार्यालयाचा पत्ता ३) अर्जदाराचे संपूर्ण नाव ४) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता ५) माहितीचा विषय६) कोणत्या कालावधीची माहिती हवी? ७) कोणत्या प्रकारची माहिती हवी? ८) माहिती, पोस्टाने की स्पीड पोस्टने हवी?९) अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय? (असल्यास रेशन कार्डाची झेरॉक्स जोडावी) १०) अर्ज केल्याची तारीख ११) अर्ज केल्याचे ठिकाण १२) अर्जदाराची सही वा अंगठासंपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर तो जनमाहिती अधिकार्याकडे सादर करावा. पोच घ्यावी. ३० दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.
0

ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार (Right to Information - RTI) वापरण्यासाठी अर्ज करताना खालील मुद्दे आवश्यक आहेत:

  • अर्जदाराचे नाव व पत्ता: अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, पिन कोड आणि संपर्क क्रमांक (मोबाईल नंबर) लिहा.
  • ग्रामपंचायतीचे नाव व पत्ता: अचूक ग्रामपंचायतीचे नाव व पत्ता नमूद करा.
  • माहितीचा तपशील: तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे, त्याची स्पष्ट माहिती अर्जात लिहा. उदा. विषयाचे नाव, कोणत्या वर्षाची माहिती हवी आहे, कागदपत्रांची मागणी, इत्यादी.
  • अर्ज करण्याची तारीख: अर्ज कोणत्या तारखेला करत आहात, ती तारीख नमूद करा.
  • अर्जाचा विषय: अर्ज कोणत्या विषयाशी संबंधित आहे, तो विषय स्पष्टपणे सांगा. उदा. बांधकाम, विकास कामे, निधी, इत्यादी.
  • आवश्यक शुल्क: माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क भरा आणि त्याची पावती अर्जासोबत जोडा.
  • सही: अर्जाच्या शेवटी अर्जदाराची सही असणे आवश्यक आहे.

माहिती मागण्याचे उदाहरण:

  • "माझ्या गावांतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी पाहणे आहे."
  • "ग्रामपंचायतीने मागील वर्षात केलेल्या विकासकामांचा खर्च आणि त्यासंबंधीचे कागदपत्रे पाहणे आहेत."

टीप:

  • माहिती अधिकार अर्ज साध्याformat मध्ये legible अक्षरात लिहा.
  • अर्ज पोस्टाने पाठवत असाल, तर पावती जपून ठेवा.

अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: dgipr.maharashtra.gov.in

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होते का?
माहितीच्या अधिकाराचा अहवाल कसा तयार करावा?
माहितीच्या अधिकाराचे कलम चार कोणते आहे?
माहितीच्या अधिकारात बॉम्बे हायकोर्ट येते का? आणि माहितीचा अधिकार कसा वापरावा?
माहितीचा अधिकार 2005 बद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?
माहितीचा अधिकार यामधील अपील पद्धत म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा?
माहितीचा अधिकार (Right to Information) बद्दल माहिती मिळेल का?