कायदा माहिती अधिकार माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार (Right to Information) बद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

माहितीचा अधिकार (Right to Information) बद्दल माहिती मिळेल का?

3
्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार अन्य अर्थ अपेक्षित नसेल तर,—
(क) “समुचित शासन” याचा अर्थ –
(i) केंद्र सरकार किंवा संघराज्य क्षेत्र प्रशासन यांच्याकडून स्थापन
करण्यात आलेल्या, घटित करण्यात आलेल्या, त्यांच्याकडे
मालकी असलेल्या, त्याच्या नियंत्रणाखाली
असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे
निधीव्दारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात
येतो, अशा सार्वजनिक प्राधिकरणांच्या बाबतीत, केंद्र
सरकार, असा आहे;
(ii) राज्य शासनांकडून स्थापन करण्यात आलेल्या, घटित करण्यात
आलेल्या, त्यांच्याकडे मालकी असलेल्या, त्यांच्या
नियंत्रणाखाली असलेल्या अथवा त्यांच्याकडून
प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीव्दारे ज्यांना
मॊठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक
प्राधिकरणांच्या बाबतीत, राज्य शासन असा आहे;
(ख) “केंद्रीय माहिती आयोग” याचा अर्थ
कलम 12, पोटकलम (1) खाली घटित करण्यात आलेला
केंद्रीय माहिती आयोग असा आहे;
(ग) “केंद्रीय जन माहिती
अधिकारी” याचा अर्थ, पोटकलम (1) अन्वये पदनिर्देशित
करण्यात आलेला केंद्रीय जन माहिती
अधिकारी, असा आहे आणि यात कलम 5 पोटकलम (2)
अन्वये अशा प्रकारे पदनिर्देशित करण्यात आलेल्या सहायक जन
माहिती अधिकाज्याचाही समावेश होतो;
(घ) “मुख्य माहिती आयुक्त” आणि
“माहिती आयुक्त” यांचा अर्थ कलम 12, पोटकलम (3)
अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या मुख्य माहिती
आयुक्त आणि माहिती आयुक्त, असा आहे;
(ड.) “सक्षम प्राधिकारी” याचा अर्थ -
(i) लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा
अशा प्रकारच्या सभा असणाज्या संघराज्य क्षेत्राच्या
बाबतीत, अध्यक्ष आणि राज्यसभा किंवा राज्य विधान
परिषद यांच्या बाबतीत सभापती;
(ii) सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, भारताचा मुख्य
न्यायमूर्ती;
(iii) उच्च न्यायालयाच्या बाबतीत, उच्च न्यायालयाचा
मुख्य न्यायमूर्ती;
(iv) संविधानाव्दारे किंवा तद्न्वये स्थापन किंवा घटित करण्यात
आलेल्या अन्य प्राधिकरणाच्या बाबतीत
यथास्थिती, राष्ट्रपती किंवा राज्यपाल;
(v) संविधानाच्या अनुच्छेद 239 अन्वये नियुक्त करण्यात आलेला
प्रशासक असा आहे;
(च) “माहिती” याचा अर्थ कोणत्याही
स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून
त्यामध्ये अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना,
प्रसिध्दीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविदा,
अहवाल, कागदपत्र, नमुने, प्रतिमाने/(मॉडेल),
कोणताही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील अधार
सामग्री आणि त्या त्या वेळी अंमलात
आलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक
प्राधिकरणास मिळविता येईल अशी
कोणत्याही खाजगी निकायाशी
संबंधित माहिती, यांचा समावेश होतो;
(छ) “विहित” याचा अर्थ यथास्थिती, समुचित शासन किंवा
सक्षम प्राधिकारी यांनी या अधिनियमान्वये
तयार केलेल्या नियमाव्दारे विहित केलेले असा आहे;
(ज) “सार्वजनिक प्राधिकरण” याचा अर्थ,-
(क) संविधानाव्दारे किंवा तदन्वये;
(ख) संसदेने तयार केलेल्या कोणत्याही अन्य
कायद्याव्दारे;
(ग) राज्य विधान मंडळाने तयार केलेल्या कोणत्याही
अन्य कायद्याव्दारे;
(घ) समुचित शासनाने काढलेल्या अधिसूचनेव्दारे किंवा आदेशाव्दारे
स्थापन करण्यात आलेले किंवा घटित करण्यात आलेले
कोणतेही प्राधिकरण किंवा निकाय किंवा स्वराज्य संस्था
असा आहे ,
आणि त्यामध्ये,-
(i) समुचित शासनाची मालकी असलेला, त्याचे
नियंत्रण असलेला किंवा त्याच्याकडून निधीव्दारे ज्याला
प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मॊठ्या प्रमाणात वित्त पुरवठा
केला जातो असा निकाय;
(ii) समुचित शासनाकडून निधीव्दारे जिला प्रत्यक्षपणे
किंवा अप्रत्यक्षपणे मॊठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जाते
अशी अशासकीय संघटना याचा समावेश होतो
(झ) “अभिलेख” या मध्ये-
(क) कोणताही दस्तऐवज, हस्तलिखित व फाईल;
(ख) एखाद्या दस्तऐवजाची
कोणतीही मायक्रोफिल्म, मायक्राफिश आणि
प्रतिरूप प्रत;
(ग) अशा मायक्रोफिल्ममध्ये संग्रहित केलेल्या
प्रतिमेची किंवा प्रतिमांचे
कोणतीही नक्कल (मग ती
परिवर्धित केलेली असो या नसो) ; आणि
(घ) संगणकाव्दारे किंवा कोणत्याही अन्य उपकरणाव्दारे
तयार केलेले कोणतेही अन्य साहित्य यांचा समावेश
होतो;
(ञ) “माहितीचा अधिकार” याचा अर्थ,
कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे
असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली
व या अधिनियमान्वये मिळवता येण्याजोगी
माहिती मिळविणाज्याचा अधिकार, असा आहे आणि
त्यामध्ये-
(i) एखादे काम, दस्तऐवज, अभिलेख यांची
पाहणी करणे;
(ii) दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखाच्या टिप्पण्या, उतारे किंवा प्रमाणित
प्रती घेणे;
(iii) सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे;
(iv) डिस्केट् , फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट या
स्वरूपातील किंवा कोणत्याही अन्य
इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती किंवा
जेव्हा अशी माहिती संगणात किंवा अन्य
कोणत्याही उपकरणात साठविलेली असेल
त्याबाबतीत मुद्रित, प्रती (प्रिन्टआऊट)
माहिती मिळविणे; याबाबतच्या अधिकाराचा समावेश होतो;
(ट) “राज्य माहिती आयोग” याचा अर्थ, कलम 15 च्या
पोटकलम (1) अन्वये घटित केलेला राज्य माहिती आयोग
असा आहे;
(ठ) “राज्य मुख्य माहिती आयुक्त” आणि “राज्य
माहिती आयुक्त” याचा अर्थ, कलम 15 च्या पोटकलम
(3) अन्वये नियुक्त केलेला राज्य मुख्य माहिती
आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त असा आहे;
(ड) “राज्य जन माहिती आयुक्त” याचा अर्थ, पोट-
कलम (1) अन्वये पदनिर्देशित केलेला राज्य जन
माहिती अधिकारी, असा आहे आणि
त्यामध्ये, कलम 5 च्या पोटकलम (2) अन्वये अशाप्रकारे
पदनिर्देशित केलेल्या राज्य सहायक जन माहिती
अधिकाज्याचा समावेश होतो;
(ढ) “त्रयस्थ पक्ष” याचा अर्थ, माहिती
मिळण्याची विनंती करणारी
नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती,
असा आहे आणि त्यामध्ये, सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो.
उत्तर लिहिले · 21/9/2017
कर्म · 1860
0

माहितीचा अधिकार (Right to Information) म्हणजे नागरिकांना शासकीय आणि निम-शासकीय संस्थांकडून माहिती मिळवण्याचा हक्क आहे. हा अधिकार भारत सरकारने 2005 मध्ये लागू केला, ज्याद्वारे लोकांना सरकार कसं काम करतं हे जाणून घेण्याचा अधिकार मिळाला.

माहिती अधिकार कायद्याची उद्दिष्ट्ये:

  • शासकीय कामकाज अधिक पारदर्शक करणे.
  • भ्रष्टाचार कमी करणे.
  • नागरिकांना सशक्त करणे.
  • सरकारी Authorities च्या कामाकाजावर लक्ष ठेवणे.

माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी:

  • माहिती मागवण्याचा अधिकार: कोणताही नागरिक अर्ज करून माहिती मागू शकतो.
  • वेळेची मर्यादा: जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची फी: अर्ज करण्यासाठी नाममात्र फी असते.
  • माहिती न देण्याचे कारण: माहिती नाकारल्यास त्याचे योग्य कारण देणे आवश्यक आहे.
  • अपील करण्याचा अधिकार: माहिती न मिळाल्यास उच्च अधिकार्‍यांकडे अपील करता येते.

माहिती अधिकार कसा वापरावा:

  1. एका साध्या कागदावर किंवा Online अर्ज करा.
  2. तुम्हाला नेमकी काय माहिती पाहिजे आहे ते स्पष्टपणे सांगा.
  3. अर्ज भरून संबंधित कार्यालयात जमा करा.
  4. जर 30 दिवसांत माहिती मिळाली नाही, तर अपील करा.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

गहाण खत म्हणजे काय?
Sale deed म्हणजे काय?
इच्छापत्र म्हणजे काय?
दस्तऐवजांची नोंदणी - कलम १७, १८ भारतीय नोंदणी कायदा?
विश्वस्तपत्र म्हणजे काय?
खरेदी प्रमाणे माझी जागा १५ फूट पूर्व पश्चिम २८ फूट आहे, तरी मला माझी जागा पूर्णपणे मिळू शकते का?
खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?