राजकारण कायदा संविधान अधिकारी आणीबाणी

राष्ट्रपतीचे अधिकार वाचताना आले की राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतो व तेथील विधिमंडळ बरखास्त करून राजवट जारी करू शकतात, म्हणजे नेमके हे अधिकार काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

राष्ट्रपतीचे अधिकार वाचताना आले की राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतो व तेथील विधिमंडळ बरखास्त करून राजवट जारी करू शकतात, म्हणजे नेमके हे अधिकार काय आहेत?

5
 देशात किंवा राज्यात घटनात्मक पेचप्रसंग उद्भभवल्यास राष्ट्रपतीना आणीबाणी विषयक तरतुदीअंतर्गत (कलम ३५२ ते ३६०) भारतीय राज्यघटनेत काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यांपैकी कलम ३५६ नुसार राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतीनां आहे. एखाद्या राज्यातील शासनयंत्रणा  कोलमडल्यास, घटनेप्रमाणे सरकारी कारभार चालू शकणार नाही, अशी राज्यपालाचीकेंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीयराजधानी दिल्लीमध्ये नायाब राज्यपाल हे पद असून, त्यांनाही राज्यपालांइतकेच अधिकार आहेत. राज्य राज्यघटनेत ३ प्रकारच्या आणीबाणीचे उल्लेख आहे.राष्ट्रीय आणीबाणी. आर्थिक आणीबाणी. राष्ट्रपती राजवट
    कलम ३५६ मध्ये राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीची पूर्वअट :
कलम ३५६ - राज्याचे प्रशासन घटनात्मक पद्धतींना अनुसरून चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लावण्यात येऊ शकते
कलम ३६५ - राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यास त्या राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे कायदेशीर असेल.(राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कुठलाही निर्णय राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने घेत नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर घेत असतात. कलम- ७४कालावधी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक आहे. लोकसभा विसर्जितअसताना जर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली असेल तर आधी राज्यसभेने त्यास मान्यता द्यावी व लोकसभा पुनर्गठीत होण्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत लोकसभेची मान्यता मिळवावी. ही मान्यता साध्या बहुमताने मिळवली जाते.संसदेची मान्यता मिळाल्यानंतर त्या राज्यात सहा महिन्यांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू असते. त्यापुढे कालावधी वाढवायचा असल्यास परत संसदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. अशी दर सहा महिन्यांनी मान्यता मिळवून राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त तीन वर्षे लागू राहू शकते.राष्ट्रपती शासनाचे मुख्य परिणामराज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्रे राष्ट्रपती आपल्या हातात घेऊ शकतात (म्हणजेच केंद्र सरकारच्या हातात).राज्य विधिमंडळाचे सर्व कार्य संसदेकडे दिले जाऊ शकते.राज्याचे शासन राष्ट्रापतींच्या वतीने राज्यपाल चालवतात. राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने हे कार्य पार पाडतात.

  राष्ट्रपती राजवट आणि न्यायालयीन पुनरावलोकन : राष्ट्रपती राजवट लादणे हे न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कार्यकक्षेत येते.राष्ट्रपती राजवट असंविधानिक पद्धतीने लादण्यात आलेली असल्यास न्यायालय त्याला अवैध घोषित करू शकते.राष्ट्रपती राजवट अवैध असल्याचे आढळल्यास न्यायालय राज्य सरकारला पुनर्स्थापित करू शकते.राज्य सरकारने बहुमत गमावले आहे की नाही हे त्या राज्याच्या विधी मंडळात ठरविण्यात यावे. तो पर्यंत मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात येऊ शकतनाही.संसदेच्या मान्यतेनंतरच विधिमंडळ बरखास्त होते. तो पर्यंत ती फक्त निलंबित (suspended) राहते. राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावर बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, राष्ट्रपती राजवट या पर्यायाचा फक्त अत्यंत बिकट परिस्थितीत केला पाहिजे. हा पर्याय शेवटचा पर्याय असावा. मात्र, स्वातंत्र्यानंतर हा पर्याय वारंवार वापरण्यात आला. हा पर्याय वारंवार वापरणे लोकशाहीच्या हिताचे नव्हे. राष्ट्रपती राजवटीचा वापर लोकशाही वाचवण्यासाठी झाला पाहिजे. राष्ट्रपती राजवटीमुळे लोकशाही कुमकुवत होणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
उत्तर लिहिले · 29/8/2017
कर्म · 210095
0
राष्ट्रपती आणीबाणी (President's rule) आणि राजवट (Proclamation of Emergency) यांबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

आणीबाणी (Emergency):

  • भारतीय राज्यघटनेच्या कलम 352, 356 आणि 360 अंतर्गत राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात.
  • आणीबाणी तीन प्रकारची असते:
    • राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency): युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड या कारणांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते.
    • राजकीय आणीबाणी (President's Rule): जेव्हा एखाद्या राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडते, म्हणजे सरकार व्यवस्थित चालू शकत नाही, तेव्हा कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. याला 'राजकीय आणीबाणी' असेही म्हणतात.
    • आर्थिक आणीबाणी (Financial Emergency): जेव्हा देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होतो, तेव्हा कलम 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी घोषित केली जाते.

राष्ट्रपती राजवट (President's Rule):

  • कलम 356 नुसार, जर राज्यपालांनी राष्ट्रपतींना अहवाल पाठवला की राज्यातील सरकार घटनेनुसार काम करू शकत नाही, किंवा केंद्र सरकारला खात्री पटली की राज्याची घटनात्मक यंत्रणा अयशस्वी झाली आहे, तर राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात.
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर, राज्याचे विधिमंडळ तात्पुरते निलंबित किंवा बरखास्त केले जाते.
  • राज्याचा कारभार राज्यपाल राष्ट्रपतींच्या वतीने पाहतात. याचा अर्थ राज्याचे निर्णय केंद्र सरकार घेते.
  • या काळात राज्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला मिळतो.

अधिकार काय आहेत:

  • विधिमंडळ बरखास्त करणे: राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर राष्ट्रपती राज्याचे विधिमंडळ बरखास्त करू शकतात.
  • राजवट जारी करणे: याचा अर्थ राज्याचा कारभार राष्ट्रपतींच्या हाती येतो आणि ते राज्यपालांच्या मदतीने तो चालवतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

आणीबाणीचे नागरिकांवरील दोन परिणाम काय?
आणीबाणी म्हणजे काय माहिती?
आणीबाणी तरतुदी आणि राष्ट्रपती राजवट या विषयाची प्रस्तावना काय आहे?
आणीबाणी तरतुदी आणि राष्ट्रपती राजवट याबद्दल माहिती मिळेल का?
आणीबाणीला म्हणजे काय ?
आणीबाणी कशामुळे लागू केल्या जातात?
आणीबाणी म्हणजे काय आणि ती का लागू करतात?