आणीबाणीला म्हणजे काय ?
आणीबाणी म्हणजे कोणत्या एखाद्या व्यक्तीने लोकशाहीच्या नियमांचा भंग करून सर्व अधिकार स्वःताकडे घेणे आणि न्यायव्यवस्था, लष्कर, पत्रकारिता या सर्वांचे अधिकार कमी करून देशात एकप्रकारचे राजकीय अस्थैर्य निर्माण होणे याला राजकीय आणीबाणी म्हणतात.
आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.
मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.
आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते.
आणीबाणीला म्हणजे काय ?
घटनेने प्रत्येक नागरिकाला काही मुलभूत अधिकार दिलेले असतात. अर्थात काही मूलभूत अधिकारांवर मर्यादासुद्धा आहेत उदाहरणार्थ वाचास्वातंत्र्य आहे म्हणून काही स्फोटक विधाने करणे अथवा एखाद्या धर्माला उद्देशून अपप्रचार करणे किंवा भडकाऊ भाष्य अपेक्षित नाही.
असे असूनही काही विशिष्ट परिस्थितीत या मूलभूत अधिकारांवर अधिक कठोर मर्यादासुद्धा आणता येतात. जेव्हा घटनात्मक तरतुदींचा वापर करून कायद्याचा वापर करून या मुलभूत अधिकारांवर काही काळासाठी मर्यादा घातल्या जातात त्याला आणीबाणी असे म्हणतात.
उदाहरणार्थ - १. शत्रूकडून आक्रमण झाल्यास युद्धप्रसंगी
२. देश प्रचंड आर्थिक संकटात असेल तर आणि
३. प्रचंड राजकीय अस्थैर्य असल्यास मुलभूत अधिकारांवर मर्यादा आणता येतात.
For personal question
Use My FB Page
https://www.facebook.com/TheRajini/
Mr. Rajini