3 उत्तरे
3
answers
आणीबाणी कशामुळे लागू केल्या जातात?
4
Answer link
भारताच्या राज्यघटनेत तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करण्यात अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे, इतर देशात हा अधिकार संसदेला आहे.
@ राष्ट्रीय आणीबाणी – National Emergency@
------------------------–---------------------------------/----
राष्ट्रहितासाठी कोणताही मोठा धोका किंवा युद्ध परिस्थिती असल्यास देशात आणीबाणी लागू करू शकतात. भारतात २५ जून १९७५ च्या मध्यरात्री राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती. आपल्याविरुद्ध वाढता राजनीतिक विरोध पाहता त्यावेळच्या प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली होती. भारतीय संविधानातील आर्टिकल – ३५२ द्वारा ही तेव्हा लागू करण्यात येते, याची घोषणा करतात. युद्धपरिस्थिती किंवा लष्करातील बंड झाल्यास राष्ट्रीय आणीबाणी लागू होते. यामध्ये युद्धपरिस्थिती असल्यास External Emergency आणि लष्करातील बंड झाल्यास Internal Emergency असे दोन प्रकार आहेत. महत्वाची गोष्ट अशी कि कॅबिनेटने लिखित स्वरुपात सांगितल्याशिवाय राष्ट्रपती याची घोषणा शकत नाहीत.
@ राज्यातील आणीबाणी( State Emergency)@
----–-------------------------------------------------^--------
संविधानातील आर्टिकल-३५६ द्वारा ही तेव्हा लागू करण्यात येते जेव्हा एखाद्या राज्यात संविधानिक मशिनरी विफल होते याला आजच्या भाषेत राष्ट्रपति शासन असेही म्हणतात.
@ आर्थिक आणीबाणी ( Financial Emergency)
------–-------------------------------------------------------
देशाची वित्तीय स्थिती जेव्हा धोक्यात येते तेव्हा भारतीय संविधानातील आर्टिकल-३६० द्वारा Financial Emergency राष्ट्रपतीद्वारा लागू होते. यामध्ये राज्यातील सगळा वित्तीय कारभाराचा अधिकार केंद्राकडे येतो तसेच यावेळी सरकारी अधिकाऱ्यांचे पगार कमी करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. विशेष म्हणजे भारतात आतापर्यन्त एकदाही Financial Emergency लागू करण्यात आली नाही.

0
Answer link
सर्वसाधारणपणे युद्ध, अंतर्गत गोंधळ, बंडाळी, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी यांसारख्या परिस्थितीत आणीबाणी लादली जाते.
0
Answer link
आणीबाणी (Emergency) लागू करण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- बाह्य आक्रमण (External Aggression): जेव्हा एखाद्या देशावर परकीय शक्ती आक्रमण करते, तेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणीबाणी लागू केली जाऊ शकते.
- युद्ध (War): युद्धाच्या परिस्थितीत देशाची सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी आणीबाणी लागू केली जाते.
- अंतर्गत अशांतता (Internal Disturbance): देशात अंतर्गत अशांतता, दंगे किंवा सशस्त्र बंडखोरी झाल्यास, सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणीबाणी लागू करू शकते.
- घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन (Violation of Constitutional Provisions): जेव्हा देशातील सरकार घटनात्मक तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी ठरते, तेव्हा आणीबाणी लागू केली जाऊ शकते.
- आर्थिक संकट (Economic Crisis): गंभीर आर्थिक संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यास, सरकार आणीबाणी लागू करू शकते.
आणीबाणीच्या काळात, सरकारला विशेष अधिकार मिळतात आणि मूलभूत हक्कांवर निर्बंध लादले जाऊ शकतात.