2 उत्तरे
2 answers

आणीबाणी या विषयी पीपीटी बनवायची आहे, काय करू?

6
सुमारे ३९ वर्षांपूर्वी २५ जून रोजी भारतात आणीबाणी लागू झाली होती. ही आणीबाणी लादण्याचा अधिकार कोणाला आहे, ती कधी, केव्हा, कोणत्या परिस्थितीत लादता येते, हे जरा जाणून घेऊ या. २५ जून १९७५ रोजी देशात पहिल्यांदा आणीबाणी लादण्यात आली होती. यासंदर्भात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशाला रात्री ११ च्या सुमारास मंजुरी दिली. विशेष म्हणजे इंदिरा गांधींचा हा निर्णय त्यांच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनाच माहिती होता. मंत्र‌िमंडळातील सर्व सहकाऱ्यांनाही त्याची कल्पना नव्हती. आणीबाणी लादण्यास पंतप्रधानांची मंजुरी असल्यास मंत्र‌िमंडळाची संमतीची गरज नाही, असा निर्वाळा कायदेतज्ञ आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल सिद्धार्थ शंकर यांनी दिल्यानंतर राष्ट्रपतीही आणीबाणी लादण्यास तयार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी बीबीसीवरून देशातील नागरिकांना ही बातमी कळली. 

भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. भारतीय राष्ट्रपतीचा आणीबाणीच्या उद्‌घोषणेचा अधिकार हा संपूर्णपणे स्वेच्छाधीन आहे. त्याची न्यायालयीन चौकशी होऊ शकत नाही. ही परिस्थिती इतरत्र नाही. इतर देशात सर्वसाधारणपणे हा अधिकार सर्वसाधारणपणे संसदेला आहे. फ्रान्समध्ये आणीबाणीची घोषणा संसद करू शकते. संसदेचं अधिवेशन चालू नसेल, तर अध्यक्षाला मंत्रिमंडळाच्या अनुमतीने अशी उद्‌घोषणा करता येते; पण त्याने संसदेची बैठक दोन दिवसांच्या आत बोलाविली पाहिजे. जर संसद बरखास्त झाली असेल, तर अध्यक्षाला आणीबाणी उद्‌घोषित करण्याचा अधिकार नाही. इंग्लंडमध्ये राजाला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे; पण ती घोषणा पार्लमेंट बोलावून मंजूर करणं गरजेचं आहे. लॅटिन अमेरिकेमध्येही उद्‌घोषणा करण्याचा अधिकार संसदेलाच आहे. ऑस्ट्रेलियातही सरकार संसदेच्या पाठिंब्याशिवाय किंवा मर्जीशिवाय आणीबाणी जाहीर करू शकत नाही. आणीबाणीच्या घोषणेमुळे राज्यांचे कायदे करण्याचे अधिकार स्थगित होतात. तसंच राज्य सरकारवर पूर्ण नियंत्रण येतं. या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित होतात, तसेच त्यासंबंधी कोर्टात दाद मागण्याची परवानगीही राष्ट्रपती फेटाळू शकतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशात अशी परिस्थिती नाही. 

सर्वसाधारणपणे युद्ध, अंतर्गत गोंधळ, बंडाळी, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी यांसारख्या परिस्थितीत आणीबाणी लादली जाते. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संविधानाने आणीबाणीच्या काळासाठी जेवढे विस्तृत व विशाल अधिकार सरकारला दिलेले आहेत, तेवढे इतर कोणत्याही देशाच्या सरकारला नाही. भारतात राष्ट्रीय आणीबाणी, राज्यासाठी आणीबाणी व आर्थिक आणीबाणी अशा तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करता येतात. इतर देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची पद्धत नाही.
उत्तर लिहिले · 24/9/2017
कर्म · 5180
0
तुमच्या 'आणीबाणी' या विषयावरील पीपीटी (PowerPoint Presentation) साठी काही उपयोगी मुद्दे आणि माहिती खालीलप्रमाणे:

आणीबाणी: প্রেজেন্টেশনसाठी সহায়ক मुद्दे

1. आणीबाणीची घोषणा:

  • आणीबाणी म्हणजे काय?
  • घटनेतील कोणत्या कलमांनुसार आणीबाणी घोषित केली जाते? (कलम 352, 356, 360)
  • आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
  • आणीबाणीची कारणे काय असू शकतात? (युद्ध, बाह्य आक्रमण, अंतर्गत अशांती)

2. भारतातील आणीबाणी (१९७५-१९७७):

  • आणीबाणीची पार्श्वभूमी काय होती?
  • तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी का घोषित केली?
  • आणीबाणीच्या दरम्यानच्या प्रमुख घटना कोणत्या होत्या?
  • व्यक्तीस्वातंत्र्यावर आणि नागरिकांच्या हक्कांवर काय परिणाम झाला?
  • अटक आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना.
  • आणीबाणीच्या काळात झालेले बदल आणि परिणाम.

3. आणीबाणीचे परिणाम:

  • राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांवर काय परिणाम झाले?
  • लोकशाही संस्थांचे कार्य कसे चालले?
  • प्रेस आणि माध्यमांवर कोणते निर्बंध होते?
  • आणीबाणीनंतर झालेले बदल आणि सुधारणा.

4. आणीबाणी: एक विश्लेषण:

  • आणीबाणीच्या समर्थनातील आणि विरोधातील युक्तिवाद.
  • आणीबाणीच्या अनुभवातून काय शिकायला मिळते?
  • भारतीय लोकशाहीवर आणीबाणीचा काय प्रभाव आहे?
  • संवैधानिक तरतुदी आणि त्यांची अंमलबजावणी.

5. निष्कर्ष:

  • आणीबाणीच्या इतिहासाचे महत्त्व.
  • लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची आवश्यकता.
  • भविष्यात आणीबाणी टाळण्यासाठी काय उपाय केले जावेत?

टीप: प्रत्येक मुद्द्याला स्पष्ट करण्यासाठी आकडेवारी, छायाचित्रे आणि संबंधित कागदपत्रे वापरा.

हे मुद्दे तुम्हाला 'आणीबाणी' या विषयावर प्रभावी প্রেজেন্টेशन बनवण्यासाठी मदत करतील.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स?
लोकरीची आणि लोकनीती?
शीतयुद्ध काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली?
विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे?
न्यायमंडळ कार्यकारी मंडळ काय आहे?
73 व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला?