व्यवसाय मार्गदर्शन शिक्षण कायदा वकील

सर, मला एल.एल.बी. या क्षेत्रात करियर करायचे आहे. मला त्याबद्दल माहिती देता का? किती वर्षे करावे लागते?

2 उत्तरे
2 answers

सर, मला एल.एल.बी. या क्षेत्रात करियर करायचे आहे. मला त्याबद्दल माहिती देता का? किती वर्षे करावे लागते?

4
कायदा विषयाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. साधारणत: दोन टप्प्यांवर कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश खुले होतात. त्यातील एक म्हणजे बारावीनंतर निवडला जाणारा अभ्यासक्रम. हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यासाठी बारावीची परीक्षा किमान ४५ टक्क्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. या पाच वर्षात कायद्याविषयीचे एकूण ४० विषय शिकवले जातात. त्या विषयांध्ये कायद्याशी संबंधितअसलेले समाजशास्त्रविषयक अभ्यासक्रम आणि पर्यायी तसेच प्रात्यक्षिकांचे विषय अशी विभागणी केलेली असते. पहिल्या तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सोशल लॉज या विषयातील पदवी मिळते. ही पदवी इतर क्षेत्रातील पदव्यांशी समांतर आहे. ही पदवी मिळवलेला विद्यार्थी इतर स्पर्धात्मक परीक्षांनाही बसू शकतो. पाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला एलएलबी ही पदवी मिळते. त्यानंतर सनदघेऊन वकिलीला सुरुवात करता येते. हा मार्ग गेल्या काही वर्षांपासून खुला करण्यात आलाआहे. दुसर्या मार्गाने म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी घेतल्यावर पुढे तीन वर्षांचा अभ्यासक्रम पार पाडून वकिलीची पदवी घेण्याच्या मार्गाने या क्षेत्रात प्रवेश करता येतो. ही पहिली पदवी कला, वाणिज्य किंवा विज्ञान या कोणत्याही शाखेची असली तरी चालते. त्या पदवीपरीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळवणे अपेक्षित असते. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात एकूण २८ विषयांचा अभ्यास करायचा असतो. त्यात कायद्याचे २१ आवश्यक विषय, तीन पर्यायी विषय तर प्रात्यक्षिकाचे चार विषय असतात. या पदवीनंतरही सनद घेऊनच वकिली व्यवसाय सुरु करता येतो. तीन वर्षीय किंवा पाच वर्षीय अभ्यासक्रम बहुतेक मोठ्या शहरातील निरनिराळया महाविद्यालयांध्ये उपलब्ध आहेत. पुण्याचे लॉ कॉलेज, सोलापूरचे डी.जी.बी. दयानंद लॉ कॉलेज आदी महाविद्यालये यासाठी प्रसिध्द आहेत. एलएलबीची पदवी मिळवल्यानंतर केवळ वकिलाचाच व्यवसाय करता येतो असं नाही. तर त्यापुढेही शिक्षण घेता येते. एलएलबीनंतर पुढे एलएलएम हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकता येतो. या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवले की कोणत्याही महाविद्यालयात पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून नोकरी करता येते. आजकाल महाराष्ट्रातील विधी महाविद्यालयां ध्ये अशा प्रकारच्या प्राध्यापकांसाठी नव्यानेजागा निर्माण करुन देण्यात आल्या आहेत. त्याचा ङ्गायदा नवीन उमेदवारांना घेता येईल. दुसरा मार्ग म्हणजे तीन वर्ष वकिली केल्यानंतर न्यायाधीश म्हणून काम पाहणे. त्यासाठी वेगळया परीक्षा द्याव्या लागतात.त्यानंतर त्याला जेएमएङ्गसी. किंवा सीजेजेडी म्हणून काम पाहता येते. न्यायाधीशाला समाजात असलेलं स्थान आणि मानपाहता ही नोकरी अनेकांना आकर्षित करते. न्यायाधीशाला सेवानिवृत्ती- नंतर पेन्शन आणि ग्रॅज्युएटीसारख्या सुविधाही मिळतात. वकिली व्यवसायातील आणखी एक चांगली संधी म्हणजे सरकारी वकील म्हणून काम पाहणे. ही नोकरीही व्यवसायाच्या तुलनेत अधिक शाश्वत असते. वकील किंवा न्यायाधीश म्हणून काम पहायचे नसेल तर कायदासल्लागार हे पदही कायद्याच्या पदवीधारकांसाठी खुले आहे. आजकाल विविध खाजगी कंपन्या, सहकारी तत्वावर चालणार्या कंपन्या किंवा बँका, साखर कारखाने, शिक्षणसंस्था आणि उद्योगधंदे यामध्ये कायदेशीर सल्लागाराचीने णूक करणे अपरिहार्य असते. अशा ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून मॅनेजरच्या दर्जाची नोकरी मिळू शकते. कायद्याचा अभ्यास निरनिराळया विषयांना धरुन करता येतो. गुन्हेगारीविषयक कायदा, कौटुंबिक तंटे सोडवण्यासाठी असलेल्या कायद्याच्या तरतूदी किंवा सामान्य व्यवहारात लागणारं कायद्याचं ज्ञान अशा अनेक अंगांनी कायद्याचा विचार होतो. त्यापैकी एका विषयात विशेष प्राविण्य मिळवून त्या विषयाची प्रॅक्टीस करता येते. वकिली करणं हा प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जातो.
उत्तर लिहिले · 3/7/2017
कर्म · 210095
0

नमस्कार,

एल.एल.बी. (Legum Baccalaureus किंवा Bachelor of Laws) ही कायद्याच्या क्षेत्रातील पदवी आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात करियर करायचे असेल, तर निश्चितच ही चांगली गोष्ट आहे. एल.एल.बी. विषयी काही माहिती खालीलप्रमाणे:

एल.एल.बी. करण्यासाठी पात्रता:
  • बारावी उत्तीर्ण: कोणत्याही शाखेतून (Arts, Commerce, Science) बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एल.एल.बी.साठी अर्ज करू शकतात.
  • पदवीधर: कोणत्याही विषयातून पदवी (Graduation) घेतलेले विद्यार्थी देखील एल.एल.बी.साठी अर्ज करू शकतात.
एल.एल.बी. चे प्रकार आणि कालावधी:
  1. 3 वर्षे एल.एल.बी. (3 Year LL.B.): ही पदवी फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी कोणत्याही विषयातून पदवी (Graduation) पूर्ण केली आहे.
  2. 5 वर्षे एल.एल.बी. (5 Year LL.B.): हा कोर्स बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करता येतो. यात बीए एल.एल.बी. (BA LL.B.), बीबीए एल.एल.बी. (BBA LL.B.), बी.कॉम एल.एल.बी. (B.Com LL.B.), आणि बीएससी एल.एल.बी. (B.Sc LL.B.) असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
प्रवेश प्रक्रिया:
  • प्रवेश परीक्षा: अनेक लॉ कॉलेजेस प्रवेश परीक्षा घेतात, जसे की एमएचसीईटी लॉ (MHCET Law), CLAT (Common Law Admission Test), LSAT (Law School Admission Test).
  • गुणवत्ता: काही कॉलेजेस बारावी किंवा पदवीच्या गुणांवर आधारित प्रवेश देतात.
एल.एल.बी. नंतर करियरचे पर्याय:
  • वकील (Advocate): कोर्टात प्रॅक्टिस करू शकता.
  • न्यायाधीश (Judge): परीक्षा देऊन न्यायाधीश बनू शकता.
  • कायदेशीर सल्लागार (Legal Advisor): कंपन्या आणि संस्थांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करू शकता.
  • सरकारी वकील (Public Prosecutor): सरकारसाठी कोर्टात केस लढू शकता.
  • शिक्षण (Teaching): लॉ कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करू शकता.
भारतातील काही प्रमुख लॉ कॉलेजेस:

तुम्हाला या संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास, जरूर विचारा.

धन्यवाद!

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5220

Related Questions

राईट ऑफ कंजूमर सविस्तरपणे स्पष्ट करा?
ग्राहकांचे हक्क काय आहेत ते स्पष्ट करा?
विचार न करता केलेले करार निरर्थक का मानले जातात, स्पष्ट करा?
करार म्हणजे काय? कराराचे विविध प्रकार स्पष्ट करा.
आफ्रिकन मानव अधिकारांचा मानवाधिकार विषयक युरोपियन करार विषयी सविस्तर माहिती?
अधिकाराचा कायदेविषयक सिद्धांत स्पष्ट करा?
सत्यप्रत म्हणजे नक्की काय?