7 उत्तरे
7 answers

गुढीपाडवा सण का साजरा करतात?

21
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.

ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.

राम अयोध्येला परत आला. रामाने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते. गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे.

माझ्या जीवाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी || असेही संतवचन आहे. त्यानुसार गुढी याचा अर्थ भगवी पताका असाही घेता येउ शकेल. त्यामुळे हिंदू धर्माचे प्रतीकस्वरूप असा भगवा ध्वजही अवश्य लावावा.आर्या जोशी (चर्चा)हा दिवस भरपुर उत्साहाचा असतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला उगादी असे म्हणतात.




संदर्भ अणि अधिक माहिती
उत्तर लिहिले · 17/3/2017
कर्म · 20855
7
👉 *उद्या गुढीपाडवा! जाणून घ्या महत्व!*


💫 आज रोजी गुढीपाडवा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाची सुरुवात. या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्याची साग्रसंगीत पूजा केली जाते.
*_🤔गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात?_*

_गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात._

*_💁महाभारतात उल्लेख_*
महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.महाभारतातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते. कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस.

*_💁शालिवाहन शक_*
तसेच याच दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.

*_💁गुढी शब्दाची उकल_*
तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे. तसाच तो 'तोरण' असाही आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. त्यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असावा.

👍 गुढीपाडवा म्हणजेच वर्षप्रतिपदा शककर्त्या शालिवाहन राजाने जी कालगणना सुरू केली त्याचे नवीन वर्ष शके 1945 हे उद्या म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होणार

🙏 याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. तसेच ब्रम्हदेवाने सृष्टीची याच दिवशी निर्मिती केली असे मानले जाते.


*_◼जाणून घेऊया या सणाच महत्व_*
हिंदू कॅलेंडरप्रमाणे हा दिवस वर्षातील पहिला दिवस मानला जातो. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो. ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. तसेच याच दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.

*_◼असं केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत_*
ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. परंपरा जुनी म्हणजे किती तर असं सांगतात की त्या ब्रह्मदेवानं जेव्हा ही सकल सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस

*कडुनिंब प्रत्येक आजारावर गुणकारी*
*जाणून घ्या गुढी पाडवा सणातील विज्ञान*

*कडूनिंब भक्षणाचे फायदे, त्या आधारे कोणकोणते आजार बरे होतात ते आपण या व्हिडीओ मध्ये जाणून घ्याल.*

https://youtu.be/QVUC14-sIiA

🌄 सूर्योदयाला घरासमोर उंच जागेवर गुढी उभारून तिची पूजा करावी.

▪ गुढी उभारताना सर्वप्रथम अंगणात रांगोळी काढून सुशोभित करावे. तसेच गुढी ज्या ठिकाणी उभारणार असाल त्या ठिकाणी स्वस्तिकचे चिन्ह काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.

▪ गुढी उभारताना साडी आणि कलश असणे अत्यंत महत्वाचे आहे.

▪ गुढी थोडीशी झुकलेल्या अवस्थेत उभी करावी.

▪ तसेच आंब्यांची पाने गुढीच्या टोकाला बांधावीत.

▪ या गुढीला कडुलिंबाची माळ घालावी.

▪ कडुनिंबाची कोवळी पाने व फुले आणून त्याचे चूर्ण करावे आणि त्यात मिरे, हिंग, मीठ, जिरे, ओवा, गूळ हे पदार्थ घालावेत. प्रसाद म्हणून हे द्यावे, हे चूर्ण आरोग्यास चांगले असते.

🎐 *गुडी पाडवा का साजरा करावा?*

📆 *मराठी नवीन वर्ष* :
▪ _हा सण मराठी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. मराठी नवीन वर्ष किंवा हिंदू नवीन वर्ष हे “चैत्र शुखला प्रतिपदा” या दिवशी साजरा होतो. म्हणजेच “गुडी पाडवा”_

🎇 *प्रभू श्री राम चंद्र यांचे अयोध्येत आगमन* :
▪ _काही लोकांचा असा ही विश्वास आहे कि प्रभू श्री राम चंद्र हे याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परतले. या वेळस “आयोध्याच्या लोकांनी” आनंद साजरा केला व आदरांजली व सन्मान म्हणून गुड्या उभारल्या._

🚩 *ब्रह्मध्वज किंवा हिंदुध्वज* :
▪ _या दिवशी “ब्रह्मदेव” यांनी हि सृष्टी निर्माण केली. “गुडी” म्हणजेच ब्रह्मदेवाचा ध्वज म्हणजेच हिंदू धर्माचा ध्वज असे असून ती काही लोक या दिवशी उभारतात._

📍 *गुढीपाडवा हा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो.*
उत्तर लिहिले · 5/4/2019
कर्म · 569225
0
गुढीपाडवा हा सण अनेक कारणांसाठी साजरा केला जातो, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • नवीन वर्षाची सुरुवात: गुढीपाडवा हा दिवस हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो.

    (स्रोत: महाराष्ट्र टाइम्स)

  • शालिवाहन शक सुरू: याच दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले, त्यामुळे हा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
  • वसंत ऋतूची सुरुवात: गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे, जो नवीन सुरुवात आणि समृद्धीचा काळ आहे.
  • राम आणि हनुमानाची कथा: काही लोकांच्या मान्यतेनुसार, याच दिवशी प्रभू राम रावणाला हरवून अयोध्‍येला परतले, त्यामुळे हा दिवस विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तसेच, हनुमानाने याच दिवशी देवाला मदत केली होती.
  • ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली: असे मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्यामुळे हा दिवस नवीन निर्मिती आणि जीवनाच्याCycleचा उत्सव आहे.
गुढीपाडवा हा सण नवीन आशा, आनंद आणि समृद्धी घेऊन येतो.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 860

Related Questions

सणांचा पर्यावरणावर होणारा परिणाम काय?
नागपंचमी आणि गोकुळ अष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत कसा लिहाल?
विद्यार्थ्यांना भाषा विकास सत्रात येणाऱ्या अडचणी ओळखण्यासाठी निदानात्मक चाचणी तयार करा?
चंपाषष्टी या सणाचे महत्व काय आहे?
कोणत्या पौर्णिमेला प्रत्येक घरी बहुधा करतात?
भारतातील सण उत्सवांचा पर्यावरणावर पडणारा दृश्य परिणाम कोणता?
संक्रांतीच्या सणाचे महत्त्व काय आहे?