गुढीपाडवा
6
Answer link
गुढीपाडवा साजरा करणे म्हणजे आपण जसे गुढी उभी करतो तसेच, फक्त साडी न घालता झेंडा लावणे व त्याला फुलांचा हार घालणे. व त्यानंतर खाली पाट ठेवणे, त्यावर आपल्या मनातील कडूपणा जावो, व गोडवा येवो यासाठी गुळ किंवा साखर आणि कडुनिंबाचा तोरण (फुले) यांचे मिश्रण व नैवेद्य दाखवून नमस्कार करणे.
0
Answer link
गुढीपाडव्याला तांब्या उलटा का लावतात याचे कारण खालीलप्रमाणे आहे:
spirituaalsay.com नुसार, गुढी पाडव्याच्या दिवशी तांब्या (कलश) उलटा ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत:
- समृद्धी आणि सकारात्मकता: तांब्या हे समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. तो उलटा ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
- वाईट शक्ती दूर: असे मानले जाते की तांब्या वाईट शक्तींना दूर ठेवतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो.
- ब्रह्मांडातील ऊर्जा: काही लोकांचा असा विश्वास आहे की तांब्या ब्रह्मांडीय ऊर्जा आकर्षित करतो आणि ती घरात प्रसारित करतो.
eknathgujar.blogspot.com नुसार, गुढी उभारताना तांब्या/कलश पालथा ठेवण्यामागे खालील कारणे आहेत:
- पृथ्वी तत्वाचे प्रतीक: कलश हा पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. तो पालथा ठेवल्याने पृथ्वीवरील सकारात्मकता आणि समृद्धी आकर्षित होते.
- नकारात्मक ऊर्जा दूर: कलश नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
याव्यतिरिक्त, काही लोकांचा असा विश्वास आहे की तांब्या हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे प्रतीक आहे, त्यामुळे तो उलटा ठेवल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
गुढीपाडव्याला तांब्या उलटा लावणे हे एक प्रतीकात्मक Ritual आहे, ज्याचा उद्देश घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आणणे आहे.
15
Answer link
गुरुचरणी प्रार्थना करूया ! हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात ‘गुढीपाडवा’. गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊन या लेखमालेचा आरंभ करूया !’
गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !
१. तिथी
युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा
२. वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ?
याचा प्रथम उद्गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. आच सर्वजण साजरा करत असलेल्या १ जानेवारीला वर्षारंभ का, याला शास्त्रीय आधार नाही.
याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
अ. गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व
– वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व
१. रामाने वालीचा वध केल्याचा दिवस
रामाने वालीचा वध या दिवशी केला.
ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.
२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस !
शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.
ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.
इ. गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व
१. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
२. १ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
गुढीपाडवा हा पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते.
गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल, तर ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारी हा नव्हे, तर गुढीपाडवा हाच नववर्षारंभ साजरा करण्यात आपले खरे हित आहे.’ – (सनातनच्या साधकाला ईश्वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान)
३. गुढीपाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

21
Answer link
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.
ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.
राम अयोध्येला परत आला. रामाने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते. गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे.
माझ्या जीवाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी || असेही संतवचन आहे. त्यानुसार गुढी याचा अर्थ भगवी पताका असाही घेता येउ शकेल. त्यामुळे हिंदू धर्माचे प्रतीकस्वरूप असा भगवा ध्वजही अवश्य लावावा.आर्या जोशी (चर्चा)हा दिवस भरपुर उत्साहाचा असतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला उगादी असे म्हणतात.

संदर्भ अणि अधिक माहिती