सण गुढीपाडवा

गुढीपाडवा का साजरा करतात ?

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.

ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.

राम अयोध्येला परत आला. रामाने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते. गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे.

माझ्या जीवाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी || असेही संतवचन आहे. त्यानुसार गुढी याचा अर्थ भगवी पताका असाही घेता येउ शकेल. त्यामुळे हिंदू धर्माचे प्रतीकस्वरूप असा भगवा ध्वजही अवश्य लावावा.आर्या जोशी (चर्चा)हा दिवस भरपुर उत्साहाचा असतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला उगादी असे म्हणतात.




संदर्भ अणि अधिक माहिती
1 उत्तर
1 answers

गुढीपाडवा का साजरा करतात ?

3
या प्रश्नाचे उत्तर आधी दिलेले आहे उत्तरसाठी खालील लिंक वर क्लिक करा.


गुढीपाडवा सण का साजरा करतात ?
उत्तर लिहिले · 2/6/2017
कर्म · 20855

Related Questions

कोणत्या मराठी महिन्यात दिवाळी सण येतो?
दिवाळीतील एका दिव्याचा भावार्थ हिंदीमध्ये स्पष्ट करा?
पिठोरी अमावस्या म्हणजे काय?
नारळी पौर्णिमा म्हणजे काय?
रक्षाबंधन म्हणजे काय?
गुरुपौर्णिमा/व्यास पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) बद्दल माहिती?
वसंत पंचमी म्हणजे काय?