3 उत्तरे
3
answers
योगाची अंगे किती आहेत?
2
Answer link
योगाची अंगे आठ आहेत.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत
योगाची अंगे 8 आहेत म्हणून अष्टांग योग म्हणतात.
1) यम 2 ) नियम 3) आसन 4) प्राणायाम 5 ) प्रत्याहार 6) धारणा 7 ) ध्यान 8) समाधी.
4) यम म्हणजे काय?
अहिंसा, सत्, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे यम.
* नियम म्हणजे काय? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान म्हणजे नियम.
* आसन म्हणजे काय?
आसन म्हणजे सुखाने सरळ स्थिर बसणे ( अशी 84 आसने आहेत.)
* प्राणायाम म्हणजे काय?
प्राणायाम म्हणजे प्राणाचा विरोध. श्वासोच्छवास क्रिया ज्या शक्तीने होते त्या शक्तीला प्राण असे म्हणतात.
* प्रत्याहार म्हणजे काय? *
चित्त अंतर्मुख करणे म्हणजे प्रत्याहार होय.
* धारणा व ध्यान म्हणजे काय?
धारणा म्हणजे चित्ताची एकाग्रता व ध्यान म्हणजे चिंतन.
★ समाधी म्हणजे काय?
समाधी म्हणजे तद्रूपता, चित्त वृत्तीचा विरोध, समाधीला तुर्या उन्मनी, मनोलय, सहजावस्था, शांती वगैरे नावे आहेत.
* लय आणि निक्षेप कशाला म्हणतात?
समाधी साधन करीत असता येणाऱ्या झोपेला लय म्हणतात व चित्त चंचल होणे, बहिर्मुख होणे याला निक्षेप म्हणतात.
0
Answer link
योगाची आठ अंगे आहेत, ज्याला अष्टांग योग म्हणतात. हे खालीलप्रमाणे:
- यम (Yama): सामाजिक नैतिकता किंवा नियम.
- नियम (Niyama): वैयक्तिक आचरण किंवा स्वयं-शिस्त.
- आसन (Asana): योगाच्या विविध शारीरिकPositions.
- प्राणायाम (Pranayama): श्वासावर नियंत्रण.
- प्रत्याहार (Pratyahara): इंद्रियांवर नियंत्रण.
- धारणा (Dharana): एकाग्रता.
- ध्यान (Dhyana): चिंतन.
- समाधी (Samadhi): अंतिम मुक्ती किंवा मोक्ष.
अधिक माहितीसाठी, आपण खालील साइटला भेट देऊ शकता: