Topic icon

योगासने

2
योगाची अंगे आठ आहेत.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत 
योगाची अंगे 8 आहेत म्हणून अष्टांग योग म्हणतात.

1) यम 2 ) नियम 3) आसन 4) प्राणायाम 5 ) प्रत्याहार 6) धारणा 7 ) ध्यान 8) समाधी.

4) यम म्हणजे काय?

अहिंसा, सत्, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे यम.

* नियम म्हणजे काय? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान म्हणजे नियम.

* आसन म्हणजे काय?

आसन म्हणजे सुखाने सरळ स्थिर बसणे ( अशी 84 आसने आहेत.)

* प्राणायाम म्हणजे काय?

प्राणायाम म्हणजे प्राणाचा विरोध. श्वासोच्छवास क्रिया ज्या शक्तीने होते त्या शक्तीला प्राण असे म्हणतात.

* प्रत्याहार म्हणजे काय? *

चित्त अंतर्मुख करणे म्हणजे प्रत्याहार होय.

* धारणा व ध्यान म्हणजे काय?

धारणा म्हणजे चित्ताची एकाग्रता व ध्यान म्हणजे चिंतन.
★ समाधी म्हणजे काय?

समाधी म्हणजे तद्रूपता, चित्त वृत्तीचा विरोध, समाधीला तुर्या उन्मनी, मनोलय, सहजावस्था, शांती वगैरे नावे आहेत.

* लय आणि निक्षेप कशाला म्हणतात?

समाधी साधन करीत असता येणाऱ्या झोपेला लय म्हणतात व चित्त चंचल होणे, बहिर्मुख होणे याला निक्षेप म्हणतात.
उत्तर लिहिले · 21/7/2023
कर्म · 53720
0
वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे आता आपण बघणार आहोत.
सर्व स्तरांवर तंदुरुस्ती | All-round fitness
वजनात घट | Weight loss
ताण तणावा पासून मुक्ती | Stress relief
अंर्तयामी शांतता | Inner peace
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ | Improved immunity
सजगतेत वाढ होते | Living with greater awareness
नाते संबंधात सुधारणा | Better relationships
उर्जा शक्ती वाढते | Increased energy
शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते | Better flexibility & posture
अंतर्ज्ञानात वाढ | Better intuition
उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 53720
0

भारतातील राज्ये:

सध्या (२०२३) भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

राज्यांची नावे:

  • आंध्र प्रदेश
  • अरुणाचल प्रदेश
  • आसाम
  • बिहार
  • छत्तीसगड
  • गोवा
  • गुजरात
  • हरियाणा
  • हिमाचल प्रदेश
  • झारखंड
  • कर्नाटक
  • केरळ
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • मणिपूर
  • मेघालय
  • मिझोरम
  • नागालँड
  • ओडिशा
  • पंजाब
  • राजस्थान
  • सिक्कीम
  • तामिळनाडू
  • तेलंगणा
  • त्रिपुरा
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • पश्चिम बंगाल

केंद्रशासित प्रदेश:

  • अंदमान आणि निकोबार बेटे
  • चंदिगढ
  • दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
  • दिल्ली
  • जम्मू आणि काश्मीर
  • लडाख
  • लक्षद्वीप
  • पुडुचेरी

योगासनाचे फायदे:

  • शारीरिक लवचिकता: योगासनांमुळे शरीर लवचिक होते.
  • शारीरिक ताकद: नियमित योगा केल्याने स्नायू मजबूत होतात.
  • तणाव कमी: योगामुळे मानसिक ताण कमी होतो.
  • रोगप्रतिकारशक्ती: योगा केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • वजन नियंत्रण: योगामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • रक्तदाब नियंत्रण: काही योगासने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
  • पचन सुधारते: योगामुळे पचनक्रिया सुधारते.

योगासनाचे मर्यादा:

  • दुखापत: चुकीच्या पद्धतीने योगा केल्यास दुखापत होऊ शकते.
  • गरोदरपण: गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योगा करावा.
  • उच्च रक्तदाब: उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी काही आसने टाळावीत.
  • सर्दी आणि खोकला: सर्दी आणि खोकला असताना काही आसने करणे टाळावे.
  • पाठीच्या समस्या: पाठीच्या समस्या असल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगा करावा.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: NHS - Guide to Yoga

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980