गणित पाण्याची टाकी

एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासांत भरते, तर दुसऱ्या नळाने ती १२ तासांत भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?

2 उत्तरे
2 answers

एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासांत भरते, तर दुसऱ्या नळाने ती १२ तासांत भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?

1
स्पष्टीकरण .....

पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात आणि दुसऱ्या नळाने 12 तासात भरते ..

लसावी = टाकीची क्षमता समजू..

8 आणि 12 लसावी = 24 एकक लिटर

पहिल्या नळाची क्षमता = 24/8 = 3 एकक लिटर/तास

दुसऱ्या नळाची क्षमता = 24/12 = 2 एकक लिटर/तास

दोन्ही मिळून प्रति तास = 3 + 2 = 5 एकक लिटर/तास

24 एकक लिटर भरायला लागणारा वेळ = 24/5 = 4.8 तास

म्हणजे 4 तास 48 मिनिटे लागतील...

=============================
उत्तर लिहिले · 17/7/2023
कर्म · 14840
0

गणितानुसार,

  • पहिला नळ टाकी ८ तासात भरतो, म्हणजे १ तासात तो १/८ भाग भरेल.
  • दुसरा नळ टाकी १२ तासात भरतो, म्हणजे १ तासात तो १/१२ भाग भरेल.

म्हणून, दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास, १ तासात ते (१/८ + १/१२) भाग भरतील.

आता, (१/८ + १/१२) = (३ + २)/२४ = ५/२४

म्हणजे, दोन्ही नळ मिळून टाकीचा ५/२४ भाग १ तासात भरतील.

त्यामुळे, पूर्ण टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ = १ ÷ (५/२४) = २४/५ = ४.८ तास

उत्तर: दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी ४ तास ४८ मिनिटे (४.८ तास) मध्ये पूर्ण भरेल.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

A नळ एक टाकी 25 तासांत भरतो आणि B नळ तीच टाकी 40 तासांत रिकामा करतो. सुरुवातीला A हा नळ 10 तास सुरू केला व बंद केला, तर टाकी थोडी भरेल. तर ही थोडी भरलेली टाकी B हा नळ किती तासांत रिकामा करेल?
A हा नळ एक टाकी 18 तासात भरतो व B हा नळ तीच टाकी 24 तासात भरतो. सुरुवातीला A हा नळ 12 तास सुरू केला व बंद केला, तर उरलेली टाकी B हा नळ किती तासात भरेल?
मोठ्या नळातून रिकाम्या टाकीत पाणी सोडल्यास टाकी पाण्याने भरण्यास 20 मिनिटे वेळ लागतो. तीच रिकामी टाकी छोट्या नळातून भरण्यास 30 मिनिटे लागतात. जर मोठ्या आणि छोट्या अशा दोन्ही नळांमधून एकाच वेळी पाणी सोडले, तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
8000 लिटर पाणी टाकी साईज काय आहे?
एक पाण्याची टाकी x, y आणि z या तीन पाईपद्वारे 5 तासात भरली जाते. पाईप z, y पेक्षा तीन पट वेगाने आणि y, x पेक्षा दुप्पट वेगाने टाकी भरतो, तर पाण्याची टाकी भरण्यासाठी फक्त x ला किती वेळ लागेल?
एक पाण्याची टाकी एका नळाने ३ तासात पूर्ण भरते तसेच दुसऱ्या नळाने ४ तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू ठेवले तर किती वेळात ती टाकी पूर्णपणे भरलेली दिसेल?
ए नळ ही भरलेली टाकी 6 तासात रिकामी करतो, बी नळ हा 1 मिनिटात 4 लीटर पाणी भरतो. आता टाकी भरलेली आहे आणि दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर टाकी 8 तासात रिकामी होते, तर टाकी किती लीटरची असेल?