गणित पाण्याची टाकी

एक पाण्याची टाकी एका नळाने ३ तासात पूर्ण भरते तसेच दुसऱ्या नळाने ४ तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू ठेवले तर किती वेळात ती टाकी पूर्णपणे भरलेली दिसेल?

4 उत्तरे
4 answers

एक पाण्याची टाकी एका नळाने ३ तासात पूर्ण भरते तसेच दुसऱ्या नळाने ४ तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू ठेवले तर किती वेळात ती टाकी पूर्णपणे भरलेली दिसेल?

14
समजा ती टाकी 3 लिटरची आहे.
म्हणजे एका तासात 1 लिटर भरेल. (3÷3)
व त्याच एका तासात 0.75 लिटर रिकामी होईल.(3÷4)
म्हणजे एका तासानंतर 0.25 लिटर टाकी भरलेली दिसेल.

एका तासात जर 0.25 लिटर भरत असेल, तर 3 लिटर भरायला,

(3×1) ÷ 0.25 = 12 तास.

(टाकी कितीही लिटर ची असली, तरी उत्तर हेच असेल)
उत्तर लिहिले · 8/11/2018
कर्म · 85195
6
एक पाण्याची म्हणजे 1/3
ही टाकी 3 तासात भरते आणि तीच टाकी 4 तासात रिकामी होते म्हणजे -1/4 तर,

आता, 1/3 - 1/4 आता छेद समान करू म्हणजे
छेदाला ज्या संख्येने गुणलात त्याच संख्येने अंशाला गुणावे.


4×1/3×4 - 3×1/4×3 = 4/12 - 3/12
1/12 म्हणजे, दोन्ही नळे एकत्र चालू केली असता टाकी 12 तासात पूर्णपणे भरेल.





धन्यवाद! आवडल्यास लाईक करा.
उत्तर लिहिले · 25/12/2019
कर्म · 380
0

गणितानुसार,

पहिला नळ टाकी 3 तासात भरतो, म्हणून 1 तासात 1/3 भाग भरेल.

दुसरा नळ टाकी 4 तासात रिकामी करतो, म्हणून 1 तासात 1/4 भाग रिकामा होईल.

दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास, 1 तासात टाकीचा भरलेला भाग:

1/3 - 1/4 = (4-3)/12 = 1/12

म्हणजे, टाकीचा 1/12 भाग 1 तासात भरेल.

उत्तर: टाकी पूर्णपणे भरायला 12 तास लागतील.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

A नळ एक टाकी 25 तासांत भरतो आणि B नळ तीच टाकी 40 तासांत रिकामा करतो. सुरुवातीला A हा नळ 10 तास सुरू केला व बंद केला, तर टाकी थोडी भरेल. तर ही थोडी भरलेली टाकी B हा नळ किती तासांत रिकामा करेल?
A हा नळ एक टाकी 18 तासात भरतो व B हा नळ तीच टाकी 24 तासात भरतो. सुरुवातीला A हा नळ 12 तास सुरू केला व बंद केला, तर उरलेली टाकी B हा नळ किती तासात भरेल?
एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासांत भरते, तर दुसऱ्या नळाने ती १२ तासांत भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
मोठ्या नळातून रिकाम्या टाकीत पाणी सोडल्यास टाकी पाण्याने भरण्यास 20 मिनिटे वेळ लागतो. तीच रिकामी टाकी छोट्या नळातून भरण्यास 30 मिनिटे लागतात. जर मोठ्या आणि छोट्या अशा दोन्ही नळांमधून एकाच वेळी पाणी सोडले, तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
8000 लिटर पाणी टाकी साईज काय आहे?
एक पाण्याची टाकी x, y आणि z या तीन पाईपद्वारे 5 तासात भरली जाते. पाईप z, y पेक्षा तीन पट वेगाने आणि y, x पेक्षा दुप्पट वेगाने टाकी भरतो, तर पाण्याची टाकी भरण्यासाठी फक्त x ला किती वेळ लागेल?
ए नळ ही भरलेली टाकी 6 तासात रिकामी करतो, बी नळ हा 1 मिनिटात 4 लीटर पाणी भरतो. आता टाकी भरलेली आहे आणि दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर टाकी 8 तासात रिकामी होते, तर टाकी किती लीटरची असेल?