गणित पाण्याची टाकी

ए नळ ही भरलेली टाकी 6 तासात रिकामी करतो, बी नळ हा 1 मिनिटात 4 लीटर पाणी भरतो. आता टाकी भरलेली आहे आणि दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर टाकी 8 तासात रिकामी होते, तर टाकी किती लीटरची असेल?

2 उत्तरे
2 answers

ए नळ ही भरलेली टाकी 6 तासात रिकामी करतो, बी नळ हा 1 मिनिटात 4 लीटर पाणी भरतो. आता टाकी भरलेली आहे आणि दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर टाकी 8 तासात रिकामी होते, तर टाकी किती लीटरची असेल?

8
A नळ = 6 तासात रिकामी करतो

म्हणजे 1 तासात = 1/6 भाग

B नळ टाकी भरतो = 1 मनिटे = 4 लिटर

दोन्ही नळ A व B एकदाच सुरु केले तर ( टाकी पूर्ण पणे भरलेली असताना )

पूर्ण रिकामी व्हायला 8 तास लागले

A पेक्षा 2 तास जास्त वेळ लागला कारण नळ B टाकी भरत होते

आता एकटा नळ B ती टाकी किती वेळात भरेल काढूया

1     1
--  -  -- 
6     8

=( 8 - 6 )
  -----------
    6 × 8

= 2
  ----
  48

= 1
  -----
   24

B नळ टाकी 24 तासात भरेल

आता आपण टाकी ची धारकता काढू

1 मी = 4 लिटर

1 तास = 60 मिनिटे

= 60 × 4 = 240 लिटर


तसे

24 तासात = 24 × 240 = 5760 लिटर👍


टाकीची क्षमता = 5760 लिटर असेल 👍
उत्तर लिहिले · 26/7/2018
कर्म · 3150
0

गणितानुसार,

ए नळ : टाकी 6 तासात रिकामी करतो म्हणजे 1 तासात 1/6 भाग रिकामा करतो.

दोन्ही नळ (ए + बी) : 8 तासात टाकी रिकामी करतात, म्हणजे 1 तासात 1/8 भाग रिकामा होतो.

बी नळाने 1 तासात भरलेला भाग = (1/6) - (1/8) = (4 - 3)/24 = 1/24

म्हणजे, बी नळ 24 तासात टाकी पूर्ण भरतो.

बी नळाने 1 मिनिटात भरलेले पाणी = 4 लीटर

बी नळाने 1 तासात भरलेले पाणी = 4 लीटर/मिनिट * 60 मिनिटे = 240 लीटर

टाकीची क्षमता = 24 तास * 240 लीटर/तास = 5760 लीटर

म्हणून, टाकीची क्षमता 5760 लीटर आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

A नळ एक टाकी 25 तासांत भरतो आणि B नळ तीच टाकी 40 तासांत रिकामा करतो. सुरुवातीला A हा नळ 10 तास सुरू केला व बंद केला, तर टाकी थोडी भरेल. तर ही थोडी भरलेली टाकी B हा नळ किती तासांत रिकामा करेल?
A हा नळ एक टाकी 18 तासात भरतो व B हा नळ तीच टाकी 24 तासात भरतो. सुरुवातीला A हा नळ 12 तास सुरू केला व बंद केला, तर उरलेली टाकी B हा नळ किती तासात भरेल?
एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासांत भरते, तर दुसऱ्या नळाने ती १२ तासांत भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
मोठ्या नळातून रिकाम्या टाकीत पाणी सोडल्यास टाकी पाण्याने भरण्यास 20 मिनिटे वेळ लागतो. तीच रिकामी टाकी छोट्या नळातून भरण्यास 30 मिनिटे लागतात. जर मोठ्या आणि छोट्या अशा दोन्ही नळांमधून एकाच वेळी पाणी सोडले, तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
8000 लिटर पाणी टाकी साईज काय आहे?
एक पाण्याची टाकी x, y आणि z या तीन पाईपद्वारे 5 तासात भरली जाते. पाईप z, y पेक्षा तीन पट वेगाने आणि y, x पेक्षा दुप्पट वेगाने टाकी भरतो, तर पाण्याची टाकी भरण्यासाठी फक्त x ला किती वेळ लागेल?
एक पाण्याची टाकी एका नळाने ३ तासात पूर्ण भरते तसेच दुसऱ्या नळाने ४ तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू ठेवले तर किती वेळात ती टाकी पूर्णपणे भरलेली दिसेल?