पिण्याचे पाणी आरोग्य

सकाळी पाणी केव्हा प्यावे?

3 उत्तरे
3 answers

सकाळी पाणी केव्हा प्यावे?

2
सकाळी उठल्यानंतर लगेच 3 कप पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा.


सकाळी उठल्यानंतर ब्रश झाला की पाणी पिणं हे आरोग्याच्याआणि स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक चांगले आहे. सकाळचं कोणतंही पेय घेण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करणे आरोग्यदायी आहे. बऱ्याचदा सकाळी रिकाम्या पोटी जे पाणी आपण पितो ते कोमट असावं, गरम असावं की गार असावं असा प्रश्न आपल्याला पडतो. या प्रश्नाचं उत्तरही   सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे. 



 

१. शरीर स्वच्छ होते... 
दररोज सकाळी उठल्यानंतर कोणतंही पेय घेण्याच्या आधी पाणी घेतल्यास तुमचं शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते. रिकाम्यापोटी पाणी पिणं हा शरीर नैसर्गिक दृष्ट्या डिटॉक्स करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीररातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर ढकलली जातात आणि शरीर आतून शुद्ध होण्यास मदत हाेते. 



 

२. सर्दीचा त्रास असणाऱ्यांसाठी उत्तम
ज्या लोकांना वारंवार सर्दी होण्याचा त्रास होतो, त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यावे. कारण बऱ्याचदा नाक चोंदणे, शिंका येणे हा त्रास सकाळच्या सुमारास होतो. गरम पाणी पिल्यास शरीरातील कफ मोकळा होण्यास मदत होते आणि सर्दीचा त्रास कमी होत जातो.



 

३. वजन कमी होण्यास फायदेशीर
जे लोक वजन कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी हा उपाय केलाच पाहिजे. यामुळे शरीरातील चयापचय क्रियेचे कार्य उत्तम होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि मग शरीरावर कुठेही अतिरिक्त चरबी साचून राहत नाही. याचा फायदा निश्चितच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो.


 

४. पचनक्रियेसाठी उत्तम
अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी हा एक सोपा आणि उत्तम उपाय आहे. अशा लोकांनी दररोज कोमट पाणी प्यायल्याने पोट व्यवस्थित साफ होतेच शिवाय बद्धकोष्ठता, पित्त, अपचन, मळमळ, गॅसेस हे त्रासही कमी होतात. 


 

५. त्वचेसाठीही उत्तम 
रात्रभर आपण पाणी प्यायलेलं नसतं. त्यामुळे सकाळी सगळ्यात आधी पाणी पिणं गरजेचं आहे. कारण असं केल्यामुळे त्वचेचं डिहायड्रेशन होणं थांबतं. त्वचा हायड्रेटेड राहते. तिचा तजेलदारपणा टिकून राहतो. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठीही हा उपाय चांगला आहे. 


 


सकाळी इतर कोणतंही पेय घेण्याआधी जर कोमट पाणी घेतलं तर त्याचे आरोग्याला होणारे फायदे  की यामुळे शरीरात दिवसभर होणाऱ्या एन्झाईम्सचं सिक्रीशन योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात होतं. त्याचा पचनशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. याशिवाय युरिनरी ट्रॅक विषयीच्या समस्या देखील या उपायामुळे कमी होतात. कारण अशा पद्धतीने नियमित पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर पडायला मदत होते. पाणी हे कोमट असावंच असं नाही. ऋतुमानानुसार आपण पाणी कोमट प्यावं की नाही हे ठरवू शकतो.  

 

उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 53720
0
उठल्यावर
उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 5
0

सकाळी पाणी पिण्याची योग्य वेळ:

  • उठल्याबरोबर: सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते. रात्री झोपेत असताना शरीरात पाण्याची कमतरता होते, त्यामुळे सकाळी उठून पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.

  • ब्रश करण्यापूर्वी: सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिणे अधिक चांगले मानले जाते, कारण रात्री आपल्या तोंडात तयार झालेले बॅक्टेरिया (bacteria) पाण्यासोबत पोटात जातात आणि ते पचनक्रियेसाठी (digestion) मदत करतात.

  • जेवणापूर्वी: नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने अन्न व्यवस्थित पचनास मदत होते आणि पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते.

महत्वाचे: सकाळी उठल्यावर किमान 1 ते 2 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे.

टीप: ज्या लोकांना काही विशिष्ट आरोग्य समस्या आहेत (उदाहरणार्थ, किडनी समस्या), त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

तांब्याच्या भांड्यातील पाणी फक्त सकाळीच प्यायले पाहिजे की दिवसभर कधीही पिले तरी चालते?
पाणी कसे प्यावे?
पाणी गरम प्यावे की कोमट?
सकाळी झोपून उठल्यावर अनशेपोटी, चूळ भरल्याशिवाय, दात घासल्याशिवाय पाणी पिण्याचे फायदे काय?
पाणी कधी प्यावे?
पाणी पिण्याच्या योग्य वेळा कोणकोणत्या?