Topic icon

पिण्याचे पाणी

2
सकाळी उठल्यानंतर लगेच 3 कप पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा.


सकाळी उठल्यानंतर ब्रश झाला की पाणी पिणं हे आरोग्याच्याआणि स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक चांगले आहे. सकाळचं कोणतंही पेय घेण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करणे आरोग्यदायी आहे. बऱ्याचदा सकाळी रिकाम्या पोटी जे पाणी आपण पितो ते कोमट असावं, गरम असावं की गार असावं असा प्रश्न आपल्याला पडतो. या प्रश्नाचं उत्तरही   सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे. 



 

१. शरीर स्वच्छ होते... 
दररोज सकाळी उठल्यानंतर कोणतंही पेय घेण्याच्या आधी पाणी घेतल्यास तुमचं शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते. रिकाम्यापोटी पाणी पिणं हा शरीर नैसर्गिक दृष्ट्या डिटॉक्स करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीररातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर ढकलली जातात आणि शरीर आतून शुद्ध होण्यास मदत हाेते. 



 

२. सर्दीचा त्रास असणाऱ्यांसाठी उत्तम
ज्या लोकांना वारंवार सर्दी होण्याचा त्रास होतो, त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यावे. कारण बऱ्याचदा नाक चोंदणे, शिंका येणे हा त्रास सकाळच्या सुमारास होतो. गरम पाणी पिल्यास शरीरातील कफ मोकळा होण्यास मदत होते आणि सर्दीचा त्रास कमी होत जातो.



 

३. वजन कमी होण्यास फायदेशीर
जे लोक वजन कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी हा उपाय केलाच पाहिजे. यामुळे शरीरातील चयापचय क्रियेचे कार्य उत्तम होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि मग शरीरावर कुठेही अतिरिक्त चरबी साचून राहत नाही. याचा फायदा निश्चितच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो.


 

४. पचनक्रियेसाठी उत्तम
अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी हा एक सोपा आणि उत्तम उपाय आहे. अशा लोकांनी दररोज कोमट पाणी प्यायल्याने पोट व्यवस्थित साफ होतेच शिवाय बद्धकोष्ठता, पित्त, अपचन, मळमळ, गॅसेस हे त्रासही कमी होतात. 


 

५. त्वचेसाठीही उत्तम 
रात्रभर आपण पाणी प्यायलेलं नसतं. त्यामुळे सकाळी सगळ्यात आधी पाणी पिणं गरजेचं आहे. कारण असं केल्यामुळे त्वचेचं डिहायड्रेशन होणं थांबतं. त्वचा हायड्रेटेड राहते. तिचा तजेलदारपणा टिकून राहतो. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठीही हा उपाय चांगला आहे. 


 


सकाळी इतर कोणतंही पेय घेण्याआधी जर कोमट पाणी घेतलं तर त्याचे आरोग्याला होणारे फायदे  की यामुळे शरीरात दिवसभर होणाऱ्या एन्झाईम्सचं सिक्रीशन योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात होतं. त्याचा पचनशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. याशिवाय युरिनरी ट्रॅक विषयीच्या समस्या देखील या उपायामुळे कमी होतात. कारण अशा पद्धतीने नियमित पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर पडायला मदत होते. पाणी हे कोमट असावंच असं नाही. ऋतुमानानुसार आपण पाणी कोमट प्यावं की नाही हे ठरवू शकतो.  

 

उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 53720
2



 तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यदायी•दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकतो. •शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. •तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्याला लाभदायक असते असेही घरातील ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जाते, पण याचे नेमके फायदे काय हे मात्र आपल्यातील अनेकांना माहित नसते. •पाहूयात काय आहेत तांब्यातील पाणी पिण्याचे फायदे -१. रात्री झोपताना पाणी तांब्याच्या भांड्यात भरुन ठेवल्यास शरीराच्या अनेक तक्रारी औषधाविना बऱ्या होतात. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.२. सांधेदुखी ही सध्या अतिशय सामान्य तक्रार झाली आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळण्यास मदत होते. अर्थायटीस किंवा सांधेदुखीच्या समस्या दूर होण्यास याची मदत होते.३. ज्यांना वारंवार कफ होतो अशांसाठीही तांब्यातील पाणी अतिशय उपयुक्त असते. ८ तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातील आवश्यक ते घटक पाण्यात उतरतात त्यात तुळशीचे पान टाकून ते प्यायल्यास कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.४. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास यामुळे मदत होते तसेच चेहरा तजेलदार दिसतो. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकवायचे असल्यास तांब्याचे पाणी पिणे आवश्यक असते.५. सध्या जीवनशैलीचा वेग वाढल्याने अनेकांच्या हृदयावर ताण येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोलेस्टरॉलची पातळी वाढणे, हृदयविकार यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला उत्तम फायदा होतो.६. थायरॉईडच्या त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी तांब्यातील पाणी पिणे उपयुक्त ठरते. हार्मोनचा समतोल राखण्यासाठी असे पाणी उपयोगाचे असल्याने थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.

…म्हणून तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यदायी

•दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकतो. 
•शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. 
•तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्याला लाभदायक असते असेही घरातील ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जाते, पण याचे नेमके फायदे काय हे मात्र आपल्यातील अनेकांना माहित नसते. 
•पाहूयात काय आहेत तांब्यातील पाणी पिण्याचे फायदे -

१. रात्री झोपताना पाणी तांब्याच्या भांड्यात भरुन ठेवल्यास शरीराच्या अनेक तक्रारी औषधाविना बऱ्या होतात. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

२. सांधेदुखी ही सध्या अतिशय सामान्य तक्रार झाली आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळण्यास मदत होते. अर्थायटीस किंवा सांधेदुखीच्या समस्या दूर होण्यास याची मदत होते.

३. ज्यांना वारंवार कफ होतो अशांसाठीही तांब्यातील पाणी अतिशय उपयुक्त असते. ८ तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातील आवश्यक ते घटक पाण्यात उतरतात त्यात तुळशीचे पान टाकून ते प्यायल्यास कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.

४. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास यामुळे मदत होते तसेच चेहरा तजेलदार दिसतो. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकवायचे असल्यास तांब्याचे पाणी पिणे आवश्यक असते.

५. सध्या जीवनशैलीचा वेग वाढल्याने अनेकांच्या हृदयावर ताण येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोलेस्टरॉलची पातळी वाढणे, हृदयविकार यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला उत्तम फायदा होतो.

६. थायरॉईडच्या त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी तांब्यातील पाणी पिणे उपयुक्त ठरते. हार्मोनचा समतोल राखण्यासाठी असे पाणी उपयोगाचे असल्याने थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.

उत्तर लिहिले · 6/12/2021
कर्म · 121765
4
पोट म्हणजे पाणी साठवण्याचा हौद नव्हे.   पाणी पिताना  ते समजून उमजून अन मोजून मापूनच प्यावं!

धरणातील पाणी संपत आलं की, पाणी वापरात कपात सुरू होते. त्याची विविध नियमावली सतत सांगितली जाते. पर्यावरण संतुलनासाठी हे आवश्यक असतं. त्याचप्रमाणो आरोग्याच्या संतुलनाचा विषयही महत्त्वाचा. आणि त्यासाठी पाणी पिण्याचं विशिष्ट नियोजन करणं, पाणी पिण्याला काही नियम लावून घेणं हेदेखील महत्त्वाचं असतं.
पाणी केव्हा आणि किती प्यावं?
अन्नपचनासाठी व इतर कार्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते. पाण्याची ही गरज व्यक्तीची प्रकृती, ऋतू, कोणत्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, असलेले आजार यावरून ठरत असते. पाणी केव्हा आणि किती प्यावं यासाठी सर्वात सोपा नियम म्हणजे ‘तहान लागली की पाणी प्यावं आणि तहान शमेल इतकं च पाणी प्यावं’. ग्लास भरून पाणी घेतलं आहे म्हणजे ते सर्व संपवायलाच हवं असं नाही. दिवसभरात 5-6 बाटल्या, उठल्यावर 2-3 तांबे, जेवणानंतर दोन तांबे असे पाण्याचे नियम करून तेवढं पाणी प्यायला आपल्या शरीरात काही हौद ठेवलेला नाही! गरज नसताना एवढं पाणी प्याल्यावर हे जास्तीचं पाणी काढण्यासाठी शरीर यंत्रणोवर अतिरिक्त ताण येतो. अनेक वर्षे असं घडत राहिल्यास काही आजारांचं मूळही मग पाणीच ठरतं. शरीरास पाण्याची गरज आहे हे समजण्यासाठी आपल्याकडे यंत्र दिलेलं आहे. ‘तहान लागणं’ हे ते यंत्र. मग तहान नसताना बळजबरीनं पाणी का प्यावं?
पाण्याच्या गरजेची शास्त्रीय ओळख
पाणी पितानाही शास्त्र समजून घेणं महत्त्वाचं. सर्वाना जगण्यासाठी पाणी लागतं हे सत्य आहे. पण ते सर्वाना समान लागतं असं मात्र नाही. यामागे शास्त्र आहे. प्रकृतीच्या दृष्टीनं बघितलं तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पाण्याची गरज इतरांच्या मानानं थोडी जास्त असते. उन्हाळ्यात घामाद्वारे पाण्याचं उत्सजर्न म्हणून इतर ऋतूंपेक्षा पाणी जास्त लागतं. पण जर दिवसभर एसीमध्ये काम करत असाल तर ही गरज कमी होईल.
मुंबईसारखे समुद्रकिनारपट्टीवरील प्रदेश जिथे अधिक घाम येतो किंवा मराठवाडा, विदर्भ, राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशात पाण्याची गरज अधिक असते. परंतु नाशिकसारख्या प्रदेशात त्या तुलनेत पाण्याची गरज कमी होते.
पाणी पिण्याच्या योग्य-अयोग्य सवयी
सकाळी उठल्या उठल्या व रात्री झोपताना पाणी पिऊ नये. सतत सर्दी होणं, नाक चोंदणं, दमा, स्थूलता, रक्तदाब वृद्धी यासारख्या आजारांचं हे कारण ठरतं. या काळात पाणी घेणं कधी आवश्यक असल्यास कडक गरम पाणी व तेही फक्त अर्धा कपच घ्यावं. जेवताना जेवणाच्या मध्ये थोडं थोडं पाणी प्यावं. जेवणापूर्वी पाणी घेतल्यास ते कृशता आणतं, तर जेवणानंतर पाणी घेतल्यास स्थूलता येते. जेवणानंतर भरपूर पाणी पिण्यानं मानेच्या वरील भागांतील अवयवांचे आजार होतात.
अतिसार, मूतखडा, युरीन इन्फेक्शन या आजारात पाण्याचं प्रमाण वाढवावं, तर अजीेर्ण, पचनशक्ती मंद असणं, सूज येणं, सतत सर्दी, दमा, रक्तदाब वृद्धी या आजारात नियंत्रित पाणी प्यावं. चहा, कॉफी, ताक आहारातील इतर द्रवपदार्थ यांचं प्रमाणही दिवसभरातील पाण्याचं प्रमाण ठरवताना विचारात घ्यायला हवं.
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_93.html
3
अधिकांश पोटाचे आजार दुषित पाण्यामुळे होतात. आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे असेसांगितल्या जाते. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक तर होतेच, तसेच पचण्यास हलकेही होते.जर तुम्ही स्किन प्रॉब्लेममुळे त्रस्त असाल किंवा तजेलदार त्वचेसाठी वेगवेगळे कॉस्मॅटिक्सप्रॉडक्ट वापरून थकले असाल तर दररोज एक ग्लास गरम पाणी पिण्यास सुरुवात करा. तुमची त्वचा तजेलदार होईल._*      

कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. सकाळी रिकाम्या पोटी व रात्री जेवल्यानंतर कोमट पाणी पिल्यास पचनक्रियेशी संबधित आजार होणार नाहीत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, पोट साफ राहील. मलबद्धता होणार नाही.भूक वाढवण्यातही एक ग्लास कोमट पाणी खूप उपयोगी आहे. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एका लिंबाचा रस आणि मीठ टाकून प्यावे. यामुळे पोटातील जडपणा थोड्या वेळातच कमी होईल.पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे मळमळणे, छातीत जळजळ होणे आणि मलावरोध यासारख्या समस्या दूर होतात.कोमट पाणी त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक औषध आहे. त्वचा तजेलदार ठेवण्यात कोमटपाण्याची महत्त्वाची भूमिका असते.लिंबूपाण्याचे सेवन केल्याने वजन कमी केले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, त्यासाठी कोमट पाण्यात लिंबाच्या रसासोबत मध मिसळून त्याचे सेवन करावे.रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यास मूत्ररोग होत नाहीत. हृदयातील जळजळ कमी होते. वातामुळे उत्पन्न होणाऱ्या आजारांमध्ये कोमट पाणी अमृतासमान फायदेशीर मानले जाते.मासिक पाळीच्या काळात पोट दुखत असेल तर मुलींनी कोमट पाणी पिणे उत्तम मानले जाते, कारण त्याने आराम मिळतो. कोमट पाण्याचे नियमितसेवन केल्यास रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. कोमट पाण्यामुळे शरीरातील तापमान वाढते. घामाच्या माध्यमातून शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर पडतात आणि रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते._*
कोमट पाणी पिणे शरीरासाठी फार उपयोगी आहे, यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते. त्यामुळेच सर्दीचे रुग्ण, अजीर्णाचे रुग्ण, कफप्रकृती व स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे.दमा, उचकी, घश्यात जळजळ होणे इ. आजारांमध्ये तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर कोमट पाणी पिणे लाभदायक राहते.चरक संहितेनुसार शरीरात ज्वर (ताप) असेल तर थंड पाणी पिऊ नये. कोमट पाणी प्यावे. तापामध्ये कोमटपाणी जास्त लाभदायक ठरते. शरीरातील एखाद्या भागात गॅसमुळे त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाणी पिल्यास गॅस बाहेर पडतो.
http://anilpatil896.blogspot.com/2020/07/blog-post_51.html
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_
*╰──────•◈•──────╯*
*🌹.............................................*
.       _*ണคн¡т¡ รεvค*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
.            *༺♥༻​​*
15
अनोशेपोटी पाणी पिण्याची फायदे पुढीलप्रमाणे: १) रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते. 

२) रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.

३) ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

४) रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडीटी (पित्त) अशा समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.

५) जे लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कप होत नाही. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जे खाल्ले जाते त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. कप दूर झाल्याने अन्य आजारही पळून जातात.

६) सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत ज्याकाही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते.
उत्तर लिहिले · 10/8/2018
कर्म · 10880
3
दोन दिवस पाणी पिऊ नका म्हणजे ऊत्तर मिळेल,
 तिसऱ्या दिवशी तुम्हीच आम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्याल
क्षमस्व,
उत्तर लिहिले · 2/12/2017
कर्म · 5835
7
पाणी पिण्याच्या वेळा नसतात आपल्या शरीराला
पाणी आवश्यक आहे असे वाटते तेव्हा पाणी प्यायला हवे हा जर कोणत्या वेळी म्हणाल तर जेवन झालयानंतर  ,सकाळी लवकर उठून पाणी प्यावे ते शरीर ला चांगले असते त्यामुळे आपल्याला दिवसभरात जेवढे जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे निरोगी शरीरासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे
उत्तर लिहिले · 29/6/2017
कर्म · 600