पाणी फिल्टर
पिण्याचे पाणी
आरोग्य
तांब्याच्या भांड्यातील पाणी फक्त सकाळीच प्यायले पाहिजे की दिवसभर कधीही पिले तरी चालते?
2 उत्तरे
2
answers
तांब्याच्या भांड्यातील पाणी फक्त सकाळीच प्यायले पाहिजे की दिवसभर कधीही पिले तरी चालते?
2
Answer link

तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यदायी•दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकतो. •शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. •तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्याला लाभदायक असते असेही घरातील ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जाते, पण याचे नेमके फायदे काय हे मात्र आपल्यातील अनेकांना माहित नसते. •पाहूयात काय आहेत तांब्यातील पाणी पिण्याचे फायदे -१. रात्री झोपताना पाणी तांब्याच्या भांड्यात भरुन ठेवल्यास शरीराच्या अनेक तक्रारी औषधाविना बऱ्या होतात. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.२. सांधेदुखी ही सध्या अतिशय सामान्य तक्रार झाली आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळण्यास मदत होते. अर्थायटीस किंवा सांधेदुखीच्या समस्या दूर होण्यास याची मदत होते.३. ज्यांना वारंवार कफ होतो अशांसाठीही तांब्यातील पाणी अतिशय उपयुक्त असते. ८ तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातील आवश्यक ते घटक पाण्यात उतरतात त्यात तुळशीचे पान टाकून ते प्यायल्यास कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.४. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास यामुळे मदत होते तसेच चेहरा तजेलदार दिसतो. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकवायचे असल्यास तांब्याचे पाणी पिणे आवश्यक असते.५. सध्या जीवनशैलीचा वेग वाढल्याने अनेकांच्या हृदयावर ताण येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोलेस्टरॉलची पातळी वाढणे, हृदयविकार यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला उत्तम फायदा होतो.६. थायरॉईडच्या त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी तांब्यातील पाणी पिणे उपयुक्त ठरते. हार्मोनचा समतोल राखण्यासाठी असे पाणी उपयोगाचे असल्याने थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.
…म्हणून तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यदायी
•दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकतो.
•शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते.
•तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्याला लाभदायक असते असेही घरातील ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जाते, पण याचे नेमके फायदे काय हे मात्र आपल्यातील अनेकांना माहित नसते.
•पाहूयात काय आहेत तांब्यातील पाणी पिण्याचे फायदे -
१. रात्री झोपताना पाणी तांब्याच्या भांड्यात भरुन ठेवल्यास शरीराच्या अनेक तक्रारी औषधाविना बऱ्या होतात. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
२. सांधेदुखी ही सध्या अतिशय सामान्य तक्रार झाली आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळण्यास मदत होते. अर्थायटीस किंवा सांधेदुखीच्या समस्या दूर होण्यास याची मदत होते.
३. ज्यांना वारंवार कफ होतो अशांसाठीही तांब्यातील पाणी अतिशय उपयुक्त असते. ८ तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातील आवश्यक ते घटक पाण्यात उतरतात त्यात तुळशीचे पान टाकून ते प्यायल्यास कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.
४. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास यामुळे मदत होते तसेच चेहरा तजेलदार दिसतो. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकवायचे असल्यास तांब्याचे पाणी पिणे आवश्यक असते.
५. सध्या जीवनशैलीचा वेग वाढल्याने अनेकांच्या हृदयावर ताण येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोलेस्टरॉलची पातळी वाढणे, हृदयविकार यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला उत्तम फायदा होतो.
६. थायरॉईडच्या त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी तांब्यातील पाणी पिणे उपयुक्त ठरते. हार्मोनचा समतोल राखण्यासाठी असे पाणी उपयोगाचे असल्याने थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.
0
Answer link
तांब्याच्या भांड्यातील पाणी कधी प्यावे:
आयुर्वेदानुसार, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी उठल्यावर पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते.
दिवसभर पिऊ शकतो का:
तांब्याच्या भांड्यातील पाणी दिवसभर पिणे काही प्रमाणात सुरक्षित असले तरी, काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
- प्रमाण: दिवसभर तांब्याचे पाणी पिऊ शकता, परंतु त्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे. जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.
- भांड्याची गुणवत्ता: तांबे शुद्ध असावे.
तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे फायदे:
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
- पचनक्रिया सुधारते.
- त्वचेसाठी फायदेशीर.
- शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते.
निष्कर्ष:
सकाळच्या वेळेत तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे अधिक फायदेशीर असले तरी, दिवसभर मर्यादित प्रमाणात पिणे सुरक्षित आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: लोकमत लेख