पाककृती घर पाककला

हिरव्या मिरच्या लाल झाल्या की त्याचे काय काय बनवता येते?

2 उत्तरे
2 answers

हिरव्या मिरच्या लाल झाल्या की त्याचे काय काय बनवता येते?

2

आपण कधी कधी बाजारातून जास्त प्रमाणात हिरव्या मिरच्या आणतो. त्या जास्त वापरात न आल्यामुळे लाल होण्यास सुरुवात होते.


त्या फेकून न देता. मी पुढील प्रमाणे वापर करते. अशा लाल झालेल्या मिरच्यांचे आपण ब-याच पदार्थात वापरू शकतो.

जसे की ; -

कोणतीही पालेभाजी मध्ये बारीक चिरून घालू शकता.
तसेच बटाटा, फ्लॉवर, कोबीची भाजी मध्ये ही बारीक किंवा उभ्या चिरून वापरात आणू शकता. त्यामुळे एक वेगळीच मस्त चव लागते.
फोडणीच्या भातातही उभ्या चिरून घातल्याने पण मस्त चव लागते.
तसेच सुका जवला किंवा बोबिंल भाजून त्यात चार पाच लसूण पाकळ्या, मिरच्या, मीठ, घालून छान रूचकर चटणी बनवून भात, भाकरी, चपाती सोबत खाऊ शकता.
तसेच, वेगवेगळ्या चटण्यांमध्ये ही वापर करू शकता.
मिरच्या सुकवून ही वापर करू शकता :-

मिरच्या सुकवून तिखट मसाला पावडर, किंवा तुम्ही घरात जो लाल तिखट मसाला वापरता त्यात ही वापरू शकता.

लाल मिरच्या, ओलं किंवा खुके खोबरे, लसूण मीठ एकत्र करून चटणी बनवून भात, भाकरी, चपाती सोबत खाऊ शकतो. छान तर लागतेच पण तोंडाला भारी चव येते.
लाल मिरचीचा ठेचा ही बनवू शकता.
दह्याच्या कढी मध्ये फोडणीत सुध्दा लाल मिरचीचा वापर करू शकता.
लहान मुलांची द्रृष्ट काढण्यासाठी ही वापर करू शकता.
शेंगदाण्यात, लसूण, मीठ, मिरची घालून अप्रतिम चटणी बनवू शकता.
टोमॅटोच्या भाजी किंवा चटणी बनवताना सुध्दा, लाल झालेल्या मिरच्या वापरल्यात तर छान चव येईलच, पण तापाने जिभेची चव गेली. असेल तर ती चव पुन्हा येऊन, दोन घास जास्त खाल्ले जातील.
अशा प्रकारे तुम्ही पण दैनंदिनी पदार्थात अशा लाल झालेल्या मिरची फेकून न देता, अनेक पदार्थात वापर करून, छान चवदार पदार्थ तयार करू शकता.

उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121765
0

हिरव्या मिरच्या लाल झाल्यावर तुम्ही त्यांपासून विविध पदार्थ बनवू शकता. त्यापैकी काही खालील प्रमाणे:

  1. लाल मिरची पावडर: लाल मिरच्या सुकवून त्यांची मिक्सरमध्ये पावडर बनवू शकता. ही पावडर तुम्ही विविध भाज्यांमध्ये, आमटीमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये वापरू शकता.
  2. लाल मिरचीचा ठेचा: लाल मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ एकत्र करून ठेचा बनवू शकता. हा ठेचा भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागतो.
  3. लोणचे: लाल मिरच्यांचे लोणचे देखील बनवता येते. हे लोणचे वर्षभर टिकते आणि जेवणाची चव वाढवते.
  4. सॉस: लाल मिरच्या वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सॉस बनवू शकता, जे स्नॅक्ससोबत किंवा जेवणात वापरले जातात.
  5. चटणी: लाल मिरच्या, टोमॅटो आणि इतर मसाले वापरून चटणी बनवता येते. ही चटणी सँडविच किंवा इतर पदार्थांसोबत सर्व्ह करू शकता.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1100

Related Questions

जेली कशी तयार करतात?
मुंगी भजी कशी करावी? मटेरियल काय?
फुलचंद रिमझिम पान कसे बनवायचे व त्यात कोणते मटेरियल वापरायचे?
घरगुती चटणी बनवायचा फॉर्मुला सांगा?
कांदे पोहे गोड का झाले?
गुजरात गोल्ड आटा पाणी पुरी बनविण्यासाठी चालेल का?
पाणीपुरीचे गोड आणि तिखट पाणी कसे बनवायचे? त्यात काय काय टाकले जाते याची पूर्ण माहिती हवी आहे.