पाककृती पाककला

पाणीपुरीचे गोड आणि तिखट पाणी कसे बनवायचे? त्यात काय काय टाकले जाते याची पूर्ण माहिती हवी आहे.

2 उत्तरे
2 answers

पाणीपुरीचे गोड आणि तिखट पाणी कसे बनवायचे? त्यात काय काय टाकले जाते याची पूर्ण माहिती हवी आहे.

2

पाणीपुरी कोणाला आवडणार नाही असं भारतात तरी कोणी सापडणार नाही. आमच्या घरी तरी पाणीपुरीचा एक सोहळाच असतो त्यादिवशी बाकी कोणतेही जेवण न बनवता फक्त पाणीपुरी बनवली जाते. दोन-तीन महिन्यांनी हा एक कार्यक्रम आमचा ठरलेलाच असतो. पाणीपुरी ची सर्व तयारी करून झाल्यावर घरातले सर्वजण आपल्या टेस्ट प्रमाणे पाणीपुरी तिखट गोड कशी हवी ती स्वतःची स्वतः बनवून खातात. पाणी पुरीची भाजी, पुदिना-कोथिंबीरीचे हिरवेगार पाणी, चिंच -खजुराची आंबट गोड पाणी याचं कॉम्बिनेशन एवढं मन तृप्त करणारे आहे की विचारता सोय नाही. ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजे काय हे पाणी पुरी खाल्ल्यावरच समजते तर अशा या पाणीपुरी ची टेस्ट तुम्हीही नक्की घेऊन बघा चला तर मग बघुया सोप्यात सोपी पाणीपुरी घरी कशा पद्धतीने बनवायची😋


घटक
 30 मि
 4 सर्व्हिंग्ज
1 पाकीट पाणीपुरी
पाणीपुरीची भाजी बनवण्यासाठी
2 कप शिजवलेले पांढरे वाटाणे
4 उकडलेले बटाटे
1 कप शिजवलेले मूग
1 टीस्पून हळद
1 टीस्पून चाट मसाला
थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर
तिखट पाणी तयार करण्यासाठी साहित्य
1 कप कोथंबीर
1/2 कप पुदिना
7-8 हिरव्या मिरच्याा
1 लिंबू
4 टेबलस्पून पाणीपुरी मसाला
1 टीस्पून धने-जिरेपूड
1 इंच आलं
चिंच- खजुराची आंबट गोड पाणी तयार करण्यासाठी
1 कप खजूर
1/2 गुळ
1/2 कप चिंचं
1 टीस्पून लाल ‌मिरची पावडर
1/2 टीस्पून जीरे पावडर
चवीनुसार मीठ
1 कप खारी बुंदी
कुकिंग सूचना
स्टेप 1
सर्व प्रथम आपण पांढरे वाटाणे आणि मूग कुकर मध्ये शिजवून घ्यावेत तसेच बटाटेही शिजवून घ्यावेत. एका मोठ्या पॅनमध्ये पांढरे वाटाणे मूग आणि बटाटे कुस्करून घ्यावेत त्यामध्ये चवीनुसार मीठ चाट मसाला थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मिश्रण नीट मिक्स करावे आणि त्यामध्ये लागेल तसे पाणी घालावे पाणी जास्त ही घालू नये पाणी पुरीची भाजी थोडीशी घट्ट असते. पाणीपुरीची भाजी सात ते आठ मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावी


पाणीपुरी साठी लागणारे तिखट पाणी कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या आलं हे सर्व एकत्रित मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्यावी. आता त्यामध्ये लिंबाचा रस, धने-जीरे पावडर,पाणीपुरी मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व त्यामध्ये घालून परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यावे आणिआता हे सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यावे त्यामध्ये चव बघून त्यामध्ये लागेल तसे पाणी घालावे. पाणीपुरीचे तिखट पाणी तयार आहे, ते फ्रीजमध्ये ठेवून थोडावेळ थंड करून घ्यावे.
गोड पाणी तयार करून घेऊया. चिंच आणि खजूर वेगवेगळे पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घ्यावे. त्यातील बिया काढून एकत्रित चिंच आणि खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फिरवून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी त्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे आणि ते चाळणीने गाळून घ्यावे त्यानंतर गाळलेल्या पाण्यामध्ये गुळ, लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे व हे मिश्रण गुळ विरघळेपर्यंत सात ते आठ मिनिटे उकळवून घ्यावे.चिंचेचे आंबट गोड पाणी तयार आहे.

तुम्ही अजून एक करू शकता पुदिना कोथिंबीरचे तिखट हिरवेगार थंड पाण्यामध्ये खारी बुंदी मिक्स करून घ्या. मस्तपैकी पुरी मध्ये चिंच- खजुराची आंबट गोड पाणी आणि बुंदी मिक्स केलेले तिखट हिरवे गार पाणी घेऊन त्याचा आस्वादही पोट तृप्त करेल पण मन तृप्त करणार नाही.

गरमागरम पाणी पुरीची भाजी, पुदिना कोथिंबीरचे तिखट हिरवेगार थंड पाणी आणि चिंच- खजुराची आंबट गोड पाणी आणि मस्त कुरकुरीत पाणीपुरीच्या पुऱ्या यांचा एकत्रित आस्वाद घ्यावा. आपका दिन बन जायेगा 😋



उत्तर लिहिले · 24/12/2022
कर्म · 53720
0
पाणीपुरीचे गोड आणि तिखट पाणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री आणि कृती खालीलप्रमाणे:


गोड पाणी:

  • खजूर - 250 ग्रॅम
  • गूळ - 100 ग्रॅम
  • चिंच - 50 ग्रॅम
  • सुंठ पावडर - 1/2 चमचा
  • जिरे पावडर - 1/2 चमचा
  • लाल तिखट - 1/2 चमचा
  • मीठ - चवीनुसार
  • पाणी - आवश्यकतेनुसार

कृती:

  1. प्रथम खजूर आणि चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवा. साधारणतः 1-2 तास भिजवा.
  2. भिजवल्यानंतर खजूर आणि चिंचेतील बिया काढून टाका.
  3. नंतर मिक्सरमध्ये खजूर, चिंच, गूळ आणि थोडे पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
  4. एका पातेल्यात ही पेस्ट गाळून घ्या.
  5. गाळलेल्या पेस्टमध्ये सुंठ पावडर, जिरे पावडर, लाल तिखट आणि मीठ घाला.
  6. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. गोड पाणी तयार आहे.


तिखट पाणी:

  • पुदिना - 1 कप
  • कोथिंबीर - 1/2 कप
  • हिरवी मिरची - 2-3 (आवडीनुसार)
  • आले - 1 इंच
  • लिंबू रस - 2 चमचे
  • जिरे पावडर - 1 चमचा
  • चाट मसाला - 1 चमचा
  • काळं मीठ - चवीनुसार
  • साधे मीठ - चवीनुसार
  • पाणी - आवश्यकतेनुसार

कृती:

  1. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आले मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  2. बारीक केलेल्या मिश्रणात लिंबू रस, जिरे पावडर, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ आणि पाणी घालून चांगले मिक्स करा.
  3. चवीनुसार मीठ आणि लिंबू रस adjust करा.
  4. तिखट पाणी तयार आहे.

टीप:

  • पाणीपुरीचे पाणी चवीनुसारadjust करा.
  • गोड आणि तिखट पाण्याचे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये 2-3 दिवस साठवू शकता.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

जेली कशी तयार करतात?
मुंगी भजी कशी करावी? मटेरियल काय?
फुलचंद रिमझिम पान कसे बनवायचे व त्यात कोणते मटेरियल वापरायचे?
घरगुती चटणी बनवायचा फॉर्मुला सांगा?
कांदे पोहे गोड का झाले?
गुजरात गोल्ड आटा पाणी पुरी बनविण्यासाठी चालेल का?
कोणत्याही दोन भाकरींची नावे लिहा?