2 उत्तरे
2
answers
घरगुती चटणी बनवायचा फॉर्मुला सांगा?
0
Answer link
चटणी बनवण्याचे काही विविध प्रकार आहेत,
जवस चटणी, शेंगदाणा चटणी, कारळ्याची चटणी, तिळाची चटणी, खोबर्याची चटणी, लसूण खोबरे चटणी, कडीपात्त्याची चटणी, दहयाची चटणी आणि आंब्याची / कैरीची चटणी. यांखेरीस देखील अजून विविध प्रकारच्या चटणी बनवल्या जात असतात. आपआपल्या आवडी नुसार लोक विविध प्रकारच्या चटणी बनवतात.
शेंगदाणा चटणी
पहिल्यांदा शेंगदाणे भाजुन घ्यायचे. शेंगदाणे भाजुन घेतल्यावर त्यामध्ये लसूण, आलं टाकायचं आहे. साधारण पाने तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात त्यामध्ये लाल तिखट टाकायच आहे व चवी पुरते मीठ टाकायचं आहे. तसेच थोडीशी साखर आणि दोन चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे संपुर्ण मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडसं पाणी टाकायचं आहे मग आपली शेंगदाण्याची चटणी तयार होईल.सोलापूरची शेंगदाणा चटणी सर्वत्र प्रसिद्ध आहे वरील रेसिपी ही सोलापूर चटणी बांवण्यासाठी वापरली जाते. जी तुम्ही घरच्या घरी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी अवलंबू शकता.
कारळ चटणी
एक वाटी कारळ घ्यावे, कारळ घेत असताना हे सुध्दा आपल्याला तव्यात आधी भाजुन घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडसं सुखं खोबरं घेऊन ते खिसणीने खिसून टाकायचं आहे. आता हे सगळं निट भाजुन घ्यायचं आहे, त्यानंतर कडीपत्ता भाजुन घ्यायचा आहे. त्यामध्ये एक-दोन थेंब तेल टाका आणि थोडया नंतर मिरच्या भाजुन घ्यायच्या आहेत. मिरच्या घेतांना हिरव्या नाही लाल मिरच्या भाजुन घ्यायच्या आहेत. त्यामध्ये लसुण आणि थोडे मीठ टाकायचं आहे. तसेच थोडसं हिंग देखील टाकायचं आहे. आता हे मिश्रण सगळं मिक्सरला छान असे वाटून घ्या. अशा रीतीने आपली कारळ्याची चटणी तयार होईल.
कैरी/अंब्याची चटणी
साधारण तीन ते चार कैरी घ्या व त्यांचे साल काढून घ्या. साल काढून झाल्यानंतर त्या कैरीचे बारीक बारीक काप करून घ्या. मिक्सरमध्ये कैरीचे केलेले काप, 1 वाटी शेंगदाणे, 4-5 मिरच्या, थोडासा लसूण, खोबरे, चवीपुरते मीठ टाकायचे आहे. तसेच चवीपुरती साखर टाकायची हे सर्व बिना पाण्याचं आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडसं पाणी टाकुन मिक्सरला परत बारीक करून घ्यायचं आहे.अशा रीतीने चवदार कैरीची चटणी तयार होईल.
जवस चटणी
1 वाटी जवस घ्यावे, जवस घेतल्यावर ते भाजुन घ्यायचे आहे. जवस भाजुन घेत असताना त्यामध्ये थोडसं जिरे देखील टाकायचं आहे व थोडसं तीळ पण टाकावे त्यामुळे अजून छान चव येईल. त्यानंतर कडीपत्ता व मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि ते झाल्यावर थोडा लसूण देखील भाजुन घ्यायचा आहे. आता चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे हिंग देखील टाकायचे आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण मिक्सर ला वाटुन घ्यायचे आहे. हे सर्व केल्यावर झाली तुमची जवस चटणी तयार एकदम चवदार.
तिळाची चटणी
तीळ या पदार्थात अतिशय पौष्टिक घटक असतात, हिवाळ्यात खाणे अतिशय लाभदायक असते, त्यामुळेच तर मकर संक्रांतीला तीळ ला मान असतो. तीळ ची चटणी करण्यासाठी तीळ सुध्दा भाजुन घ्यायचे आहेत. थोडयाशा मिरच्या परतुन घ्यायच्या आहेत. त्यामध्ये थोडसं जिरे, लसुण व कश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकायची आहे. मीठ चवीनुसार टाकायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण एकत्र करून मिक्सरला वाटून घ्या.अशाप्रकारे झाली तुमची तिळाची चटणी तयार. जी तुमच्या जेवणाची रंजत आणि पौष्टिकता दोन्ही ही वाढ्वेल॰
खोब-याची चटणी
खोब-याची चटणी करताना पहिल्यांदा खोबर्यांचे काप करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये लसुण थोडा जास्त टाकला तरी चालेल. नंतर त्यामध्ये जिरे व चार ते पाच बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत. रंग येण्याकरीता काश्मीरी चीली पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे. त्यानंतर मिश्रण एकत्र करून सगळं मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आपली स्वादिष्ट चटणी तयार होईल, हे सर्व झाल्यानंतर कडीपत्ता चा तडका मारून घ्यायचा आहे कारण असे केल्याने चटणी अधिक सुटसुटीत होते.
0
Answer link
मी तुम्हाला काही लोकप्रिय घरगुती चटण्या बनवण्याची माहिती देतो.
1. टोमॅटो चटणी
साहित्य:
- 5-6 टोमॅटो
- 2-3 हिरव्या मिरच्या
- लसूण 4-5 पाकळ्या
- 1 छोटा चमचा जिरे
- चवीनुसार मीठ
- तेल
कृती:
- टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण बारीक चिरून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका.
- जिरे तडतडल्यावर त्यात लसूण आणि मिरची घालून परतून घ्या.
- नंतर टोमॅटो घालून मिक्स करा आणि मीठ टाका.
- टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा.
- चटणी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
2. शेंगदाणा चटणी
साहित्य:
- 1 कप भाजलेले शेंगदाणे
- 5-6 लसूण पाकळ्या
- 2-3 लाल मिरच्या
- चवीनुसार मीठ
- 1/2 चमचा जिरे
कृती:
- शेंगदाणे, लसूण, लाल मिरच्या, मीठ आणि जिरे मिक्सरमध्ये टाका.
- मिक्सरमध्ये जाडसर वाटा.
- चटणी तयार !
3. खोबऱ्याची चटणी
साहित्य:
- 1 कप ओले खोबरे (किसलेले)
- 2-3 हिरव्या मिरच्या
- 1/2 इंच आले
- 4-5 लसूण पाकळ्या
- चवीनुसार मीठ
- 1/2 चमचा जिरे
- कोथिंबीर (बारीक चिरलेली)
कृती:
- खोबरं, मिरची, आले, लसूण, मीठ आणि जिरे मिक्सरमध्ये टाका.
- थोडे पाणी घालून बारीक वाटा.
- चटणी एका वाटीत काढून कोथिंबीरने सजवा.
4. पुदिना चटणी
साहित्य:
- 1 कप पुदिना पाने
- 2-3 हिरव्या मिरच्या
- 1/2 इंच आले
- 4-5 लसूण पाकळ्या
- 1/2 लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
- 1/2 चमचा जिरे
कृती:
- पुदिना, मिरची, आले, लसूण, मीठ, जिरे आणि लिंबाचा रस मिक्सरमध्ये टाका.
- थोडे पाणी घालून बारीक वाटा.
- चटणी तयार !
तुम्ही आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार ह्या फॉर्म्युलामध्ये बदल करू शकता.