आरोग्य व उपाय पचनसंस्था आरोग्य

केळी खाल्याने माझ्या पोटात का दुखते याचे काय कारण आहे?

2 उत्तरे
2 answers

केळी खाल्याने माझ्या पोटात का दुखते याचे काय कारण आहे?

4
१. बहुतेक वेळा उपाशी पोटी केळ खाल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो. कारण केळामध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स मुळे उपाशी पोटामध्ये असलेल्या ऍसिडसोबत रिऍक्शन होऊन आम्ल पित्ताचा त्रास संभवतो. त्यामुळे शक्यतोवर सकाळी पोट रिकामे असताना केळ खाऊ नये.

२. सकाळी नाश्त्यामध्ये नुसतेच केळ खाल्ले तर त्याचा पचनसंस्थेवर सुद्धा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

३. ज्यांना उपशी पोटी केळ खाल्ल्यावर ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. कारण केळामध्ये जास्त प्रमाणात असलेले मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम. यामुळे उपाशी पोटी केळ खाल्ले तर त्याचा हृदयावर प्रत्यक्ष परिणाम होतो.

४. सकाळच्या वेळी उपाशी पोट असल्यास केळ खाल्ल्याने सुस्ती येऊन आजून काही खाण्याची सतत इच्छा होत राहते. केळ खाल्ल्यावर अजून इतर काही पदार्थ खाल्ले तर अपचन होते. आणि त्यामुळेसुद्धा ऍसिडिटीचा त्रास उद्भवतो.

सकाळी ब्रेकफास्टमध्ये केळ खायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
१. सकाळी नाश्त्यामध्ये आधी उपमा, पोहे किंवा ओट्स खावेत. त्यावर केळाचे सेवन केल्यास पोटही भरतं आणि त्रास होत नाही.

२. दूध आणि कॉर्न फ्लेक्स च्या कॉम्बिनेशनसोबत केळ खाल्ले तरी त्रास ना होता पोट भरतं.

३. केळ खाण्यापूर्वी ओट्स किंवा सोजी खाल्ली आणि त्यानंतर केळ खाल्ले तर पौष्टिक आहार पोटात जाऊन दिवसभर काम करण्याची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

४. केळ खाल्ल्यावर लगेचच पाणी घेऊ नये. घसा खवखवतो आणि मग खोकला किंवा सर्दी होण्याची दाट शक्यता असते.

थोडक्यात, केळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अन्य पोषक घटक जास्त प्रमाणात असल्याने ते उपाशी पोटी खाल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून केळ खाण्यापूर्वी हेल्दी आहार घेऊन मगच केळाचे सेवन करावे. त्यामुळे उपाशी पोटी केळ खाल्ल्याने होणारा त्रास टळू शकेल.

तुम्हाला उपाशी पोटी केळ खाल्ल्याने यापैकी काही त्रास होत असतील तर…


उत्तर लिहिले · 25/3/2022
कर्म · 121765
0

केळी खाल्याने तुमच्या पोटात दुखण्याची काही कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:

  • ॲलर्जी (Allergy): काही लोकांना केळीची ॲलर्जी असू शकते. ॲलर्जीमुळे पोटदुखी, सूज येणे, किंवा इतर लक्षणे दिसू शकतात.
  • फायबरचे प्रमाण (Fiber content): केळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जास्त फायबरमुळे काही लोकांना पोटदुखी, गॅस, किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते.
  • पोटॅशियमचे प्रमाण (Potassium content): केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते. जास्त पोटॅशियममुळे काहीवेळा पोटात गडबड होऊ शकते.
  • फ्रुक्टोजचे प्रमाण (Fructose content): केळीमध्ये फ्रुक्टोज नावाचे नैसर्गिक साखर असते. फ्रुक्टोजचे जास्त प्रमाण काही लोकांना सहन होत नाही, त्यामुळे पोटदुखी होऊ शकते.
  • कच्ची केळी (Unripe bananas): कच्च्या केळ्यांमध्ये टॅनिन (tannins) नावाचे तत्व असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते.

जर तुम्हाला केळी खाल्यानंतर वारंवार पोटदुखी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे.

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ला नाही.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

मानवी शरीरात पित्त कोणत्या अवयवात तयार होते?
मला खाल्ल्याबरोबर लगेच टॉयलेटला जावे लागते, दिवसातून ५ वेळा. काय करू? जगावे वाटेना.
ऍसिडिटी कशामुळे होते?
वलयी संघात कोणते पचननाचे अवयव असतात?
पचन कुठून सुरू होते?
पचनसंस्थेची रचना आणि लेबलिंग?
पोट फुगल्यासारखं का वाटतंय?