स्मरणशक्ती मानसिक आरोग्य आरोग्य धर्म

स्मरणशक्ती वाढवणे बद्दल काय करावे?

आपल्या मेंदूमध्ये हिपोकॅम्पस(Hippocampus) हे एक स्मरणशक्तीचे केंद्र असते. या केंद्रामधेच स्मरणशक्ती साठीच्या पेशी(Brain Cells) तयार होत असतात. या पेशी जर योग्य प्रमाणात तयार झाल्या तर स्मरणशक्ती चांगल्या प्रमाणात वाढू शकते असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
आणि हे करण्यासाठी कुठल्या महागड्या औषधांची गरज नसून खालील काही गोष्टी केल्या तर सहजरित्या  स्मरणशक्ती वाढू शकते असे काही प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे.

वरील चित्रात पिवळा भाग हे स्मरणशक्तीचे केंद्र आहे(चित्र सौजन्य: medscape.com)

1. योग्य आहार:
कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली, बदाम, अक्रोड हे खाल्ल्याने स्मरणशक्ती तेज राहते. या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात ते खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते तसेच नवीन ब्रेन सेल्स तयार करण्यास हे पदार्थ प्रेरक देखील ठरू शकतात.

2. व्यायाम:
व्यायाम केल्याने मेंदू त्याच्या सर्वोत्तम क्षमतेने काम करतो. नर्व्ह सेल्स देखील व्यायामाने कार्यरत होतात. व्यायाम केल्याने नर्व्ह सेल्स एक प्रोटीन तयार करते जे मज्जासंस्थेचे आरोग्य नीट ठेवते.

3. एका वेळेस एकच काम करा:
माणसाचा मेंदू हा एका वेळेस एकच काम करू शकतो. शोधांतून असे सिद्ध झाले आहे कि मेंदूला एखादी गोष्ट मेमरी मध्ये स्टोर करण्यासाठी 8 सेकंड्स लागतात. म्हणजेच जर तुम्ही एकच वेळेस फोन वर बोलत असाल आणि एखादी पिशवी घेऊन जात असाल अशा वेळेस जर तुम्ही गाडीची चावी एखाद्या ठिकाणी ठेवली तर ते तुम्हाला आठवण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तरीही जास्तीत जास्त 3-5 गोष्टी तुम्ही एका वेळी करू शकता पण यातून खूप स्ट्रेस येऊन ब्रेन सेल्स साठी हे धोक्याचे असते. म्हणून चांगल्या स्मरणशक्तीसाठी एका वेळी एकाच कामावर फोकस करा.

4. झोप:
भरपूर झोप घेणे हे देखील स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. नवीन, क्रिएटिव्ह गोष्टी सुचण्यासाठी योग्य झोप घेणे गरजेचे आहे.

5. ब्रेन गेम्स:
फोन मधील ब्रेन कॅटेगरी मधल्या गेम्स खेळून देखील मेंदूला चालना मिळू शकते.

6. नवीन गोष्टी शिका:
एकच गोष्टीवर कायम काम करत राहिल्यास मेंदूच्या सेल्स कायम उपयोगी येत नाहीत. म्हणून काहीतरी नवीन शिकत राहिल्यास नर्वस सिस्टिम कायम कार्यरत राहते तसेच तुमची स्ट्रेस लेवल कमी करून मेंदूला निरोगी ठेवते.

7. पाठांतर आणि शॉर्टकट्स:
कुठल्याही प्रकारचे पाठांतर केल्याने मेमरी चा अधिकतम उपयोग होतो आणि मेंदू जास्त कार्यरत राहतो. म्हणूनच काही लोक ज्यांचे पाठांतर चांगले आहे त्या लोकांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा जास्त असते. आपण शॉर्टकट वापरून देखील मेमरी स्ट्रॉंग करू शकतो जसे कि इंद्रदनुष्यामधले 7 रंग ध्यानात ठेवण्यासाठी "जातानाही पाणी पि" हा शॉर्टकट आपण वापरू शकतो(जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पारवा, निळा आणि पिवळा) तसेच यमक असणाऱ्या कविताही आपल्या लवकर ध्यानात राहतात.

1 उत्तर
1 answers

स्मरणशक्ती वाढवणे बद्दल काय करावे?

5
 स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ सोपे उपाय

बदलती जीवनशैली, पौष्टिक आहाराचा अभाव इत्यादी गोष्टींचा आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या सर्व गोष्टींचा कधी कधी स्मरणशक्तीवर दुष्परिणाम होऊ लागतात. लहान वयामध्येच विसराळूपणा वाढत जातो. पण ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही. यावर वेळीच उपचार करा


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारापासून व्यायामापर्यंत अनेक गोष्टी उपयोगी पडतात. व्यायामानंतर लगेच डुलकी काढल्यानं स्मरणशक्तीसाठी वाढण्यास मदत होते, असं अनेक संशोधनांती सिद्ध झालं आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, याविषयी...

विचार करताना...
आपले डोळे बंद असतात, तेव्हा लक्ष विचलित होण्याची शक्यता कमी असते. एका विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार ज्या व्यक्ती डोळे बंद करुन प्रश्नांची उत्तरं देतात ती अचूक असतात. त्यामुळे विचार करताना डोळे बंद करा. या सरावामुळे स्मरणशक्तीदेखील वाढते.


​स्वतःशी संवाद साधा



स्वतःशी बोलणं ही चांगली सवय आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. याला प्रॉडक्शन इफेक्ट असं म्हणतात. ऐकणं आणि बोलणं या दोन कृती एकाच वेळी पार पडत असल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.



​रक्तदाब तपासा



उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या प्रक्रियेशी निगडित समस्या उद्भवण्याची शक्यता असू शकते. अलाबामा युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, उच्च रक्तदाबामुळे मेंदूला रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी, स्मरणशक्ती कमी होते.




​गाणी गुणगुणा



गाणं गाताना मेंदूचा उजवी बाजू वापरली जाते, त्यामुळे समस्येचं निराकरण करण्याची क्षमता वाढते. नवीन गाण्याचे शब्द लक्षात ठेवणं, कठीण असलं तरीही तो एक प्रकारचा व्यायाम आहे. त्या मेंदूला फायदा होतो.




​ध्यानधारणा करणं फायदेशीर



दिवसातील पंधरा ते तीस मिनिटं ध्यानधारणा आणि योग करणाऱ्या व्यक्तींची स्मरणशक्ती उत्तम असते, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे दृष्टिकोनात बदल होऊन सकारात्मक विचार करण्यास प्रेरणा मिळते. त्यामुळे अनेक मानसोपचारतज्ज्ञही ध्यानधारणा करण्याचा सल्ला देतात.

(
​पेन्सिलचा वापर



ऐकताना किंवा काही पाहताना कागदावर रेघोट्या ओढण्याची सवय अनेकांना असते. अशा लोकांचा स्मरणशक्ती चाचणीत ३० टक्के अधिक उत्तम निकाल दिसून आला आहे. तसंच लिहिण्यानेही मेंदूचा व्यायाम होतो. त्यामुळे जो मजकूर लिहून काढतो तो अधिक चांगल्याप्रकारे लक्षात राहतो, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे शक्य असल्यास लिहा. अर्थात, कीबोर्ड ऐवजी हातानं कागदावर लिहा. यामुळे मनातील भावनांना वाट मोकळी करुन देता येईल.

(
​दैनंदिन कामांमध्ये करा बदल



काही ठरावीक दिवासानंतर दैनंदिन कामांमध्ये लहानसहान बदल करणं आवश्यक आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या खुर्चीवर बसा, टीव्ही पाहताना जागा बदला किंवा दैनंदिन वापरातील वस्तूंची जागा बदला. असे काही बदल केल्यानं बराच फरक पडेल.





नियमित सात ते आठ तासांची झोप घ्या. यानंतर आपल्या आहारामध्ये फळे, हिरव्या भाज्या आणि प्रोटीन इत्यादी पोषक घटकांचा समावेश होत आहे की नाही, याची काळजी घ्या. सकाळी उठल्यानंतर पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा. ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडचा समावेश असलेल्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा. सुकामेवा, अळशीच्या बिया इत्यादी. नियमित आठ ते नऊ ग्लास पाणी प्या.



    

उत्तर लिहिले · 15/3/2022
कर्म · 121765

Related Questions

मला आत्महत्या करायची आहे?
आत्महत्या कशी करावी बर?
मी खूप स्वतःच्या वागण्याला कंटाळलो आहे, आत्महत्या करून जीवन संपवायचे आहे, काय करू?
मी आज आत्महत्या करणार आहे, काय करू?
मी आज रात्री ठीक ४ वाजता आत्महत्या करणार आहे?
मन शांत कसे करायचं?
मन शांत कसे कराल?