5 उत्तरे
5 answers

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

219
आपल्या मेंदूमध्ये हिपोकॅम्पस(Hippocampus) हे एक स्मरणशक्तीचे केंद्र असते. या केंद्रामधेच स्मरणशक्ती साठीच्या पेशी(Brain Cells) तयार होत असतात. या पेशी जर योग्य प्रमाणात तयार झाल्या तर स्मरणशक्ती चांगल्या प्रमाणात वाढू शकते असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
आणि हे करण्यासाठी कुठल्या महागड्या औषधांची गरज नसून खालील काही गोष्टी केल्या तर सहजरित्या  स्मरणशक्ती वाढू शकते असे काही प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे.

वरील चित्रात पिवळा भाग हे स्मरणशक्तीचे केंद्र आहे(चित्र सौजन्य: medscape.com)

1. योग्य आहार:
कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली, बदाम, अक्रोड हे खाल्ल्याने स्मरणशक्ती तेज राहते. या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात ते खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते तसेच नवीन ब्रेन सेल्स तयार करण्यास हे पदार्थ प्रेरक देखील ठरू शकतात.

2. व्यायाम:
व्यायाम केल्याने मेंदू त्याच्या सर्वोत्तम क्षमतेने काम करतो. नर्व्ह सेल्स देखील व्यायामाने कार्यरत होतात. व्यायाम केल्याने नर्व्ह सेल्स एक प्रोटीन तयार करते जे मज्जासंस्थेचे आरोग्य नीट ठेवते.

3. एका वेळेस एकच काम करा:
माणसाचा मेंदू हा एका वेळेस एकच काम करू शकतो. शोधांतून असे सिद्ध झाले आहे कि मेंदूला एखादी गोष्ट मेमरी मध्ये स्टोर करण्यासाठी 8 सेकंड्स लागतात. म्हणजेच जर तुम्ही एकच वेळेस फोन वर बोलत असाल आणि एखादी पिशवी घेऊन जात असाल अशा वेळेस जर तुम्ही गाडीची चावी एखाद्या ठिकाणी ठेवली तर ते तुम्हाला आठवण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तरीही जास्तीत जास्त 3-5 गोष्टी तुम्ही एका वेळी करू शकता पण यातून खूप स्ट्रेस येऊन ब्रेन सेल्स साठी हे धोक्याचे असते. म्हणून चांगल्या स्मरणशक्तीसाठी एका वेळी एकाच कामावर फोकस करा.

4. झोप:
भरपूर झोप घेणे हे देखील स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. नवीन, क्रिएटिव्ह गोष्टी सुचण्यासाठी योग्य झोप घेणे गरजेचे आहे.

5. ब्रेन गेम्स:
फोन मधील ब्रेन कॅटेगरी मधल्या गेम्स खेळून देखील मेंदूला चालना मिळू शकते.

6. नवीन गोष्टी शिका:
एकच गोष्टीवर कायम काम करत राहिल्यास मेंदूच्या सेल्स कायम उपयोगी येत नाहीत. म्हणून काहीतरी नवीन शिकत राहिल्यास नर्वस सिस्टिम कायम कार्यरत राहते तसेच तुमची स्ट्रेस लेवल कमी करून मेंदूला निरोगी ठेवते.

7. पाठांतर आणि शॉर्टकट्स:
कुठल्याही प्रकारचे पाठांतर केल्याने मेमरी चा अधिकतम उपयोग होतो आणि मेंदू जास्त कार्यरत राहतो. म्हणूनच काही लोक ज्यांचे पाठांतर चांगले आहे त्या लोकांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा जास्त असते. आपण शॉर्टकट वापरून देखील मेमरी स्ट्रॉंग करू शकतो जसे कि इंद्रदनुष्यामधले 7 रंग ध्यानात ठेवण्यासाठी "जातानाही पाणी पि" हा शॉर्टकट आपण वापरू शकतो(जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पारवा, निळा आणि पिवळा) तसेच यमक असणाऱ्या कविताही आपल्या लवकर ध्यानात राहतात.

उत्तर लिहिले · 15/10/2016
कर्म · 283280
32

*🧠स्मरणशक्ती वाढवण्याचे  उपाय!*
----–----------------------
बदलत्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव, नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवतात. त्याचबरोबर स्मरणशक्ती कमजोर होण्याची समस्याही निर्माण झाली आहे. जीवनशैलीत काही बदल केल्यास या समस्या दूर होऊ शकतात. जाणून घ्या स्मरणशक्ती वाढवण्याचे काही सोपे उपाय...

*सकाळी लवकर उठणे:*
सकळी लवकर उठण्याचे इतर अनेक फायदे आहेत. पण सकाळी लवकर उठून मोकळ्या वातावरणात फिरल्यास स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होईल. रोज सकाळी लवकर उठून हिरवळीवर चालल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते.


*डाळींब आणि सफरचंदाचे सेवन:*
फळात अॅँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे मेंदू सक्रीय राहण्यास मदत होते. यामुळे मेंदू सतेज ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी डाळींब आणि सफरचंदाचे सेवन करणे गरजेचे आहे.

*अक्रोड:*
मेंदू सतेज ठेवण्यासाठी रोज एक अक्रोड खाणे गरजेचे आहे. यात व्हिटॉमिन ए आणि अॅँटीऑक्सीडेंट्स असतात. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.

*ग्रीन टी:*
मानसिक शांतीसाठी चहा, कॉफी ऐवजी ग्रीन टी घेणे फायदेशीर ठरेल. ग्रीन टी मुळे मेंदू रिलॉक्स होतो .
उत्तर लिहिले · 3/7/2018
कर्म · 569225
0

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. नियमित व्यायाम:

नियमित व्यायामाने मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो आणि स्मरणशक्ती सुधारते.
संदर्भ: हार्वर्ड हेल्थ - स्मरणशक्तीसाठी व्यायाम

2. योग्य आहार:

ब्रेन फूड म्हणून ओळखले जाणारे अन्नपदार्थ जसे की मासे, नट्स, आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
संदर्भ: अल्झायमर असोसिएशन - योग्य आहार

3. पुरेशी झोप:

दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे, कारण झोपेत मेंदू माहिती साठवतो.

4. नवीन गोष्टी शिका:

नवीन भाषा शिकणे, वाद्य वाजवणे किंवा कोडी सोडवणे यांसारख्या गोष्टींमुळे मेंदू सक्रिय राहतो.

5. सामाजिक संबंध:

मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होतो आणि स्मरणशक्ती सुधारते.

6. मेंदूला चालना देणारे खेळ खेळा:

बुद्धिबळ, सुडोकू आणि शब्दकोडे यांसारखे खेळ मेंदूला चालना देतात.

7. ध्यानाचा अभ्यास करा:

ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980

Related Questions

मला आत्महत्या करायची आहे?
आत्महत्या कशी करावी बर?
मी खूप स्वतःच्या वागण्याला कंटाळलो आहे, आत्महत्या करून जीवन संपवायचे आहे, काय करू?
मी आज आत्महत्या करणार आहे, काय करू?
मी आज रात्री ठीक ४ वाजता आत्महत्या करणार आहे?
मन शांत कसे करायचं?
मन शांत कसे कराल?