Topic icon

स्वमदत

0

क्रिश्चियन मेडिकल कॉलेज (सीएमसी) वेल्लोर येथे रुग्णांना आर्थिक मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत:

  1. सीएमसी वेल्लोरमध्ये देणगी:
    • तुम्ही सीएमसी वेल्लोरला थेट देणगी देऊ शकता. देणगी दिल्याने गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होते. सीएमसी वेल्लोर देणगी या लिंकवर तुम्हाला देणगी देण्याची माहिती मिळेल.
  2. सीएमसी वेल्लोरमधील योजना:
    • सीएमसी वेल्लोर गरीब रुग्णांसाठी विविध योजना चालवते. या योजनांमध्ये तुम्ही आर्थिक मदत करू शकता.
  3. देणगी संस्था:
    • अशा अनेक देणगी संस्था आहेत ज्या सीएमसी वेल्लोरला मदत करतात. तुम्ही या संस्थांना देणगी देऊ शकता.
  4. fund रेझिंग:
    • तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांकडून पैसे जमा करून रुग्णांना मदत करू शकता.

तुम्ही सीएमसी वेल्लोरच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा थेट संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1
संकटाशी वागणाऱ्या माणसाच्या दोन तऱ्हा असतात, बरोबर आहे. संकटाशी सामना करत असताना तो विचार आणि परत दुसरा विचार चालू असतो.
संकटाशी सामना करायचा असतो आणि त्याच वेळेस आपण एकच विचार करत असतो, तो दुहेरी विचार - माझं कसं होईल हा विचार आणि परत तोच विचार की माझं चांगलं होणार म्हणजे एक नकारात्मक आणि सकारात्मक विचार चालू असतात.
या अशा संकटाशी वागण्याच्या माणसाच्या तऱ्हा असतात.
उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121765
0

सहकार्य म्हणजे समान ध्येय साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्ती किंवा संस्था एकत्र काम करणे.

सहकार्यामध्ये, प्रत्येकजण आपले कौशल्ये आणि संसाधने सामायिक करतो आणि सामूहिक प्रयत्नांनी उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो.

सहकार्य अनेक प्रकारांनी केले जाऊ शकते, जसे की:

  • एकाच प्रकल्पावर काम करणे
  • माहिती आणि ज्ञान सामायिक करणे
  • एकमेकांना मदत करणे
  • सामूहिक निर्णय घेणे

सहकार्याचे फायदे:

  • उत्पादकता वाढते.
  • समस्या अधिक प्रभावीपणे सोडवल्या जातात.
  • नवीन कल्पना आणि नवोपक्रम निर्माण होतात.
  • संबंध सुधारतात.

सहकार्य यशस्वी होण्यासाठी, काही गोष्टी आवश्यक आहेत:

  • स्पष्ट उद्दिष्ट्ये
  • परस्पर विश्वास आणि आदर
  • प्रभावी संवाद
  • जबाबदारीची भावना

सहकार्य हा एक महत्त्वाचा सामाजिक आणि व्यावसायिक कौशल आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
6
स्वतःची पारख करणं कोणासाठीच सोपं काम नाहीये भाऊ...
कारण आजच्या काळात कोणीच स्वतःला कमी समजत नाही किंवा स्वतःची चूक मान्य करत नाही......
स्वतःची पारख स्वतः करणं म्हणजे स्वतःच्या नजरेत स्वतःला ओळखणं....
आणि ही गोष्ट सोप्पी नाहीये....
हे करायला जिगर लागतं अन हे जिगर ज्याच्याजवळ आहे ती व्यक्ती ग्रेट असते....
स्वतःच्या नजरेत स्वतः इमानदारीने जगायला शिका.... आपल्याकडून जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा....तुमच्यामुळे कोणाला त्रास होईल असं काही करू नका.....स्वतःच्या चुका मान्य करायला शिका....कोणालाच दुखवू नका....
स्वतःला शहाणं समजू नका....स्वतःला मोठं समजायचा प्रयत्न करू नका.....
जी व्यक्ती आपली लायकी समजून घेऊन जगात वावरते तिला स्वतःची पारख करण्याची गरज पडत नाही.....
जग स्वतः त्या व्यक्तीची आपल्या नजरेत चांगली वाईट पारख करते.....

मी माझं स्वतःच मत व्यक्त केलंय.... काही चुकलं असेल तर क्षमस्व
उत्तर लिहिले · 26/8/2020
कर्म · 7815
3
फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो? याबाबत आज पाहुयात...

👀 *कारणे काय?* :

● उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते.
● ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
● ओले कपडे घालणे.
● घट्ट शूज किंवा कपडे घालणे.
● खुप वेळ मोजे घालणे.
● वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे.
● प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम
● कमजोर रोगप्रतिकार शक्ती

1. *कँडीडा अल्बिकन्स* : हे एक फंगल इन्फेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ गुप्तांगाजवळच्या ओलसर त्वचेवर होते.

2. *रिंगवर्म* :  हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगाजवळ होते.

🤓 *काय काळजी घ्यावी?* :

● वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.
● स्नानगृह किंवा सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगा.
● सतत एकच मोजे घालू नका.
● खूप घट्ट शूज घालू नका.
● कोणाचीही वस्तू वापरू नका.

*Disclaimer* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी लेट्सअप घेत नाही.

👨‍⚕ *आरोग्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आहार टिप्स आणि बरंच काही हवंय?


उत्तर लिहिले · 12/7/2020
कर्म · 1025
4
जर तू खरा आहेस, तर मग काळजी करू नको. खोटं स्तुती, प्रशंसा, गोड बोलून लोकांच्या आयुष्यात विष घालण्यापेक्षा कडू बोलून त्यांचं जीवन समृद्ध करतोय, ह्याची जाणीव त्यांना होईल, मग आपोआप तुला टाळणं बंद करतील. फक्त एक काम कर, स्वतःला बदलू नको, आहे तसाच राहा मित्रा.
उत्तर लिहिले · 12/5/2020
कर्म · 1425
3
आत्मविश्वास गमावला तर आयुष्याचे मोठे निर्णय सुद्धा चुकतात!!

अश्या प्रकारच्या घटना प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात घडतातच” यशाची पायरी चढताना यातून प्रत्येक व्यक्तिला जावेच लागते.

अश्यावेळी तुमचे सर्व निर्णय हे भवनीक होऊन जातात कारण एक लक्षात राहू द्या; “मनातून भावनिक झालात तर बैधिक पातळी कमी होते” व निर्णय चुकतात.

आपण जेव्हा निर्णय घेतो तो त्यावेळची जी परिस्तिथी असते त्यावर अवलंबून असतो.कितीही विचार करून निर्णय घेतला तरी कधी कधी परिस्थिती बदलते जसे माणसं बदलू शकतात, आर्थिक परिस्तिथी वर खाली होऊ शकते, माणसाची सांगत बिघडू शकते. थोडक्यात ज्या ज्या गोष्टींचा आधार घेऊन आपण निर्णय घेतो ती कायम तशीच राहत नाही. सगळं बदलत जातं आणि मग आपल्याला निर्णय चुकत आहे असे वाटते.पण कितीही निर्णय चुकले आणि आयुष्य बिकट झाले तरी त्यावर काही न काही मार्ग निघतो पण शोधला तरच तो मिळतो.

जीवनात येऊन एवढंच तर महत्वाचं  असतं.. हेच तर शिकायचं असतं ...निर्णय चुकतो कधी .... ठीक आहे...निर्णय बरोबर असेल तर आत्मविश्वास आणि यश मिळतं. आणि चुकला तर अनुभव मिळतो. दोन्हीमध्ये फायदा आपलाच आहे...नाही का...आपल्या आयुष्याचा...महत्वाच्या टप्प्यांचा निर्णय आपणच घ्यायला हवा."

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकतजाते,
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते,
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते,
दाखविनाऱ्याला वाट माहित नसते,
चालणाऱ्याचे ध्येयमात्र हरवून जाते,
दिसतात तितक्या सोप्या नसतात
काही गोष्टी,"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते....


उत्तर लिहिले · 30/4/2020
कर्म · 55350