माझा प्रत्येक निर्णय चुकत आहे. पैसे असून सुद्धा मला निर्णय घ्यायची आता भीती वाटत आहे, काय करावे सुचतच नाही?
माझा प्रत्येक निर्णय चुकत आहे. पैसे असून सुद्धा मला निर्णय घ्यायची आता भीती वाटत आहे, काय करावे सुचतच नाही?
अश्या प्रकारच्या घटना प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात घडतातच” यशाची पायरी चढताना यातून प्रत्येक व्यक्तिला जावेच लागते.
अश्यावेळी तुमचे सर्व निर्णय हे भवनीक होऊन जातात कारण एक लक्षात राहू द्या; “मनातून भावनिक झालात तर बैधिक पातळी कमी होते” व निर्णय चुकतात.
आपण जेव्हा निर्णय घेतो तो त्यावेळची जी परिस्तिथी असते त्यावर अवलंबून असतो.कितीही विचार करून निर्णय घेतला तरी कधी कधी परिस्थिती बदलते जसे माणसं बदलू शकतात, आर्थिक परिस्तिथी वर खाली होऊ शकते, माणसाची सांगत बिघडू शकते. थोडक्यात ज्या ज्या गोष्टींचा आधार घेऊन आपण निर्णय घेतो ती कायम तशीच राहत नाही. सगळं बदलत जातं आणि मग आपल्याला निर्णय चुकत आहे असे वाटते.पण कितीही निर्णय चुकले आणि आयुष्य बिकट झाले तरी त्यावर काही न काही मार्ग निघतो पण शोधला तरच तो मिळतो.
जीवनात येऊन एवढंच तर महत्वाचं असतं.. हेच तर शिकायचं असतं ...निर्णय चुकतो कधी .... ठीक आहे...निर्णय बरोबर असेल तर आत्मविश्वास आणि यश मिळतं. आणि चुकला तर अनुभव मिळतो. दोन्हीमध्ये फायदा आपलाच आहे...नाही का...आपल्या आयुष्याचा...महत्वाच्या टप्प्यांचा निर्णय आपणच घ्यायला हवा."
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकतजाते,
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते,
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते,
दाखविनाऱ्याला वाट माहित नसते,
चालणाऱ्याचे ध्येयमात्र हरवून जाते,
दिसतात तितक्या सोप्या नसतात
काही गोष्टी,"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते....
तुमचा प्रत्येक निर्णय चुकत आहे आणि पैसे असून सुद्धा तुम्हाला निर्णय घ्यायची भीती वाटत आहे हे ऐकून मला वाईट वाटले. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी तुम्ही करू शकता:
1. शांत राहा:
सर्वात आधी शांत राहण्याचा प्रयत्न करा. जास्त ताण घेतल्याने योग्य निर्णय घेणे कठीण होऊ शकते.
2. विचार करा:
तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा विचार करा. काय चुकले आणि का चुकले हे समजून घ्या. या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा.
3. तज्ञांचा सल्ला घ्या:
जर तुम्हाला आर्थिक निर्णय घ्यायला भीती वाटत असेल, तर तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
4. लहान सुरुवात करा:
मोठे निर्णय घेण्याऐवजी लहान निर्णयांनी सुरुवात करा. लहान यश तुम्हाला आत्मविश्वास देईल.
5. सकारात्मक दृष्टिकोन:
सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवते. त्यामुळे निराश होऊ नका.
"अपयश ही यशाची पहिली पायरी आहे."
6. ध्यान आणि व्यायाम:
नियमित ध्यान आणि व्यायाम केल्याने तुमचा ताण कमी होतो आणि मनःशांती मिळते.
7. कुटुंबाचा आणि मित्रांचा आधार घ्या:
तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांशी बोला. ते तुम्हाला भावनिक आधार देऊ शकतील.
लक्षात ठेवा,
अडचणी येतात आणि जातात. धीर धरा आणि सकारात्मक दृष्टीने पुढे जा.
तुम्हाला लवकरच यातून मार्ग मिळेल.