Topic icon

निर्णय घेणे

0

निर्णय प्रक्रिया म्हणजे अनेक पर्यायांमधून एक विशिष्ट पर्याय निवडण्याची प्रक्रिया. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी व्यक्ती आणि संस्था दोघांनाही त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यास मदत करते.

निर्णय प्रक्रियेत खालील पायऱ्यांचा समावेश असतो:

  1. समस्या किंवा संधी ओळखणे: सर्वप्रथम, निर्णय घेण्यासाठीची गरज ओळखावी लागते.
  2. माहिती गोळा करणे: समस्येबद्दल किंवा संधीबद्दल संबंधित माहिती गोळा करणे आवश्यक आहे.
  3. पर्यायांची निर्मिती: माहितीच्या आधारावर, विविध संभाव्य पर्यायांची यादी तयार करणे.
  4. पर्यायांचे मूल्यांकन: प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे तोलणे.
  5. सर्वोत्तम पर्याय निवडणे: मूल्यांकनानंतर, सर्वोत्तम पर्याय निवडावा लागतो.
  6. निर्णयाची अंमलबजावणी: निवडलेल्या पर्यायाची अंमलबजावणी करणे.
  7. परिणामांचे मूल्यांकन: निर्णयाच्या परिणामांचे मूल्यांकन करणे आणि आवश्यक असल्यास सुधारणा करणे.

निर्णय घेताना अनेक घटक विचारात घेतले जातात, जसे की वेळ, संसाधने, आणि धोके. चांगला निर्णय घेण्यासाठी, विचारपूर्वक आणि वस्तुनिष्ठ असणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
1
निर्णय घेण्याची प्रक्रिया

स्वतःच्या आवडी-निवडी, सोय-गैरसोयी, प्राधान्ये, मूल्ये हे लक्षात घ्यायचे वेळच्यावेळी निर्णय घायचा. कधी वेळेच्या आधीच घ्यायचा. निर्णय प्रक्रियेचे टप्पे जाणीवपूर्वक चढायचे. या सगळ्यासाठी सारासार विचार, धीटपणा , कणखरपणा जोपासायचा.




एखाद्या विषयाबाबत अनेक पर्यायांमधून कोणता पर्याय निवडायचा ते ठरवणे आणि त्यानुसार कृती करणे
काही निर्णय झटकन घेता येतात, तर काहींबाबत खूप काळ लागतो.
वेळेवर, जबाबदारीने, विचारपूर्वक घेतलेले निर्णय अधिक फलदायी ठरतात.
काही निर्णय व्यक्तिगत, तर काही सामूहिक.
मात्र, कोणताही निर्णय कधीही १००% योग्य नसतो!
कसकसा घ्यायचा निर्णय?
‘माझे व्यक्तिगत निर्णय मी घेणार’ असे ठरवायचे. कोणकोणत्या गोष्टींविषयी स्वतः निर्णय घ्यायचे आहेत , त्याचे भान ठेवायचे. स्वतःच्या आवडी-निवडी, सोय-गैरसोयी, प्राधान्ये, मूल्ये हे लक्षात घ्यायचे वेळच्यावेळी निर्णय घायचा. कधी वेळेच्या आधीच घ्यायचा. निर्णय प्रक्रियेचे टप्पे जाणीवपूर्वक चढायचे. या सगळ्यासाठी सारासार विचार, धीटपणा , कणखरपणा जोपासायचा.

निर्णय घेण्याचे टप्पे'

निर्णयविषय समजून घेणे, वस्तुस्थिती जाणणे
निर्णय घेण्यासाठीचे आधार, निकष ठरवणे
निर्णयासाठी अनेक पर्याय शोधणे
निकषांच्या आधारे पर्याय तोलणे
उत्तम पर्याय निवडणे
त्यानुसार कार्यवाही करणे
निवडलेल्या पर्यायाचे परिणाम कालांतराने जोखणे
निर्णय प्रक्रियेमध्ये सुधारणा करत राहणे

पाल्यांमधील निर्णयक्षमता

१. तान्हेपणापासून जोपासणे शक्य! २. प्रतिसादात्मक/लोकशाही पालकत्व शैली उपयुक्त ३. परस्परावलंबन कमी ४. उभयतांमध्ये परिपक्वता, विश्वास, आदर


उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53720
2
आयुष्यात जर निर्णय घेणे अवघड होत असेल आणि दोन्ही निरै बरोबर वाटत असेल म्हणजे एक निर्णय मनापासून घेतलेला आणि एक विचारपुर्वक तर काय करावे  तर   पहिलं आपल्या डोक्यात जो गोंधळ चालु असतो त्याला  पहिलं शांत करावं कारण डोक्यात गोंधळ चालु झाला कि निर्णय घेणं कठीण होऊन जातं  आपण विचार करावा विचार केला पाहिजे पण तो कधी जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा विचार करावा  नाही तर काय होतं माहिती आहे का  त्या विचारांमध्ये आपण चुकिचा निर्णय घेऊन मोकळे  पहिलं विचार कमी  आपण विचारांमध्ये काय करतो जसं पाटीवर अक्षरं गिरवतो तसं काही एक सारखा तो विचार करतो 
जर तुम्ही कोणताही निर्णय  मनापासून घ्या शांत पणे घ्या आणि मनात सकारात्मक भावना विचार निर्माण करा आणि डोळे बंद करून मनापासून निर्णय घ्या आणि त्यावर विचार करा आणि तो निर्णय विचारपूर्वक ही असेल आणि मनापासून हि असेल
कोणताही निर्णय मनापासून घ्यावा आणि त्यावर विचारपूर्वक विचार करावा विचारपुर्वक निर्णय सफळ होतो.
निर्णय ठरवणारा आपला गुरु आहे  गुरु म्हणजे मन त्याच्या शिवाय आपण काहीच करू शकत  नाही आपलं मन ठरवतं मन ही आपला विश्वास आहे  
निर्णय घेण्या आधी पहिला विश्वास आपल्यावर स्वतावर असेल तर  कोणताही निर्णय घेण्यास आपण  तयार असतो.
उत्तर लिहिले · 12/6/2022
कर्म · 53720
3
आत्मविश्वास गमावला तर आयुष्याचे मोठे निर्णय सुद्धा चुकतात!!

अश्या प्रकारच्या घटना प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात घडतातच” यशाची पायरी चढताना यातून प्रत्येक व्यक्तिला जावेच लागते.

अश्यावेळी तुमचे सर्व निर्णय हे भवनीक होऊन जातात कारण एक लक्षात राहू द्या; “मनातून भावनिक झालात तर बैधिक पातळी कमी होते” व निर्णय चुकतात.

आपण जेव्हा निर्णय घेतो तो त्यावेळची जी परिस्तिथी असते त्यावर अवलंबून असतो.कितीही विचार करून निर्णय घेतला तरी कधी कधी परिस्थिती बदलते जसे माणसं बदलू शकतात, आर्थिक परिस्तिथी वर खाली होऊ शकते, माणसाची सांगत बिघडू शकते. थोडक्यात ज्या ज्या गोष्टींचा आधार घेऊन आपण निर्णय घेतो ती कायम तशीच राहत नाही. सगळं बदलत जातं आणि मग आपल्याला निर्णय चुकत आहे असे वाटते.पण कितीही निर्णय चुकले आणि आयुष्य बिकट झाले तरी त्यावर काही न काही मार्ग निघतो पण शोधला तरच तो मिळतो.

जीवनात येऊन एवढंच तर महत्वाचं  असतं.. हेच तर शिकायचं असतं ...निर्णय चुकतो कधी .... ठीक आहे...निर्णय बरोबर असेल तर आत्मविश्वास आणि यश मिळतं. आणि चुकला तर अनुभव मिळतो. दोन्हीमध्ये फायदा आपलाच आहे...नाही का...आपल्या आयुष्याचा...महत्वाच्या टप्प्यांचा निर्णय आपणच घ्यायला हवा."

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकतजाते,
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते,
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते,
दाखविनाऱ्याला वाट माहित नसते,
चालणाऱ्याचे ध्येयमात्र हरवून जाते,
दिसतात तितक्या सोप्या नसतात
काही गोष्टी,"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते....


उत्तर लिहिले · 30/4/2020
कर्म · 55350
0

उत्तर: होय, आर्थिक प्रश्न सोडवताना घ्यावे लागणारे निर्णय बहुतेक वेळा निवड करण्याच्या स्वरूपाचे असतात.

स्पष्टीकरण:

  • मर्यादित संसाधने: आपल्याकडे नेहमीच मर्यादित संसाधने (उदा. पैसे, वेळ, मनुष्यबळ) असतात. त्यामुळे, आपल्याला अनेक पर्यायांमधून निवड करावी लागते.
  • अनेक पर्याय: प्रत्येक आर्थिक समस्येचे अनेक संभाव्य उपाय असू शकतात. या उपायांमधून सर्वोत्तम पर्याय निवडणे आवश्यक असते.
  • धोका आणि अनिश्चितता: भविष्यात काय होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे, प्रत्येक निवडीमध्ये काही प्रमाणात धोका आणि अनिश्चितता असते.

उदाहरण:

समजा, तुमच्याकडे रु. 10,000 आहेत आणि तुम्हाला ते गुंतवायचे आहेत. तुमच्यासमोर खालील पर्याय आहेत:

  1. बँकेत ठेव (Fixed Deposit) करणे.
  2. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे.
  3. सोन्यात गुंतवणूक करणे.

तुम्ही कोणता पर्याय निवडता हे तुमच्या धोक्याची तयारी, गुंतवणुकीचा कालावधी आणि अपेक्षित परतावा यावर अवलंबून असते. त्यामुळे, हा एक निवडीचा प्रश्न आहे.

आर्थिक निर्णय घेताना खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे:

  • आपले ध्येय काय आहे?
  • प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे काय आहेत?
  • आपल्याला किती धोका पत्करायची तयारी आहे?
  • आपल्याकडे किती वेळ आहे?

या माहितीच्या आधारे, तुम्ही सर्वोत्तम पर्याय निवडू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980
6
जीवनात कधी कधी अशी परिस्थिती येते, त्या वेळी संयम बाळगावा, मोठे निर्णय घेऊ नये, निर्णय घ्यावा लागला तर तो घेतांना अनुभवी व विश्वासू लोकांचा सल्ला जरूर घ्यावा. नेहमी लक्षात ठेवा जीवनात कोणतीच वेळ एकसारखी नसते, ती सतत बदलत असते. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती नक्की बदलेल. देवावर विश्वास ठेवा आणि त्याचे खऱ्या मनाने व दररोज नामस्मरण करा. शुभेच्छा!
उत्तर लिहिले · 5/4/2019
कर्म · 2920
0

विचार करून निर्णय घ्यावा की निर्णय घेऊन विचार करावा?, हा एक कठीण प्रश्न आहे, कारण दोन्ही बाजूंचे फायदे आणि तोटे आहेत.

1. विचार करून निर्णय घेणे:

  • फायदे:
    • अधिक माहिती आणि विश्लेषणावर आधारित निर्णय असतो.
    • चूक होण्याची शक्यता कमी होते.
    • परिणामांचा अंदाज बांधता येतो.
  • तोटे:
    • जास्त वेळ लागू शकतो.
    • संधी गमावण्याची शक्यता असते.
    • अतिविचारामुळे निर्णय घेणे कठीण होऊ शकते.

2. निर्णय घेऊन विचार करणे:

  • फायदे:
    • त्वरित निर्णय घेता येतो.
    • संधीचा फायदा घेता येतो.
    • आत्मविश्वास वाढतो.
  • तोटे:
    • चूक होण्याची शक्यता जास्त असते.
    • परिणामांचा अंदाज नसतो.
    • पश्चात्ताप होण्याची शक्यता असते.

अखेरीस, कोणता मार्ग योग्य आहे हे परिस्थितीवर अवलंबून असते.

जर वेळ असेल आणि माहिती उपलब्ध असेल, तर विचार करून निर्णय घेणे चांगले.

जर वेळ कमी असेल आणि त्वरित निर्णय घेणे आवश्यक असेल, तर निर्णय घेऊन विचार करणे ठीक आहे.

महत्वाचे म्हणजे, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या ध्येयांचा आणि मूल्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

लाईव्ह मिंट (Live Mint)

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980