प्रक्रिया मानसशास्त्र निर्णय घेणे

निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी स्पष्ट कराल?

1
निर्णय घेण्याची प्रक्रिया

स्वतःच्या आवडी-निवडी, सोय-गैरसोयी, प्राधान्ये, मूल्ये हे लक्षात घ्यायचे वेळच्यावेळी निर्णय घायचा. कधी वेळेच्या आधीच घ्यायचा. निर्णय प्रक्रियेचे टप्पे जाणीवपूर्वक चढायचे. या सगळ्यासाठी सारासार विचार, धीटपणा , कणखरपणा जोपासायचा.




एखाद्या विषयाबाबत अनेक पर्यायांमधून कोणता पर्याय निवडायचा ते ठरवणे आणि त्यानुसार कृती करणे
काही निर्णय झटकन घेता येतात, तर काहींबाबत खूप काळ लागतो.
वेळेवर, जबाबदारीने, विचारपूर्वक घेतलेले निर्णय अधिक फलदायी ठरतात.
काही निर्णय व्यक्तिगत, तर काही सामूहिक.
मात्र, कोणताही निर्णय कधीही १००% योग्य नसतो!
कसकसा घ्यायचा निर्णय?
‘माझे व्यक्तिगत निर्णय मी घेणार’ असे ठरवायचे. कोणकोणत्या गोष्टींविषयी स्वतः निर्णय घ्यायचे आहेत , त्याचे भान ठेवायचे. स्वतःच्या आवडी-निवडी, सोय-गैरसोयी, प्राधान्ये, मूल्ये हे लक्षात घ्यायचे वेळच्यावेळी निर्णय घायचा. कधी वेळेच्या आधीच घ्यायचा. निर्णय प्रक्रियेचे टप्पे जाणीवपूर्वक चढायचे. या सगळ्यासाठी सारासार विचार, धीटपणा , कणखरपणा जोपासायचा.

निर्णय घेण्याचे टप्पे'

निर्णयविषय समजून घेणे, वस्तुस्थिती जाणणे
निर्णय घेण्यासाठीचे आधार, निकष ठरवणे
निर्णयासाठी अनेक पर्याय शोधणे
निकषांच्या आधारे पर्याय तोलणे
उत्तम पर्याय निवडणे
त्यानुसार कार्यवाही करणे
निवडलेल्या पर्यायाचे परिणाम कालांतराने जोखणे
निर्णय प्रक्रियेमध्ये सुधारणा करत राहणे

पाल्यांमधील निर्णयक्षमता

१. तान्हेपणापासून जोपासणे शक्य! २. प्रतिसादात्मक/लोकशाही पालकत्व शैली उपयुक्त ३. परस्परावलंबन कमी ४. उभयतांमध्ये परिपक्वता, विश्वास, आदर


उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53750
0
मी तुम्हाला निर्णय घेण्याची प्रक्रिया स्पष्ट करेन:

निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे योग्य निवड करण्यासाठी काही महत्वाच्या पायऱ्या पार पाडणे.

निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे:

  1. समस्या किंवा गरजेची जाणीव:

    सर्वात आधी तुम्हाला कशाबद्दल निर्णय घ्यायचा आहे हे समजणे महत्त्वाचे आहे. नेमकी समस्या काय आहे किंवा तुमची गरज काय आहे, हे स्पष्टपणे माहीत असले पाहिजे.

  2. माहिती गोळा करणे:

    निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मिळवणे. जसे की, त्या समस्येबद्दल आकडेवारी, तज्ञांचे मत, किंवा इतर उपलब्ध माहिती.

  3. पर्यायांचा विचार करणे:

    तुमच्यासमोर असलेले विविध पर्याय शोधणे आणि त्यांची यादी बनवणे. प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे काय आहेत, याचा विचार करणे.

  4. मूल्यांकन आणि निवड:

    आता तुमच्याकडील माहिती आणि पर्यायांच्या आधारावर कोणत्या पर्यायाचा जास्त फायदा आहे आणि कोणता पर्याय व्यवहार्य आहे, हे ठरवणे. सर्वात योग्य पर्याय निवडणे.

  5. अंमलबजावणी:

    निवडलेल्या पर्यायानुसार कृती करणे. म्हणजेच, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे.

  6. परिणामांचे मूल्यांकन:

    निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम तपासणे. अपेक्षित परिणाम मिळाले की नाही, हे पाहणे आणि आवश्यक असल्यास सुधारणा करणे.

या पायऱ्या वापरून तुम्ही कोणताही निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2040

Related Questions

माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?
सामाजिक परिपक्वता कशी निर्माण करावी?
हजरजबाबीपणा नसल्यामुळे दुसऱ्यांसमोर कमजोर ठरतो का?
आपण शिस्त का पाळत नाही?
मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?
मी समाज किंवा जग बदलण्याचा जसा विचार केला होता, हे जग तसे नाहीये?