Topic icon

स्मरणशक्ती

0

लक्षात ठेवण्यासाठी काही उपाय:

  • उजळणी करा: वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींची नियमितपणे उजळणी केल्यास त्या गोष्टी अधिक काळ लक्षात राहण्यास मदत होते.
  • लिहून काढा: महत्त्वाच्या गोष्टी लिहून काढल्याने त्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतात.
  • जोडून घ्या: नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडून घ्या. त्यामुळे तुम्हाला गोष्टी अधिक सहजपणे आठवतील.
  • कल्पना करा: वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींची कल्पना करा.visualizationistrastमुळे तुम्हाला त्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतील.
  • सराव करा: ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, त्यांचा नियमितपणे सराव करा.
  • पुरेशी झोप घ्या: पुरेशी झोप घेतल्याने स्मरणशक्ती सुधारते.
  • तणाव कमी करा: तणावामुळे स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • ध्यान करा: ध्यानामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.

या उपायांमुळे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत होईल.

अधिक माहितीसाठी हे उपयुक्त वेबसाईट्स:

उत्तर लिहिले · 8/5/2025
कर्म · 980
1
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधे
 
अनेक जण विसराळूपणामुळे किंवा स्मरणशक्ती कमी असण्यामुळे त्रस्त असतात. तर बऱ्याच वेळा लहान मुलांची अभ्यासातील एकाग्रता कमी आहे अशी तक्रारदेखील पालक करताना दिसतात. मात्र अनेक उपाय किंवा महागडी औषधे घेऊनसुद्धा अनेकांना विशेष गुण येत नाही. मात्र आयुर्वेदात असे उपाय किंवा वनस्पती आहेत जे एकाग्रता वाढविण्यासोबतच स्मरणशक्ती तल्लख करतात.


१.ब्राह्मी –
ब्राह्मी ही वनस्पती बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी सर्वोत्तम टॉनिक असल्याचं म्हटलं जातं. बुद्धीची क्रियाशीलता वाढवण्यासाठी आज दिल्या जाणाऱ्या अनेक आयुर्वेदिक टॉनिकमध्ये ब्राह्मीचा आवर्जुन वापर केला जातो. ताण-तणाव दूर करून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ब्राह्मी अत्यंत परिणामकारक आहे. त्याचबरोबर ब्राह्मीमुळे मेंदूतील पेशींच्या धाग्यांची लांबी वाढते आणि त्याचा फायदा थेट स्मरणशक्ती, एखादी गोष्ट शिकण्याच्या क्षमतेत वाढ करण्यास मदत करण्यात होतो.

२.शंखपुष्पी –
आयुर्वेदिक औषधांमध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाची वापरली जाणारी वनस्पती म्हणजे शंखपुष्पी. शंखपुष्पीमुळेही मनावरील ताण कमी होतो आणि स्मरणशक्ती चांगली होते. मनातील गोंधळ कमी होतो आणि चंचलता कमी होऊन एकाग्रता वाढते. तसंच झोपही चांगली येते. मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी चांगली झोप लागणे महत्त्वाचे आहे असे आयुर्वेदात मानले जाते.

३.अश्वगंधा-
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधा सर्वोत्तम पर्याय आहे. तसंच अश्वगंधामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. अश्वगंधामुळे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी व मेंदूची कार्यक्षमता व्यवस्थित होते.


४.ध्यान –
आयुर्वेदात ध्यान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार ध्यान करणं हा जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे.ध्यान केल्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. मन शांत करण्यासाठी व एंडॉर्फिनचा स्राव वाढवण्यासाठी ध्यान केलं जातं. त्यामुळे अनेक पाश्चात्य देशांमध्येदेखील ध्यान करण्याला विशेष महत्त्व आहे.

५.साखर टाळा –
कोणत्याही आयुर्वेदिक आहाराचा पहिला नियम म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न बंद करणे आणि नैसर्गिक पदार्थ खाणे. विशेष म्हणजे साखर असलेले स्नॅक्स व पेये टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. साखर खाल्ल्याने स्थूलपणा वाढतो हे आता बहुतांश भारतीयांना माहित आहे. पण, जास्त गोड खाण्याचा परिणाम स्मरणशक्तीवरही होतो. त्यामुळे साखरेला पर्याय म्हणून आयुर्वेदात सांगितलेल्याप्रमाणे गूळ किंवा खजुराचा वापर करावा.




उत्तर लिहिले · 5/5/2022
कर्म · 53715
0

कल्पनाशक्तीचे प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी असे दोन प्रकार सॅम्युअल टेलर कोलरिज (Samuel Taylor Coleridge) यांनी मानले.

सॅम्युअल टेलर कोलरिज हे एक इंग्लिश कवी, लेखक, साहित्यिक समीक्षक आणि तत्त्वज्ञ होते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
5
 स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ सोपे उपाय

बदलती जीवनशैली, पौष्टिक आहाराचा अभाव इत्यादी गोष्टींचा आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या सर्व गोष्टींचा कधी कधी स्मरणशक्तीवर दुष्परिणाम होऊ लागतात. लहान वयामध्येच विसराळूपणा वाढत जातो. पण ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही. यावर वेळीच उपचार करा


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारापासून व्यायामापर्यंत अनेक गोष्टी उपयोगी पडतात. व्यायामानंतर लगेच डुलकी काढल्यानं स्मरणशक्तीसाठी वाढण्यास मदत होते, असं अनेक संशोधनांती सिद्ध झालं आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, याविषयी...

विचार करताना...
आपले डोळे बंद असतात, तेव्हा लक्ष विचलित होण्याची शक्यता कमी असते. एका विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार ज्या व्यक्ती डोळे बंद करुन प्रश्नांची उत्तरं देतात ती अचूक असतात. त्यामुळे विचार करताना डोळे बंद करा. या सरावामुळे स्मरणशक्तीदेखील वाढते.


​स्वतःशी संवाद साधा



स्वतःशी बोलणं ही चांगली सवय आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. याला प्रॉडक्शन इफेक्ट असं म्हणतात. ऐकणं आणि बोलणं या दोन कृती एकाच वेळी पार पडत असल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.



​रक्तदाब तपासा



उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या प्रक्रियेशी निगडित समस्या उद्भवण्याची शक्यता असू शकते. अलाबामा युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, उच्च रक्तदाबामुळे मेंदूला रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी, स्मरणशक्ती कमी होते.




​गाणी गुणगुणा



गाणं गाताना मेंदूचा उजवी बाजू वापरली जाते, त्यामुळे समस्येचं निराकरण करण्याची क्षमता वाढते. नवीन गाण्याचे शब्द लक्षात ठेवणं, कठीण असलं तरीही तो एक प्रकारचा व्यायाम आहे. त्या मेंदूला फायदा होतो.




​ध्यानधारणा करणं फायदेशीर



दिवसातील पंधरा ते तीस मिनिटं ध्यानधारणा आणि योग करणाऱ्या व्यक्तींची स्मरणशक्ती उत्तम असते, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे दृष्टिकोनात बदल होऊन सकारात्मक विचार करण्यास प्रेरणा मिळते. त्यामुळे अनेक मानसोपचारतज्ज्ञही ध्यानधारणा करण्याचा सल्ला देतात.

(
​पेन्सिलचा वापर



ऐकताना किंवा काही पाहताना कागदावर रेघोट्या ओढण्याची सवय अनेकांना असते. अशा लोकांचा स्मरणशक्ती चाचणीत ३० टक्के अधिक उत्तम निकाल दिसून आला आहे. तसंच लिहिण्यानेही मेंदूचा व्यायाम होतो. त्यामुळे जो मजकूर लिहून काढतो तो अधिक चांगल्याप्रकारे लक्षात राहतो, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे शक्य असल्यास लिहा. अर्थात, कीबोर्ड ऐवजी हातानं कागदावर लिहा. यामुळे मनातील भावनांना वाट मोकळी करुन देता येईल.

(
​दैनंदिन कामांमध्ये करा बदल



काही ठरावीक दिवासानंतर दैनंदिन कामांमध्ये लहानसहान बदल करणं आवश्यक आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या खुर्चीवर बसा, टीव्ही पाहताना जागा बदला किंवा दैनंदिन वापरातील वस्तूंची जागा बदला. असे काही बदल केल्यानं बराच फरक पडेल.





नियमित सात ते आठ तासांची झोप घ्या. यानंतर आपल्या आहारामध्ये फळे, हिरव्या भाज्या आणि प्रोटीन इत्यादी पोषक घटकांचा समावेश होत आहे की नाही, याची काळजी घ्या. सकाळी उठल्यानंतर पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा. ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडचा समावेश असलेल्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा. सुकामेवा, अळशीच्या बिया इत्यादी. नियमित आठ ते नऊ ग्लास पाणी प्या.



    

उत्तर लिहिले · 15/3/2022
कर्म · 121765
0
बरोबर
उत्तर लिहिले · 21/11/2021
कर्म · 5
2

बदाम भिजत घाला आणि रोज खा किंवा शंकपुष्पी घ्या… अस काही मी सांगणार नाही.

स्मरणशक्ती कमजोर होण्याची कारण आधी लक्षात घ्या. सर्वात मुख्य कारण दुर्लक्ष करणे, कंटाळा करणे, समोरच्या व्यक्तीच्या कामाला महत्त्व न देणे.

आठवून बघा आपल्याला आई, वडील काहीतरी काम सांगतात, “करेन” अस म्हणून आपण ते काम अंगावर पण घेतो. पण नंतर विसरतो. का?

एकतर आपण गंभीरपणे त्या कामाची जबाबदारी घेतलेली नसते. रोजच काम सांगतात म्हणून दुर्लक्ष करतो किंवा उद्या करू म्हणून आळस करतो. परिणाम ते काम करायचं आपण विसरतो.

आणि ही सवय अंगवळणी पडली की आपल्याला वाटत आपली स्मरणशक्ती कमी झालीय.

अस काही नसत तुम्ही आठवण ठेवून जबाबदारीने गोष्टी करायला सुरुवात करा. तुमची स्मरणशक्ती वाढेल.

आपल मन ना चंचल असत, त्याला वळण लावावं लागत. मनाला बजावून सांगा मी आठवणीने सगळी कामं करीन बघा मन स्वतः तुम्हाला आठवण करून देईन

यावरून मी स्वतः च अनुभव सांगते, मला जेंव्हा कधी सकाळी लवकर उठून प्रवासाला जायचं असत किंवा एखादं काम सकाळी करायचं असत अशावेळी मी कधीच अलार्म लावत नाही. मी फक्त झोपतांना मनाला सांगते की मला किती वाजता जाग यायला हवी ते, आणि खरच मी अलार्म न लावते बरोबर वेळेवर जागी होते.

तुम्हीही करून बघा.

हो त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट शिकावी लागेल.

ती म्हणजे ध्यान लावणे. आणि गायत्री मंत्र म्हणणे.

गायत्री मंत्र माहित असेलच आता तर सायन्स ने सिद्ध केलय गायत्री मंत्राची महती. मग तो तर आपला आहे ना, आपण का आचरणात आणू नये.?

रोज मोठ्या आवाजात गायत्री मंत्र म्हणा, ओमकार म्हणा. याच का मागच्या जन्मीचं पण आठवेल (हा विनोद नाही हं…)




उत्तर लिहिले · 5/11/2021
कर्म · 121765
2
मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. * योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते.


मानवी मेंदूचे विविध भाग म्हणजे कॉर्पस कॅलोझम, सेरेब्रल कॉर्टेक्स, थल्यमस, हायपोथलॅमस, हिप्पोकॅम्पस, सेरेबेलम, ब्रेन-स्टेम. या विविध भागांवर मेंदूची विविध कार्यें अवलंबून असतात. उदा. जागृती, चेतना-उत्पत्ती, जाणीव, देहभान, निर्णय प्रक्रिया, कामाची अंमलबजावणी, भाषा-उत्पत्ती व वाढ, शिक्षण, समज, योजना कार्यान्वित करणे, प्रश्न सोडवणे किंवा उत्तर शोधून काढणे, विचार-प्रक्रिया अशी अनेक कार्ये मेंदूवर अवलंबून असतात. 
मेंदूचे संक्षिप्त स्वरूपांत कार्ये सांयची झाल्यास ही यादी फार मोठी होवू शकते. चेतना उत्पन्न करणे, लक्ष, अवधान जाणीव असणे, निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे, स्मृती किंवा आठवण, एकमेकाला अनुकूल क्रिया करणे, एखाद्या गोष्टीचे होणारे ज्ञान मिळवणे, योजना तयार करणे, प्रश्नाचा उलगडा करणे, कल्पना, विचार करणे, संस्मरणीय अशी स्मृती अथवा स्मरणशक्ती पूर्णतः मेंदूतील विशिष्ट भागावर अवलंबून असते. स्मरणशक्ती हे मनाचे बुद्धिसामर्थ्य आहे.

ती जणू मनाची बुद्धिशाखा आहे; ज्यायोगे कोणतीही प्राप्त माहिती सांकेतिक भाषेत साठवली जाते व जेव्हा जरूर असेल तेव्हा पूर्वस्थितीत प्राप्त केली जाते. ही एक मेंदूची विशिष्ट धारणा-शक्ती असते. प्रथम मेंदू, अग्रेषित झालेली माहिती स्वतःजवळ ठेवून घेतो व भविष्य काळात जेव्हा गरज असेल तेव्हा योग्य प्रकारे त्याच्या उपयोग करून घेतो. या कार्यप्रणालीला वैद्यकीय भाषेत लिम्बिक सिस्टीम असे म्हणतात. गतकालीन गोष्टी स्मरणात राहिल्या तरच भाषा वृद्धी, आपसातले नातेसंबंध, स्वतःची ओळख किंवा व्यक्तिमत्व प्रकट होणे शक्य असते. सुखकारक आयुष्यासाठी हे महत्वाचे असते.

स्मरणशक्ती म्हणजे काय असते हेही माहिती असायला पाहिजे. बाह्यजगतातील माहिती प्रथम विशिष्ट प्रक्रियेद्वारे प्राप्त केल्यावर मेंदूच्या एका ठराविक भागात संग्रहित केली जाते व जेव्हां आवश्यक असेल तेव्हां पुन्हा प्राप्त केली जाते. अशा रीतीने एक चक्र पूर्ण होते. हे एक चक्र पूर्ण होण्यासाठी मेंदूमध्ये अनेक भौतिक व रासायनिक प्रक्रिया घडतात. वरवर पाहता ही क्रिया जितकी साधी वाटते तितकीच ती गुंतागुंतीची असते. स्मृतिप्रक्रिया साधी, सरळ, स्वयंपूर्ण नसते. तिच्यातही अधून-मधून बिघाड होऊ शकतात. माहितीची प्राप्ती, साठवण व पुनर्प्राप्ती या क्रिया दूषित होऊ शकतात.


उत्तर लिहिले · 28/8/2021
कर्म · 121765