2 उत्तरे
2
answers
स्मरणशक्ती कशी वाढेल सांगा?
2
Answer link
स्मरणशक्ती कमजोर होण्याची कारण आधी लक्षात घ्या. सर्वात मुख्य कारण दुर्लक्ष करणे, कंटाळा करणे, समोरच्या व्यक्तीच्या कामाला महत्त्व न देणे.
आठवून बघा आपल्याला आई, वडील काहीतरी काम सांगतात, “करेन” अस म्हणून आपण ते काम अंगावर पण घेतो. पण नंतर विसरतो. का?
एकतर आपण गंभीरपणे त्या कामाची जबाबदारी घेतलेली नसते. रोजच काम सांगतात म्हणून दुर्लक्ष करतो किंवा उद्या करू म्हणून आळस करतो. परिणाम ते काम करायचं आपण विसरतो.
आणि ही सवय अंगवळणी पडली की आपल्याला वाटत आपली स्मरणशक्ती कमी झालीय.
अस काही नसत तुम्ही आठवण ठेवून जबाबदारीने गोष्टी करायला सुरुवात करा. तुमची स्मरणशक्ती वाढेल.
आपल मन ना चंचल असत, त्याला वळण लावावं लागत. मनाला बजावून सांगा मी आठवणीने सगळी कामं करीन बघा मन स्वतः तुम्हाला आठवण करून देईन
यावरून मी स्वतः च अनुभव सांगते, मला जेंव्हा कधी सकाळी लवकर उठून प्रवासाला जायचं असत किंवा एखादं काम सकाळी करायचं असत अशावेळी मी कधीच अलार्म लावत नाही. मी फक्त झोपतांना मनाला सांगते की मला किती वाजता जाग यायला हवी ते, आणि खरच मी अलार्म न लावते बरोबर वेळेवर जागी होते.
तुम्हीही करून बघा.
हो त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट शिकावी लागेल.
ती म्हणजे ध्यान लावणे. आणि गायत्री मंत्र म्हणणे.
गायत्री मंत्र माहित असेलच आता तर सायन्स ने सिद्ध केलय गायत्री मंत्राची महती. मग तो तर आपला आहे ना, आपण का आचरणात आणू नये.?
रोज मोठ्या आवाजात गायत्री मंत्र म्हणा, ओमकार म्हणा. याच का मागच्या जन्मीचं पण आठवेल (हा विनोद नाही हं…)
0
Answer link
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- पुरेशी झोप घ्या: झोप आपल्या मेंदूला माहिती साठवण्यात आणि आठवण्यात मदत करते. दररोज रात्री ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे. हार्वर्ड हेल्थ ब्लॉग
- नियमित व्यायाम करा: नियमित व्यायामामुळे मेंदूला रक्तपुरवठा सुधारतो आणि स्मरणशक्ती वाढते.PubMed Central
- पौष्टिक आहार घ्या: फळे, भाज्या, धान्ये आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या. ओमेगा-3 फॅटी ऍसिड असलेले मासे खा.
- ताण कमी करा: ताण स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे, ध्यान, योग, किंवा श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करून ताण कमी करा.
- नवीन गोष्टी शिका: नवीन भाषा शिका, वाद्य वाजवायला शिका किंवा कोडी सोडवा. यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि स्मरणशक्ती सुधारते.
- स्मरणशक्तीसाठी खेळ खेळा: स्मरणशक्ती सुधारण्यासाठी कार्ड गेम्स, सुडोकू, किंवा शब्दकोडे असे खेळ खेळा.
- पुरेशे पाणी प्या: डिहायड्रेशनमुळे स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्या.
- एकाग्रता वाढवा: काम करताना एकाग्रता ठेवण्याचा प्रयत्न करा. मल्टीटास्किंग टाळा, कारण यामुळे लक्ष विचलित होते आणि माहिती व्यवस्थित लक्षात राहत नाही.
- लिहून ठेवा: महत्त्वाची माहिती, अपॉइंटमेंट्स आणि कार्ये लिहून ठेवा. यामुळे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत होईल.