2 उत्तरे
2
answers
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे कोणती?
1
Answer link
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधे
अनेक जण विसराळूपणामुळे किंवा स्मरणशक्ती कमी असण्यामुळे त्रस्त असतात. तर बऱ्याच वेळा लहान मुलांची अभ्यासातील एकाग्रता कमी आहे अशी तक्रारदेखील पालक करताना दिसतात. मात्र अनेक उपाय किंवा महागडी औषधे घेऊनसुद्धा अनेकांना विशेष गुण येत नाही. मात्र आयुर्वेदात असे उपाय किंवा वनस्पती आहेत जे एकाग्रता वाढविण्यासोबतच स्मरणशक्ती तल्लख करतात.
१.ब्राह्मी –
ब्राह्मी ही वनस्पती बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी सर्वोत्तम टॉनिक असल्याचं म्हटलं जातं. बुद्धीची क्रियाशीलता वाढवण्यासाठी आज दिल्या जाणाऱ्या अनेक आयुर्वेदिक टॉनिकमध्ये ब्राह्मीचा आवर्जुन वापर केला जातो. ताण-तणाव दूर करून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ब्राह्मी अत्यंत परिणामकारक आहे. त्याचबरोबर ब्राह्मीमुळे मेंदूतील पेशींच्या धाग्यांची लांबी वाढते आणि त्याचा फायदा थेट स्मरणशक्ती, एखादी गोष्ट शिकण्याच्या क्षमतेत वाढ करण्यास मदत करण्यात होतो.
२.शंखपुष्पी –
आयुर्वेदिक औषधांमध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाची वापरली जाणारी वनस्पती म्हणजे शंखपुष्पी. शंखपुष्पीमुळेही मनावरील ताण कमी होतो आणि स्मरणशक्ती चांगली होते. मनातील गोंधळ कमी होतो आणि चंचलता कमी होऊन एकाग्रता वाढते. तसंच झोपही चांगली येते. मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी चांगली झोप लागणे महत्त्वाचे आहे असे आयुर्वेदात मानले जाते.
३.अश्वगंधा-
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधा सर्वोत्तम पर्याय आहे. तसंच अश्वगंधामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. अश्वगंधामुळे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी व मेंदूची कार्यक्षमता व्यवस्थित होते.
४.ध्यान –
आयुर्वेदात ध्यान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार ध्यान करणं हा जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे.ध्यान केल्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. मन शांत करण्यासाठी व एंडॉर्फिनचा स्राव वाढवण्यासाठी ध्यान केलं जातं. त्यामुळे अनेक पाश्चात्य देशांमध्येदेखील ध्यान करण्याला विशेष महत्त्व आहे.
५.साखर टाळा –
कोणत्याही आयुर्वेदिक आहाराचा पहिला नियम म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न बंद करणे आणि नैसर्गिक पदार्थ खाणे. विशेष म्हणजे साखर असलेले स्नॅक्स व पेये टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. साखर खाल्ल्याने स्थूलपणा वाढतो हे आता बहुतांश भारतीयांना माहित आहे. पण, जास्त गोड खाण्याचा परिणाम स्मरणशक्तीवरही होतो. त्यामुळे साखरेला पर्याय म्हणून आयुर्वेदात सांगितलेल्याप्रमाणे गूळ किंवा खजुराचा वापर करावा.
0
Answer link
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधे खालीलप्रमाणे आहेत:
- ब्राह्मी: ब्राह्मी हे एक प्रसिद्ध औषध आहे, जे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी वापरले जाते. हे मेंदूतील पेशींना उत्तेजित करते आणि तणाव कमी करते.
- शंखपुष्पी: शंखपुष्पी हे देखील एक उत्तम स्मरणशक्ती वाढवणारे औषध आहे. हे मेंदूला शांत करते आणि स्मरणशक्ती सुधारते.
- आवळा: आवळा व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे आणि तो अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करतो. हे मेंदूला हानिकारक free radicals पासून वाचवते.
- जटामांसी: जटामांसी हे औषध मेंदूला शांत ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
- वचा: वचा हे स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
- तुळस: तुळस ही एक औषधी वनस्पती आहे, जी स्मरणशक्ती सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते.
इतर उपाय:
- नियमित व्यायाम: नियमित योगा केल्याने स्मरणशक्ती सुधारते.
- पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
- पौष्टिक आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या आणि जंक फूड टाळा.
- ध्यान आणि प्राणायाम: नियमित ध्यान आणि प्राणायाम केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
टीप: कोणतीही आयुर्वेदिक औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.