व्यायाम व्यावसाईक डावपेच व्याकरण व्याज व्यापारी प्रसारमाध्यमे

12 व्या शतकात अल्लामप्रभु यांनी कोणत्या संप्रदायाचा प्रसार केला?

1 उत्तर
1 answers

12 व्या शतकात अल्लामप्रभु यांनी कोणत्या संप्रदायाचा प्रसार केला?

2

अल्लमप्रभु

अल्लमप्रभु : (१२ वे शतक). वीरशैव पंथाचे एक श्रेष्ठ संत व तत्त्ववेत्ते. त्यांना ‘प्रभुदेव’ असेही म्हणतात. ते⇨बसवांचे समकालीन असून त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. त्यांचा जन्म शिमोगा जिल्ह्यातील (म्हैसूर राज्य) बळ्ळिगावी येथे झाल्याचे मानतात. तथापि त्यांच्या जीवनाबाबत अधिकृत माहिती मिळत नाही. ⇨चामरस (सु. १४३०) नावाच्या कवीने प्रभुलिंगलीले ह्या कन्नड काव्यग्रंथात (ब्रह्मदासकृत मराठी ओवीबद्ध अनुवाद लीलाविश्वंभर – १७२२) अल्लमप्रभूंचे चरित्र वर्णन केले आहे. चामरसापूर्वी हरिहरकृत प्रभुदेव रगळे हरीश्वरकृत प्रभुदेव पुराण इ. काव्यग्रंथांतही त्यांची चरित्रपर माहिती आहे. विरूपाक्षकृत चेन्नबसव पुराणातही (१५८५) त्यांची चरित्रपर माहिती मिळते. तथापि उपर्युक्त सर्व ग्रंथांतील माहिती सांप्रदायिक व पुराणपद्धतीची आहे. एवढे मात्र खरे, की वीरशैव पंथात अल्लमप्रभूंना फार महत्त्वाचे व आदराचे स्थान आहे. त्यांच्या वचनांवरून ते अत्यंत वैराग्यसंपन्न, ज्ञानी, विचारवंत, स्पष्टवक्ते व साक्षात्कारी पुरुष होते असे दिसते. त्यांनी वीरशैव पंथाचा प्रचार व प्रसार केला. सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर अल्लमप्रभू कल्याण (हल्लीचे बसवकल्याण) येथे गेले. तेथे बसवांनी त्यांचा आध्यात्मिक अधिकार मान्य करून त्यांना शिवानुभवमंटपाच्या (वीरशैवांची धार्मिक संघटना) अध्यक्षपदी सन्मानाने बसविले. काही दिवसांनंतर आंध्र प्रदेशातील श्रीशैलम् येथे जाऊन अल्लमप्रभू समाधिस्थ झाले. बसवांच्या अगोदर त्यांनी समाधी घेतली.

शूम्यसंपादने ह्या प्रसिद्ध ग्रंथात अल्लमप्रभूंची वचने संकलित केलेली आहेत. त्यावरील अनेक टीकाग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या नावावरील अन्य ग्रंथांत षटस्थळज्ञानचारित्र्य, सृष्टीयवचन, मंत्रमाहात्म्य, बेडगिनवचन, कालज्ञानवचन आणि मंत्रगौप्य यांचा अंतर्भाव होतो. बेडगिनवचनमधील वचने प्रख्यात असून ती गूढार्थक आहेत. त्यांत त्यांचे आध्यात्मिक विचार आलेले आहेत. त्यांनी आपल्या वचनांतून तत्कालीन समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातिभेद, अज्ञान, दंभ इत्यादींवर कठोर टीकाही केलेली आहे. तसेच त्यांनी केवळ पंथीय धर्मोपदेशावर भर न देता विशाल मानवी तत्त्वांचाही पुरस्कार केला आहे.‘गुहेश्वर’ अशी नाममुद्रिका ते आपल्या वचनांतून योजितात.



उत्तर लिहिले · 7/1/2022
कर्म · 121705

Related Questions

आधुनिक शिक्षणाचा भारतामध्ये प्रसार करण्यासाठी कोणत्या तीन महत्त्वाच्या यंत्रणा जबाबदार होत्या त्याचा विस्तार कसा स्पष्ट कराल?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
बौध्द धर्माचे तत्वज्ञान आणि त्याच्या प्रसाराची कारणे कोणती आहेत?
'आधुनिक प्रसार माध्यमे' या विषयावर निबंध कसा लिहावा?
“आधुनिक प्रसारमाध्यमे” या विषयावर निबंध लेखन कसे कराल?
आधुनिक प्रसारमाध्यमे या विषयावर निबंध कसा लिहावा?