3 उत्तरे
3
answers
स्तनपानाचे फायदे व तत्त्वे कोणते?
2
Answer link
स्तनपानाचे फायदे
बाळाला स्तनपान केव्हा सुरु करावे ?
स्तनपान लवकर सुरु का करावे ?
सिझेरीयन पध्दतीने प्रसुती करवलेल्या स्त्रिया बाळाला स्तनपान करवू शकतात का ?
एखाद्या बाळाला किती काळपर्यंत स्तनपान करवावे ?
बाळाला स्तनपान करवल्यानंतर स्तनातून पाझर राहीला, तर काय करावे ?
एखादी माता आजारी असेल तरीही ती स्तनपान करवू शकते का ?
स्तनपान हे पोषणाचा एक स्रोत म्हणण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे – त्यामुळे माता तसंच तिच्या बाळाच्या आरोग्याला फायदा होतो.
बाळाला पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करवणं सर्वोत्तम कारण त्यामुळं पचनाशी निगडीत समस्यांपासून संरक्षण मिळतं – ते पचायला सोपं असतं आणि बध्दकोष्ठता होत नाही. त्यामुळं बाळाच्या आतड्यांची प्रतिकारशक्ती वाढते.
स्तनपानामुळं दमा आणि कानाच्या संक्रमणापासून संरक्षण मिळतं – याचं कारण असं की त्यामुळं बाळाच्या नाक आणि घशातील पडद्यांवर एक सुरक्षात्मक स्तर तयार होतो.
गायीच्या दुधानं काही बाळांना तीव्र प्रतिक्रीया येते. त्या तुलनेत स्तनपान हे शंभर टक्के सुरक्षित आहे.
स्तनपान करवलेल्या बाळांना नंतरच्या वयात लठ्ठपणा येत नाही असं संशोधनात आढळून आलं आहे – याचं कारण असं की त्यांना भूक लागते तेव्हाच ते अन्न घेतात त्यामुळं पहिल्यापासूनच अतिरीक्त वजन वाढण्याची शक्यता नसते.
बालवयात होणारा रक्तपेशीचा कर्करोग, टाईप-एक मधुमेह आणि नंतरच्या आयुष्यात उच्च रक्तदाब टाळण्याशी देखील स्तनपानाचा संबंध आहे.
स्तनपानामुळं मुलाची बुध्दी काही अंशांनी वाढते असं मत आहे कारण आई आणि बाळ यांच्यात भावनिक नातं निर्माण होतं, आणि अंशतः त्यात अनेक मेदाम्लं असतात जी बाळाच्या मेंदूच्या विकासात उपयुक्त ठरतात.
स्तनपान करवणा-या नवमातांचं वजन नंतर लवकर कमी होतं. त्याचप्रमाणं प्रसुतीनंतरचा तणाव आणि रक्तस्त्राव कमी करायला त्यामुळं मदत होते.
प्रसुतीनंतर नियमितपणे स्तनपान करवल्यास स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी करता येते – बाळाच्या संगोपनाचा काळ जितका अधिक तेवढा धोका कमी होतो.
स्तनपान करवणे अगदी सोयीचे आणि मोफत आहे (बाहेरील अन्नपदार्थ, दूध पाजावयाच्या बाटल्या आणि इतर वरच्या अन्नाची सामुग्री यांच्या तुलनेत) आणि सगळ्यात उत्तम म्हणजे माता आणि बाळाचं भावनिक नातं सुदृढ होतं – मातेच्या शरीराचा होणारा स्पर्शदेखील बाळाला आश्वस्त करणारा असतो.
बाळाला स्तनपान केव्हा सुरु करावे ?
बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच त्याला स्तनपान सुरु करावे. उघड्या बाळाला (त्याला हलक्या हातानं पुसून घेऊन कोरडं केल्यानंतर) आईनं स्तनांच्या जवळ धरावं आणि त्वचेचा स्पर्श होऊ द्यावा. त्यामुळे दूध वाहणं सुलभ होतं आणि बाळाला उब मिळते. त्याचप्रमाणं आई आणि बाळ यांच्यात भावनिक संबंध दृढ व्हायला मदत होते.
स्तनपान लवकर सुरु का करावे ?
याची चार मुख्य कारणं आहेतः
बाळ हे पहिल्या ३० ते ६० दिवसांमधे अतिशय क्रियाशील असते.
या काळात त्याची चोखण्याची भावना देखील अत्यंत क्रिय़ाशील असते.
लवकर सुरु करण्यानं स्तनपान यशस्वी होण्याची शक्यता वाढते. स्तनातून येणारा पहिला पिवळसर घट्ट द्राव हा बाळाला संक्रमणापासून वाचवणा-या अनेक घटकांनी युक्त असतो, तो लसीसारखंच काम करतो.
स्तनपान करवण्यानं स्तन सुजणे आणि वेदना टाळली जाते आणि प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव कमी होतो.
सिझेरीयन पध्दतीने प्रसुती करवलेल्या स्त्रिया बाळाला स्तनपान करवू शकतात का ?
या शस्त्रक्रियेमुळं बाळाला स्तनपान करवण्याच्या आपल्या क्षमतेत काहीही फरक पडत नाही.
स्तनपान हे शस्त्रक्रियेनंतर चार तासांनी सुरु करता येतं किंवा आपण भूलीच्या अमलाखालून बाहेर याल तेव्हा.
आपण एका कुशीवर आडवे होऊन बाळाला स्तनपान करवण्यास सुरुवात करावी, किंवा आपण बाळाला आपल्या ओटीपोटावर ठेवू शकता.
सिझेरीयन शस्त्रक्रिया झालेल्या सर्व माता पहिले काही दिवस मदत घेऊन आपल्या बाळांना स्तनपान करवण्यात य़शस्वी झाल्या आहेत.
एखाद्या बाळाला किती काळपर्यंत स्तनपान करवावे ?
पहिले सहा महिने केवळ स्तनपानच करवावे आणि त्यानंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपान चालू ठेवावे.
बाळाला स्तनपान करवल्यानंतर स्तनातून पाझर राहीला, तर काय करावे ?
ही समस्या तात्पुरती आहे आणि सामान्य आहे. दूध पाझरत आहे असं दिसल्यास, आपले कोपर स्तनांच्या बाहेरच्या बाजूंवर जोराने दाबावेत, त्यामुळे पाझर कमी होईल.
एखादी माता आजारी असेल तरीही ती स्तनपान करवू शकते का ?
होय. बहुतांश आजारांचा बाळावर परिणाम होत नाही. विषमज्वर, हिवताप, क्षयरोग, कावीळ किंवा कुष्ठरोग असला तरी स्तनपान थांबवू नये.
0
Answer link
स्तनपानाचे फायदे आणि तत्त्वे खालीलप्रमाणे:
स्तनपानाचे फायदे:
-
बाळासाठी फायदे:
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते: स्तनपान बाळाला आवश्यक असलेले अँटिबॉडीज (Antibodies) प्रदान करते, ज्यामुळे संसर्ग आणि रोगांपासून संरक्षण मिळते.
- पोषक तत्वे: स्तनपान हे बाळासाठी आवश्यक पोषक तत्वांचा परिपूर्ण स्रोत आहे.
- पचनासाठी सोपे: स्तनपान हे बाळाला पचनासाठी सोपे असते आणि त्यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
- ऍलर्जीचा धोका कमी: स्तनपानामुळे बाळाला ऍलर्जी होण्याचा धोका कमी होतो.
- मेंदूचा विकास: स्तनपानामुळे बाळाच्या मेंदूचा योग्य विकास होतो.
-
आईसाठी फायदे:
- गर्भाशय पूर्ववत होण्यास मदत: स्तनपान गर्भाशय पूर्ववत स्थितीत आणण्यास मदत करते.
- वजन कमी: स्तनपान करताना अतिरिक्त कॅलरी बर्न होतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग कमी: स्तनपान केल्याने स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
- नैसर्गिक गर्भनिरोधक: स्तनपान काही काळ नैसर्गिक गर्भनिरोधक म्हणून काम करते.
- भावनिक बंध: स्तनपान आई आणि बाळ यांच्यातील भावनिक बंध अधिक दृढ करते.
स्तनपानाचे तत्त्वे:
- लवकर सुरुवात: जन्मानंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करावे, शक्यतो पहिल्या तासात.
- वारंवार स्तनपान: बाळाला दिवसातून किमान ८-१२ वेळा स्तनपान द्यावे, म्हणजेच प्रत्येक २-३ तासांनी.
- रात्रीचे स्तनपान: रात्रीच्या वेळी देखील बाळाला स्तनपान द्यावे, कारण त्यामुळे दूध उत्पादन वाढते.
- पुरेसा वेळ: प्रत्येक बाजूने पुरेसा वेळ स्तनपान द्यावे, जेणेकरून बाळाला ‘फोर मिल्क’ (Fore milk) आणि ‘ hind milk’ (Hind milk) दोन्ही मिळतील.
- केवळ स्तनपान: पहिल्या सहा महिन्यांपर्यंत बाळाला फक्त स्तनपान द्यावे, पाणीसुद्धा देऊ नये.
- योग्य स्थिती: बाळाला योग्य स्थितीत स्तनपान द्यावे, ज्यामुळे आई आणि बाळ दोघांनाही आराम मिळेल.
- स्वच्छता: स्तनपान करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावेत आणि स्तनाग्रे (Nipples) देखील स्वच्छ ठेवावीत.
- आहार: स्तनपान देणाऱ्या आईने संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा.
टीप: अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.