2 उत्तरे
2 answers

सत्यशोधक समाजावर टिपा लिहा?

3

महात्मा जोतीराव फुले यांनी १८७३

साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची

स्थापना केली. सत्यशोधक समाजाने

पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला(१) एकेश्वरवाद व मूर्तिपूजेला विरोध.

(२) वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे आणि विवेचक बुद्धीचे प्रामाण्य स्वीकारणे.

(३) पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थील विरोध.

(४) चमत्कारांवर अविश्वास व तीर्थयात्रेल

विरोध.

(५) परलोक कल्पनेला विरोध.




 सत्यशोधक समाज

 महात्मा फुले- (

महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८७३ मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

अन्य धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार यामागे होता. 

बहुजन समाजाला मिळणाऱ्या प्रवृत्तींवर महात्मा फुले यांनी प्रहार केला. 

शेतकरी, कारागीर, कामगार आणि अठरापगड जातीचे भले साधण्याचा मार्ग महात्मा फुले यांनी दाखवला. 

सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला--

  एकेश्वरवाद व मूर्तीपूजेला विरोध. 

वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारले. 

विवेचक बुद्धिप्रामाण्यला प्राधान्य दिले. 

पुरोहितांच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थीला विरोध केला. 

मूर्तिपूजेला विरोध केला चमत्कारांवर विश्वास आणि तीर्थयात्रेला विरोध.

परलोक कल्पनेला विरोध.

 महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. 

स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग स्त्रियांच्या शिक्षणातून जातो, याची जाणीव या दोघांनी समाजाला करून दिली.

त्यांचे हे स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांनी चालविले.

 गोपाळ बाबा वलंगकर-

 महात्मा फुले यांचे समतेचे कार्य गोपाळबाबा वलंगकर यांनी पुढे चालवले. 

कारण भारतातील समाजरचना विषमतेवर आधारित होती. 

गोपाळबाबा वलंगकर यांनी विराट विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेवर कोरडे ओढले.

शिवराम जानबा कांबळे-

 शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतीन देवदासी यांच्या प्रश्‍नांकडे समाजाचे लक्ष वेधले.



उत्तर लिहिले · 3/12/2021
कर्म · 121765
0

सत्यशोधक समाज:

सत्यशोधक समाज हा १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सामाजिक आणि धार्मिक सुधारणावादी समाज होता. याची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी केली.

उद्देश:

  • समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि पुरोहितशाही यांचे निर्मूलन करणे.

  • सर्वांसाठी शिक्षण आणि समान संधी उपलब्ध करणे.

  • शूद्रांना ब्राह्मणांच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणे.

  • स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणे.

सत्यशोधक समाजाची विचारधारा:

  • ईश्वर एक आहे आणि तो निराकार आहे.

  • सर्व माणसे समान आहेत.

  • कोणत्याही मध्यस्थाशिवाय (उदा. पुरोहित) माणूस देवाची प्रार्थना करू शकतो.

  • कर्मकांडाला विरोध.

सत्यशोधक समाजाचे कार्य:

  • शिक्षणाचे महत्व: समाजाने शाळा उघडल्या आणि लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

  • जातिभेदाला विरोध: सत्यशोधक समाजाने आंतरजातीय विवाह आणि सहभोजनाला प्रोत्साहन दिले.

  • पुरोहितशाहीला विरोध: समाजाने धार्मिक विधींमध्ये ब्राह्मणांची आवश्यकता नाकारली.

  • स्त्रियांचे हक्क: स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक हक्कांसाठी समाजाने लढा दिला.

सत्यशोधक समाजाचे महत्त्व:

सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवले. या समाजाने:

  • दलित आणि मागासलेल्या लोकांना आत्म-सन्मान मिळवून देण्यास मदत केली.

  • शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

  • जातिभेदाच्या विरोधात आवाज उठवला.

  • पुरोहितशाहीला आव्हान दिले.

  • स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

मानवी हक्कांसाठी महात्मा फुले यांचे योगदान?
एनसीएस समाजसुधारकांनी कोणती सुधारणा केली?
छत्रपती शाहू महाराजांनी काय सुरू केले?
शाहू महाराजांचे कार्य स्पष्ट करा?
छत्रपती शाहूमहाराजांचे कार्य स्पष्ट करा?
छत्रपती शाहू महाराजांचे कार्य स्पष्ट करा?
संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणती उपदेश दिला?