कृषी भाज्या

फरसबी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

फरसबी म्हणजे काय?

2
फरसबी या भाजीला फ्रेंच बिन्स, फ्रेंच ग्रीन बिन्स, स्ट्रिंग बिन्स किंवा स्नॅप बिन्स अशी अनेक नावं आहेत. या आकाराने लांब, बारीक आणि थोडय़ा फुगीर असतात. अशी ही भाजी जगभरात खाल्ली जाते. ही भाजी ताजी तर चांगली लागतेच पण याशिवाय ती फ्रोजन आणि कॅनमध्ये ठेवलेलीदेखील चांगली लागते. म्हणजेच ही चांगली टिकते. लवकर खराब होत नाही. ही भाजी शिजवून त्याचप्रमाणे कच्ची खाल्लीही जाते. या भाजीत कमी कॅलरीज असून जीवनसत्त्व आणि खनिज यांचा भरपूर साठा आहे. अशा या भाजीचे गुणधर्म जाणून घेऊयात.

डाएटरी फायबरचं प्रमाण अधिक असल्याने रेचक म्हणून काम करते. त्यामुळे आतडय़ाचा कॅन्सर होत नाही.
सारक असल्याने पचनशक्ती सुधारते.
रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.
यात आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, मॅगनिझ आणि पोटॅशिअमचा साठा असल्याने शरीराचा मेटॅबॉलिझम चांगला ठेवण्यास मदत होते. यातील पोटॅशिअममुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
गरोदर बायकांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं कारण यात फॉलिक अॅसिडचं प्रमाण अधिक असल्याने अर्भकाच्या चेतासंस्थेची वाढ उत्तम होते. मासिक पाळीच्या दरम्यानही या भाजीचं सेवन करावं. बिजधारणेसाठी आवश्यक असणारं लोह या भाजीतून मिळतं.
या भाजीच्या सेवनाने डिप्रेशनचा त्रास होत नाही.
विटॅमिन केची कमतरता असली की हाडं ठिसूळ होऊन ती फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.
मात्र या भाजीतून व्हिटॅमिन के मिळत असल्याने हाडं मजबूत होतात.
जीवनसत्त्व अ असल्याने डोळ्याचं आरोग्य सुधारतं.

उत्तर लिहिले · 5/9/2021
कर्म · 1605
0

फरसबी ही एक भाजी आहे. ह्याला फ्रेंच बीन्स (French beans), ग्रीन बीन्स (green beans) किंवा स्नॅप बीन्स (snap beans) असेही म्हणतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1100

Related Questions

झुकिनी आणि काकडीमध्ये काय फरक आहे?
कच्या फणसाची भाजी कशी बनवावी?
भाजीपाला शब्दाचा विग्रह कोणता आहे?
मला वांग्याची कळी बनवायची आहे, मी कशी बनवू शकेल?
एखादी छान भाजी कशी बनवायची?
काकडीचे दोन प्रकार कोणते आहेत?
कांदे, लसूण, आले, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर?