औषधे आणि आरोग्य डोळे शारीरिक आरोग्य आरोग्य

डोळा फडफडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या डावा डोळा आणि उजवा डोळा का फडफडतो?

2 उत्तरे
2 answers

डोळा फडफडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या डावा डोळा आणि उजवा डोळा का फडफडतो?

0
डोळा फडकने शुभं की अशुभ ? जाणून घ्या उजवा आणि डावा डोळा फडफडण्या मागचे संकेत…


मित्रांनो तुमचा डोळा कोणत्याना कोणत्या कारणाने फडफडत असेल, तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. तर आपण पाहणार आहोत की स्त्री असो किव्हा पुरुष असो उजवा डोळा असो किव्हा डावा डोळा हा डोळा फडफडल्यानंतर त्याचे कोणकोणते अर्थ निघतात. मित्रांनो सामूदिक शास्त्रामध्ये या विषयी अगदी सविस्तर माहिती सांगितली आहे. भविष्यामध्ये ज्या काही चुका घडणार आहेत, मग त्या घटना शुभ असतील किव्हा अशुभ असतील याच पूर्व संकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ठ प्रकारचे डोळे फडफडणे ती क्रिया देत असते. आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐककले असेल की माझं हे हे अंग फडफडतय माझा हा डोळा फडकतोय आणि मग हे असणे अशुभ आहे की अशुभ आहे.


 
मित्रानो जोतिष शास्त्रनुसार किव्हा वास्तू शास्त्रनुसार डोळ्यांचं अस फडफडणे हे भविष्यात होणाऱ्या घटनेची पूर्व सूचना देत असते. शरीराची जवळजवळ सर्वांच्या सर्व अंगे फडफडत असतात, आणि त्या प्रत्येकाचा काहींनाकाही विशिष्ट अस अर्थ असतो. काही गोष्टी या शुभ होणार आहेत यांच्याकडे संकेत करतात. तर काही गोष्टी मात्र भविष्यात आपल्यावर्ती मोठं संकट आहे, हे आपल्याला सांगत असतात. चला तर पाहुयात आपला जर उडवा डोळा फडफडत असेल, किव्हा आपल्या उजव्या डोळ्याची जी पापणी आहे, किव्हा उजव्या डोळ्याची जी भोवया आहे. ती जर फडफडत असेल तर हे शुभ असत की अशुभ असत.


मित्रानो सामुद्रिक शास्त्र अस मानत की,पुरुषांमध्ये जर उजवा डोळा फडफडत असेल किव्हा उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर हे अत्यंत शुभ समजलं जातं.आणि भविष्यामध्ये अश्या पुरुषा ना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यांची अडलेली कामे होऊ शकतात, प्रमोशन होऊ शकतात, किव्हा मोठ्या प्रमाणात पैसा त्यांच्याकडे येऊ शकतो. परंतु मित्रांनो हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत होत असेल, की महिलांचा उजवा डोळा जर फडफडत असेल किव्हा पापणी फडफडत असेल, तर महिलांसाठी ही अतिशय अशुभ अशी अशी घटना असते. आज भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत अशुभ अशी घटना घडेल याच्या कडे ही गोष्ट संकेत करते.


 आपण पाहूया की जर डावा डोळा फडफडत असेल किव्हा डावी पापणी फडफडत असेल तर स्त्री आणि पुरुषांमध्ये काय हानी किव्हा फायदा करते. जर पुरुषांच्या बाबतीत जर डावा डोळा फडफडत असेल तर त्या मुळे या पुरुषांना भविष्यात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. ग्रहण लागण्याची शक्यता असते. किव्हा शत्रुत्व वाढू शकते. म्हणून आपलं वागण्यात बदल करायला हवा. जर हीच गोष्ट आपण स्त्रियांच्या बाबतीत पाहिली, तर ज्या स्त्रियांचा डावा डोळा किव्हा डावी पापणी फडफडत असेल तर याचा अर्थ असा की नजीकच्या जीवनामध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना कोणता ना कोणता फायदा नक्की होणार आहे. तर ही माहिती मित्रानो सामुद्रिक शास्त्र वर आधारित आहे.


 

उत्तर लिहिले · 6/8/2021
कर्म · 121765
0

डोळा फडफडणे याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. या संदर्भात ज्योतिष आणि वैद्यकीय दृष्टिकोन वेगवेगळे आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार:

  • उजवा डोळा फडफडणे:
    • पुरुषांसाठी: शुभ मानले जाते. यामुळे यश, मान-सन्मान मिळण्याची शक्यता असते.
    • महिलांसाठी: अशुभ मानले जाते. काही अडचणी किंवा नकारात्मक घटना घडू शकतात.
  • डावा डोळा फडफडणे:
    • पुरुषांसाठी: अशुभ मानले जाते. वाईट बातमी मिळण्याची किंवा नुकसान होण्याची शक्यता असते.
    • महिलांसाठी: शुभ मानले जाते. लाभदायक घटना घडू शकतात किंवा चांगली बातमी मिळू शकते.

वैज्ञानिक दृष्टिकोन:

वैद्यकीय दृष्ट्या डोळा फडफडणे हे एक सामान्य लक्षण आहे आणि याला मायोकिमिया (Myokymia) म्हणतात. यामागे अनेक कारणे असू शकतात:

  • तणाव: जास्त ताण घेतल्याने डोळे फडफडण्याची शक्यता असते.
  • थकवा: अपुरी झोप किंवा जास्त कामामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि ते फडफडतात.
  • कॅफिन आणि अल्कोहोल: जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा मद्यपान केल्याने डोळे फडफडण्याची शक्यता वाढते.
  • डोळ्यांची कोरडेपणा: डोळे कोरडे झाल्यास ते फडफडू शकतात.
  • पोषक तत्वांची कमतरता: शरीरात मॅग्नेशियमसारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्यास डोळे फडफडण्याची शक्यता असते.

जर डोळे वारंवार फडफडत असतील आणि काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे.

उपाय:

  • पुरेशी झोप घ्या.
  • तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा.
  • डोळ्यांना विश्रांती द्या.
  • आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer: या माहितीचा उद्देश फक्त सामान्य ज्ञानात भर घालणे आहे. कोणत्याही उपायाचा अवलंब करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1020

Related Questions

मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणती?
पायाच्या मांड्या का भरतात?
उंची कशी वाढते?
हातापायातली शक्ती गेल्यासारखं कधी आणि का वाटतं?
मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे परिणाम?
मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम काय आहेत?
मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे शरीरावरील शारीरिक आजार कोणते?