2 उत्तरे
2
answers
हातापायातली शक्ती गेल्यासारखं कधी आणि का वाटतं?
0
Answer link
हातापायातली शक्ती गेल्यासारखं कधी आणि का वाटतं
अशक्तपणा फक्त आजारी पडल्यावरच येतो असं तुम्हाला वाटतं का? अशक्तपणा म्हणजे हातापायाची शक्ती जाणं, अगदी गळून पडणं. पण हा अशक्तपणा केवळ शारीरिक कमतरतेमुळे येतो असे नाही तर याला मानसिक कारणं देखील असतात. रोजच्या आयुष्यात खूप काही घडत असतं. संकटं, अपयश यामुळे नकारात्मकता वाढीस लागते आणि त्यातूनच आपल्या हातापायाची शक्ती गेली, असं वाटायला लागतं. मात्र याला केवळ एवढीच कारणं पुरेशी आहेत का? अशी स्थिती होण्यामागे नक्की काय कारणं आहेत हे जाणून घेऊ या लेखातून.
१. आपल्या क्षमतेविरूध्द जाऊन काम करणे
प्रत्येक व्यक्ती आपली शक्ती, क्षमता ओळखून काम करत असते. मात्र बऱ्याच जणांना मी किती महान आहे किंवा मी काय काय करू शकतो हे दाखवून देण्याची एक प्रकारची सवय असते. त्यामुळे ते सतत आपल्या क्षमतेविरुद्ध जाऊन काम करताना दिसतात. यामुळे साहजिकच शरीरावर आणि पर्यायाने मनावर देखील अतिरिक्त ताण निर्माण होतो. शिवाय जर आपण जे ठरवलय ते झालं नाही तर दुसऱ्यांना काय वाटेल ही एक वेगळीच भीती मनात असते. या सगळ्या परिणामांचा विचार करून आणि आपण कमी लेखले जाऊ या विचाराने आपले हात-पाय गार पडतात. क्षमतेपेक्षा अधिक किंवा त्याच्या विरुध्द जाऊन काम करण्याने आपण ग्रेट ठरणार नाही आहोत, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. तसेच नेहमी आपली शक्ती, ताकद ओळखूनच काम करायला हवं.
२. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राशी जुळवून घेत नाही आहात
सगळ्यांचीच आपापली स्वप्नं, इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यालाच करिअर असं म्हटलं जातं. पैसे कमावणं हा सुद्धा एक करिअरचा भाग असतो. अनेक जणांना व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र काही कारणास्तव ते शक्य होत नाही. अशावेळी नोकरीचा पर्याय निवडला जातो. पण मग इच्छेविरुद्ध जाऊन काम करण्याचा देखील कंटाळा येतो. राग येतो, चिडचिड होते. त्याचाच उद्रेक म्हणून आपले हातपाय गळून पडतात. काम करण्याची उमेद देखील आपण गमावून बसतो. कारण मन मारून काम करण्यात काहीच अर्थ नसतो आणि आवडते कार्यक्षेत्र नसल्याने त्याच्याशी जुळवून घेणे अवघड होते. तेव्हा जे काम आपण करत आहोत ते आवडीने करायला हवे.
३. संभ्रमावस्थेत राहणं
गोंधळून जाणं ही अवस्था अनेक जणांची होते. काहीतरी अचानकपणे आयुष्यात घडतं आणि त्यातून आता बाहेर कसं पडावं हे कळायला मार्ग उरत नाही. कधी कधी अचानकपणे वैद्यकीय अडचण, पैशांची अडचण उद्भवते किंवा अजून अशा अनेक अडचणी येतात. त्यामुळे मनावर ताण येतो. थकवा जाणवतो. गोंधळात अडकल्याने आता पुढे काय करावे, कोणता मार्ग योग्य ठरेल, यातून आलेल्या परिस्थितीवर मात करता येईल की नाही अशी संभ्रमावस्था चालू होते. काहीच सुचेनासे होते आणि अशा स्थितीत कोणते पाऊल उचलेच आणि फसले तर अजूनच जास्त हातपाय गाळल्यासारखे होतात. त्यामुळे संभ्रमावस्थेत राहणे टाळायला हवे.
हातापायाची शक्ती जाणे ही अवस्था अगदी कोणाचीही होऊ शकते. मग यासाठी केवळ शारिरीक कारणेच कारणीभूत ठरतात असे नाही तर याला मानसिक कारणे देखील कारणीभूत ठरतात हे तुम्हाला कळलं असेलच. जेव्हा कधी तुमच्यावर अशी वेळ येईल तेव्हा घाबरून जाऊ नका. डोकं आणि मन स्थिर ठेवून आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करा, त्यावर मार्ग शोधा. नकारात्मकतेला दूर ठेवा आणि मग बघा तुमच्यात कसे बदल घडून येतील. हळूहळू हातापायातील शक्ती गमावण्याची समस्या तुमची मिटून जाईल आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे जाल. हे सगळं तर तुम्ही नक्की करालच .
0
Answer link
हातापायातली शक्ती गेल्यासारखं वाटण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- थकवा: जास्त शारीरिक श्रमामुळे किंवा पुरेसा आराम न मिळाल्याने थकवा येतो आणि त्यामुळे हात-पाय गळून गेल्यासारखे वाटू शकते.
- अशक्तपणा: शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास अशक्तपणा येतो. यामुळेही हात-पायांमध्ये ताकद नसल्यासारखे वाटते. विशेषत: लोहाची कमतरता (ॲनिमिया) हे याचे प्रमुख कारण असू शकते.
- कमी रक्तदाब (Low blood pressure): रक्तदाब कमी झाल्यास मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे चक्कर येणे आणि हात-पाय गळल्यासारखे वाटू शकते.
स्रोत: Mayo Clinic
- मधुमेह (Diabetes): रक्तातील साखरेची पातळी (blood sugar level) वाढल्यास किंवा कमी झाल्यास, दोन्ही परिस्थितीत हात-पायांमध्ये कमजोरी येऊ शकते.
- चिंता आणि तणाव: जास्त ताण घेतल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते आणि हात-पाय गळल्यासारखे वाटू शकते.
- औषधं: काही औषधांच्या सेवनाने साइड इफेक्ट्स (side effects) म्हणून अशक्तपणा येऊ शकतो.
- इतर वैद्यकीय कारणे: काही गंभीर वैद्यकीय समस्या जसे की थायरॉईड (thyroid) विकार, मल्टिपल स्क्लेरोसिस (multiple sclerosis), किंवा स्ट्रोक (stroke) मध्ये देखील हात-पायांमध्ये कमजोरी जाणवू शकते.
जर तुम्हाला वारंवार हात-पायात शक्ती नसल्यासारखे वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.