3 उत्तरे
3
answers
मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे परिणाम?
0
Answer link
मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
मोबाईल फोनद्वारे जे Electro magnetic radiation( EMFR) निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field (PEMF) मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.
सध्या मोबाइल हा जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्व जण वागत असतो. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या मोबाइलवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. पण कधी विचार केला आहे का की, या मोबाइलचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. या मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळय़ांचे अनेक आजार झालेले त्यामुळे पाहायला मिळतात. मोठय़ांपासून ते लहान मुलांपर्यंत सारेच जण याच्या अधीन होत चालले आहेत.
सुसंवादाची कमी : प्रत्यक्ष संवाद हा सगळ्यात उत्तम! समोरासमोर बसून संवाद साधल्याने संबंध चांगले राहतात,तसेच कुठल्याही समस्येचे निवारण लवकरात लवकर होते. पण, आजकाल मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे संवाद हा फारच कमी झालेला आहे. प्रवासात पण जेव्हा सगळे ग्रुपनी जातात,तेव्हा गप्पागोष्टींपेक्षा सगळेजण मोबाईलवरच व्यस्त असतात.
शारीरिक हालचाली कमी :
मोबाईलमुळे सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. तसेच, आळशीपणा पण वाढला आहे. शेजारच्या दुकानातून सामान आणायचे असल्यास फोन करून होमडिलीव्हरी द्वारे सामान मागविल्या जाते. अशा प्रकारे आळशीपणाचे जे दुष्परिणाम असतात, त्याद्वारे नुकसानच होते.
अतिरेक झोपेचे प्रमाण :
मोबाईल रेडिएशनचा वेग हा ८८४ Mh २ इतका असतो, त्यामुळे झोपेचे प्रमाण हे वाढतच जातं. जास्त झोपण्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होत नाही, तसेच संपूर्ण शरीरावर पण घातक परिणाम होतो.
एकाग्रतेचा अभाव :
सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शारीरिक तसेच मानसिक पण ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात व internet चा वापर करतात. त्यामुळे मुलांचे नापास होण्याचे प्रमाण हे वाढतच आहे.
ब्रेन ट्युमर :
सेलफोनचे जे electromagnetic रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असतो.
शरीराच्या तापमानात वाढ :
मोबाईल फोनमध्ये रेडिओ frequewncies चा बेस स्टेशनशी संवाद साधण्यासाठी वापर केला जातो.या rf रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होते, त्याचा वाईट परिणाम आपल्या ब्रेन व शरीरावर होतो.
अपघाताच्या प्रमाणात वाढ :
सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले तरीपण लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते व अपघाताच्या प्रमाणात वाढ होते.
तोंडाचा ट्युमर वाढण्याची शक्यता :
नुकत्याच झालेल्या मेडिकल सर्वेनुसार सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे mouth cancer ची शक्यता वाढते. त्यामुळे खूप आवश्यक असेल तेव्हाच फोनचा वापर करावा.
आणि यांसारखे अनेक दुष्परिणाम आहेत.
0
Answer link
मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- डोळ्यांवर ताण: सतत मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो, डोळे कोरडे पडतात आणि दृष्टी कमजोर होऊ शकते.
- मान आणि पाठीत दुखणे: मोबाईल वापरताना चुकीच्या पद्धतीने बसल्याने मान आणि पाठीत दुखण्याची समस्या वाढू शकते.
- बोटांना आणि मनगटांना त्रास: सतत टाईप केल्याने बोटांना आणि मनगटांना (Carpal Tunnel Syndrome) त्रास होऊ शकतो.
- झोप न येणे: रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने झोप उशिरा येते किंवा झोप व्यवस्थित लागत नाही.
- एकाग्रता कमी होणे: मोबाईलच्या सतत वापरामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.
- मानसिक आरोग्य समस्या: जास्त मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंता (Anxiety) आणि तणाव (Stress) वाढण्याची शक्यता असते.
- अपघात: मोबाईल वापरताना तो वापरणाऱ्या व्यक्तीचे रस्त्यावरील किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवरील लक्ष विचलित होते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
याव्यतिरिक्त, मोबाईलच्या अतिवापरामुळे लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या समस्यांचा धोकाही वाढू शकतो.
उपाय: मोबाईलचा वापर कमी करणे, नियमित व्यायाम करणे आणि योग्य आहार घेणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: