अन्न अन्न सुरक्षा आहार

अन्नभेसळ पडताळणी कशी करावी?

2 उत्तरे
2 answers

अन्नभेसळ पडताळणी कशी करावी?

0
अन्नधाण्यातील भेसळ,धान्या मध्ये माती, खडे, दगडाचा चुरा, गवत, तणाच्या बिया, किडके धान्य, इत्यादी मिसळले जातात. यात कधीकधी किडे, उंदराचे केस आणि लेंडया सापडतात. ही भेसळ डोळयांनी पाहून समजते. ही भेसळ आरोग्याला घातक आहे.
आटा, मैदा रवा यांमध्ये बारीक वाळू किंवा माती मिसळली जाते. हे डोळयांनी पाहून कळते.
रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो. लोहचुंबक फिरवून लोखंड वेगळे काढता येते.
पिठीसाखरेमध्ये खडूची पावडर मिसळली जाते. हे तपासण्यासाठी काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात थोडी साखर मिसळा. खडू असल्यास तो खाली तळाला साठतो. मिठामध्ये खडूची पावडर मिसळली जाते आणि त्यासाठी अशीच तपासणी करावी.


पिठीसाखरेत भेसळीसाठी धुण्याचा सोडा टाकला जातो. या नमुन्यावर सौम्य हायड्रोक्लोरीक आम्ल टाका.त्यातून बुडबुडे आल्यास या नमुन्यात धुण्याचा सोडा आहे असे समजावे.
चांदीचा वर्ख मिठाईमध्ये वापरला जातो. मात्र बरेच मिठाई कारखाने चांदीच्या वर्खाऐवजी ऍल्युमिनियमचा घातक वर्ख वापरतात. हे तपासण्यासाठी हा वर्ख वेगळा काढून ज्योतीमध्ये धरा. वर्ख चांदीचा असेल तर तो वितळून बारीक गोळा बनतो. मात्र ऍल्युमिनियमचा वर्ख जळून करडी काळी राख बनते.
मधामध्ये पाणी साखरपाणी मिसळले जाते. हे तपासण्यासाठी कापसाची एक वात मधात भिजवून ती काडीने पेटवा शुध्द मध छान जळतो. मात्र त्यात पाणी असेल तर वात पेटत नाही किंवा पेटताना चरचर असा पाण्याचा आवाज येतो.
कॉफीमध्ये चिकोरी हा पदार्थ मिसळला जातो. यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन ही कॉफीची पावडर त्यावर विखरा. कॉफी असल्यास ती पाण्यावर तरंगते. पण चिकोरी काही सेकंदातच तळाला जाते. चिकोरीचे बुडणारे कण बुडताना रंगाच्या रेषा दिसतात.
चहामध्ये इतर वनस्पतींची रंगीत पाने मिसळली जातात. पांढ-या कागदावर हा चहा घासल्यास इतर वनस्पतींना दिलेला रंग कागदावर दिसतो. केवळ चहा असल्यास कागदाला रंग लागत नाही.
चहामध्ये वापरलेली चहापत्ती मिसळली जाते. यासाठी एक फिल्टरपेपरवर 3-4 पाण्याचे थेंब टाकून त्यावर थोडी चहापूड टाकावी. चांगला चहा असल्यास त्यावर लाल-काळे डाग दिसतात. चहा वापरलेला असल्यास रंगीत डाग दिसत नाहीत.
तेलांमध्ये काही वेळी अर्जिमोनतेल मिसळले जाते. हे तपासण्यासाठी तेलाचा नमुना एका टेस्टटयुबमध्ये घेऊन त्यात तेवढचे नायट्रिक ऍसिड टाकून हळूहळू ढवळा. लालसर रंग आल्यास भेसळ आहे असे समजावे.
तेलामध्ये मिनरल ऑईल भेसळ करण्याची उदाहरणे आढळतात. यासाठी तेलाचा 2 मि.ली नमुना टेस्टटयूबमध्ये घेऊन त्यात एन-12 अल्कोहोलिक पोटॅश मिसळावे. ही टेस्टटयूब मिश्रण 15 मिनिटे गरम पाण्यात घालून त्यात 10 मि.ली. पाणी टाकावे. मिनरल ऑईल असेल तर मिश्रण गढूळ दिसते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,खाद्यतेलामध्ये एरंडेल तेल मिसळण्याचे प्रकार असतात. हे तपासण्यासाठी तेलाचा 1मि.ली. नमुना घेऊन त्यात 10 मि.ली. ऍसिडीफाईड पेट्रोलियम इथर टाकावे आणि ढवळावे. या टेस्टटयूबमध्ये अमोनियम मॉलिबडेटचे काही थेंब टाकावे. पांढरा गढूळ रंग आल्यास एरंडेल तेल मिसळले आहे असे समजावे.
लाल मिरचीच्या पावडरमध्ये रोडामिन मिसळले जाते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये लात तिखटाचे दोन ग्रॅम (अर्धा चमचा) नमुना घेऊन त्यावर 5 मि.ली. ऍसिटोन टाका. (मुली नेलपॉलिश काढण्यासाठी वापरतात तो द्राव ऍसिटोन असतो.) यातून ताबडतोब लाल रंग उठल्यास रोडामिन आहे असे समजा. लाल तिखटात काही वेळा विटकरीचा भुगा मिसळला जातो. यासाठी हे तिखट ग्लासभर पाण्यात टाका. विटकरीचा अंश वेगाने खाली जातो तर मिरचीचे तिखट पाण्यावर बराचवेळ तरंगते आणि हळूहळू खाली जाते.
हळदीमध्ये मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग मिसळला जातो. यासाठी या हळदीवर हायड्रोक्लोरिक आम्लाचे 4-5 थेंब टाका. या पदार्थात मेटॅलिन यलो पावडर असेल तर ताबडतोब रंग जांभळा होतो. यात थोडे पाणी टाकले तरी हा जांभळा रंग टिकून राहतो. ही त्याची खूण आहे.
हळदीमध्ये रंगीत भुसा किंवा खडूची पावडर मिसळली जाते. हा नमुना पाण्यात टाकल्यास खडूची पावडत तळाशी बसते व भुसा तरंगत राहतो. हळदीचा अंश पाण्यात मिसळून जातो.
मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग तुरडाळ, मुगडाळ किंवा चणाडाळीवरपण वापरला जातो. हे तपासण्यासाठी कोमट पाण्यात नमुन्याची डाळ टाका. हे पाणी वेगळे काढून त्यात वरील आम्लाचे 2-3 थेंब टाका. गुलाबी रंग आल्यास मेटॅलिक पावडर आहे असे समजावे.माहिती सेवा गृप 
हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्यांवर मॅलाचाईट ग्रीन हा घातक रंग टाकला जातो. यासाठी एक पांढरा टिपकागद घेऊन त्यावर थोडे पाणी टाकून ओला करा आणि भाजीचा नमुना त्यावर ठेवा. हिरवा रंग कागदावर उतरल्यास भेसळ आहे असे समजा.Ⓜ
काळया मि-यांमध्ये पपईच्या वाळलेल्या बिया मिसळल्या जातात. यासाठी हा नमुना मद्यार्कात टाका. काळी मिरी असतील तर ती खाली बसतात. मात्र पपईच्या बिया तरंगतात.
हिंगामध्ये पिवळया दगडाची पूड मिसळली जाते. हे तपासण्यासाठी पेलाभर पाण्यात हिंग पावडरीचा नमुना टाका. हिंग असेल तर तरंगतो. आणि दगडाची पूड असल्यास ती खाली बसते. (सूचना : शुध्द हिंग पाण्यात विरघळतो व पाण्याचा रंग पांढरा होतो. हिंग बनावट असेल तर असे होणार नाही)
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
0
अन्नभेसळ (Food adulteration) तपासण्यासाठी काही सोप्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत:

दुधात भेसळ:

  • पाणी: दुधात पाणी मिसळले आहे की नाही हे तपासण्यासाठी, दुधाचा एक थेंब एका सपाट पृष्ठभागावर टाका. शुद्ध दुधाचा थेंब हळू हळू खाली सरकतो आणि मागे पांढरा रंग सोडतो. भेसळयुक्त दुधाचा थेंब लवकर खाली सरकतो आणि रंग सोडत नाही.
  • स्टार्च: दुधात स्टार्च (starch) आहे का हे तपासण्यासाठी, थोडं दूध एका टेस्ट ट्यूब मध्ये घ्या आणि त्यात काही थेंब आयोडिन सोल्युशन (iodine solution) टाका. जर दुधाचा रंग निळा झाला तर त्यात स्टार्च आहे.

मधात भेसळ:

  • पाणी: मध शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी, एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात मध टाका. शुद्ध मध खाली तळाशी जमा होतो, तर भेसळयुक्त मध पाण्यात विरघळतो.
  • साखर: मध शुद्ध आहे का हे पाहण्यासाठी, मधमाशीच्या पोळ्यातील मेण (beeswax) घ्या आणि तो मधात टाका. जर मेण तरंगला तर मध शुद्ध आहे, अन्यथा त्यात साखरेची भेसळ आहे.

मिरची पावडरमध्ये भेसळ:

  • इंट भुकटी (brick powder): मिरची पावडरमध्ये भेसळ आहे का हे तपासण्यासाठी, एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात मिरची पावडर टाका. जर पावडर खाली जमा झाली आणि पाण्यावर तरंग आली, तर त्यात भेसळ आहे.

हळदीमध्ये भेसळ:

  • मेटॅनिल यलो (metanil yellow): एका टेस्ट ट्यूबमध्ये हळद घ्या, त्यात थोडं पाणी आणि काही थेंब हाइड्रोक्लोरिक ऍसिड (hydrochloric acid) टाका. जर रंग गुलाबी झाला, तर त्यात मेटॅनिल यलोची भेसळ आहे.

तूपामध्ये भेसळ:

  • वनस्पती तेल: तूप शुद्ध आहे का हे तपासण्यासाठी, एका टेस्ट ट्यूबमध्ये वितळलेले तूप घ्या आणि त्यात थोडं हाइड्रोक्लोरिक ऍसिड आणि साखर टाका. जर रंग लाल झाला, तर त्यात वनस्पती तेलाची भेसळ आहे.

साखरेमध्ये भेसळ:

  • खडू पावडर: साखरेमध्ये खडू पावडर मिसळली आहे का हे तपासण्यासाठी, साखर पाण्यात विरघळवा. जर खडू पावडर असेल तर ती खाली जमा होते.
इतर काही महत्वाचे मुद्दे:
  • भेसळयुक्त अन्नपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
  • अन्नपदार्थ खरेदी करताना नेहमी विश्वसनीय दुकानदारांकडूनच खरेदी करा.
  • Food Safety and Standards Authority of India (FSSAI) च्या नियमांनुसार अन्नपदार्थ खरेदी करा. FSSAI
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

कोणता किराणा वजन विचारानुसार रक्षण करतो?
भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?
दमट हवेतील धान्याला बुरशी लागली?
हवाबंद डब्यातील/पिशव्यांमधील पदार्थ विकत घेताना तुम्ही कोणती दक्षता घ्यायला पाहिजे?
आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे, तुम्ही आईला काय सांगाल?
अनेक प्रकारची फळे केमिकलने पिकवलेली असतात, ज्यामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. पण यावर अन्न भेसळ प्रशासन (FSSAI) ॲक्शन का घेत नाही?
भेसळयुक्त तेल खाल्ल्याने काय होते?