Topic icon

अन्न सुरक्षा

0

तुम्ही "जीएम दारू बटर खाल्ल्यानंतर किती दिवस सुरक्षित राहते?" असे विचारले आहे. 'खाल्ल्यानंतर' म्हणजे ते सेवन केल्यावर, त्यामुळे खाल्ल्यानंतर ते सुरक्षित राहण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते पोटात जाते. कदाचित तुमचा उद्देश "जीएम दारू बटर किती दिवस खाण्यासाठी सुरक्षित राहते?" किंवा "एकदा उघडल्यानंतर जीएम दारू बटर किती दिवस सुरक्षित राहते?" असे विचारण्याचा असावा.

जीएम दारू बटर (GM Daru butter) या विशिष्ट ब्रँडच्या बटरची अचूक मुदत (शेल्फ लाइफ) तपासण्यासाठी, तुम्हाला उत्पादनाच्या पॅकेजिंगवरील 'बेस्ट बाय' किंवा 'एक्सपायरी' तारीख तपासणे आवश्यक आहे. प्रत्येक उत्पादनाची मुदत थोडी वेगळी असू शकते.

तरीही, सर्वसाधारणपणे बटरच्या सुरक्षिततेबद्दल खालीलप्रमाणे माहिती दिली जाऊ शकते:

  • न उघडलेले बटर (फ्रीजमध्ये): सीलबंद, न उघडलेले बटर फ्रीजमध्ये 1 ते 3 महिने सुरक्षित राहू शकते.
  • उघडलेले बटर (फ्रीजमध्ये): एकदा पॅक उघडल्यानंतर, ते हवाबंद डब्यात किंवा त्याच्या मूळ रॅपरमध्ये व्यवस्थित गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 ते 3 आठवडे चांगले टिकते. काहीवेळा ते 1 महिना देखील टिकू शकते, परंतु चव आणि ताजेपणा टिकवण्यासाठी लवकर वापरणे चांगले.
  • बटर (फ्रीजरमध्ये): बटर गोठवून ठेवल्यास (फ्रीझ केल्यास) त्याची मुदत खूप वाढते. ते 6 ते 9 महिने, काहीवेळा 1 वर्षापर्यंतही चांगले राहू शकते. वापरण्यापूर्वी ते फ्रीजमध्ये किंवा खोलीच्या तापमानाला हळूहळू वितळू द्यावे.

बटर खराब झाल्याची चिन्हे:

  • रंग बदलणे (पिवळसर किंवा गडद होणे).
  • आंबट किंवा दुर्गंधी येणे.
  • वरच्या थरावर बुरशी (फंगस) दिसणे.

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही चिन्हे दिसली, तर बटर खाणे टाळावे.

उत्तर लिहिले · 23/3/2026
कर्म · 5040
0

वजन विचारानुसार रक्षण करणारे काही किराणा सामान खालील प्रमाणे:

  • धान्ये: गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी (Gahu, Tandul, Jwari, Bajri)
  • डाळी: तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ (Tur Dal, Mug Dal, Masur Dal, Udid Dal)
  • तेल: शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल (Shengdana Tel, Surful Tel, Soyabin Tel)
  • साखर: साखर (Sakhar)

हे सर्व पदार्थ वजनानुसार साठवले जातात आणि त्यांची विक्री करताना वजन वापरले जाते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5040
0
भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत ? उत्तर : भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते.
उत्तर लिहिले · 13/1/2022
कर्म · 2380
0
ढदडदतद
उत्तर लिहिले · 14/8/2021
कर्म · 0
0
हवाबंद डब्यातील पिशव्यांमधील पदार्थ विकत घेताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल:
उत्तर लिहिले · 16/7/2021
कर्म · 5
0
अन्नधाण्यातील भेसळ,धान्या मध्ये माती, खडे, दगडाचा चुरा, गवत, तणाच्या बिया, किडके धान्य, इत्यादी मिसळले जातात. यात कधीकधी किडे, उंदराचे केस आणि लेंडया सापडतात. ही भेसळ डोळयांनी पाहून समजते. ही भेसळ आरोग्याला घातक आहे.
आटा, मैदा रवा यांमध्ये बारीक वाळू किंवा माती मिसळली जाते. हे डोळयांनी पाहून कळते.
रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो. लोहचुंबक फिरवून लोखंड वेगळे काढता येते.
पिठीसाखरेमध्ये खडूची पावडर मिसळली जाते. हे तपासण्यासाठी काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात थोडी साखर मिसळा. खडू असल्यास तो खाली तळाला साठतो. मिठामध्ये खडूची पावडर मिसळली जाते आणि त्यासाठी अशीच तपासणी करावी.


पिठीसाखरेत भेसळीसाठी धुण्याचा सोडा टाकला जातो. या नमुन्यावर सौम्य हायड्रोक्लोरीक आम्ल टाका.त्यातून बुडबुडे आल्यास या नमुन्यात धुण्याचा सोडा आहे असे समजावे.
चांदीचा वर्ख मिठाईमध्ये वापरला जातो. मात्र बरेच मिठाई कारखाने चांदीच्या वर्खाऐवजी ऍल्युमिनियमचा घातक वर्ख वापरतात. हे तपासण्यासाठी हा वर्ख वेगळा काढून ज्योतीमध्ये धरा. वर्ख चांदीचा असेल तर तो वितळून बारीक गोळा बनतो. मात्र ऍल्युमिनियमचा वर्ख जळून करडी काळी राख बनते.
मधामध्ये पाणी साखरपाणी मिसळले जाते. हे तपासण्यासाठी कापसाची एक वात मधात भिजवून ती काडीने पेटवा शुध्द मध छान जळतो. मात्र त्यात पाणी असेल तर वात पेटत नाही किंवा पेटताना चरचर असा पाण्याचा आवाज येतो.
कॉफीमध्ये चिकोरी हा पदार्थ मिसळला जातो. यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन ही कॉफीची पावडर त्यावर विखरा. कॉफी असल्यास ती पाण्यावर तरंगते. पण चिकोरी काही सेकंदातच तळाला जाते. चिकोरीचे बुडणारे कण बुडताना रंगाच्या रेषा दिसतात.
चहामध्ये इतर वनस्पतींची रंगीत पाने मिसळली जातात. पांढ-या कागदावर हा चहा घासल्यास इतर वनस्पतींना दिलेला रंग कागदावर दिसतो. केवळ चहा असल्यास कागदाला रंग लागत नाही.
चहामध्ये वापरलेली चहापत्ती मिसळली जाते. यासाठी एक फिल्टरपेपरवर 3-4 पाण्याचे थेंब टाकून त्यावर थोडी चहापूड टाकावी. चांगला चहा असल्यास त्यावर लाल-काळे डाग दिसतात. चहा वापरलेला असल्यास रंगीत डाग दिसत नाहीत.
तेलांमध्ये काही वेळी अर्जिमोनतेल मिसळले जाते. हे तपासण्यासाठी तेलाचा नमुना एका टेस्टटयुबमध्ये घेऊन त्यात तेवढचे नायट्रिक ऍसिड टाकून हळूहळू ढवळा. लालसर रंग आल्यास भेसळ आहे असे समजावे.
तेलामध्ये मिनरल ऑईल भेसळ करण्याची उदाहरणे आढळतात. यासाठी तेलाचा 2 मि.ली नमुना टेस्टटयूबमध्ये घेऊन त्यात एन-12 अल्कोहोलिक पोटॅश मिसळावे. ही टेस्टटयूब मिश्रण 15 मिनिटे गरम पाण्यात घालून त्यात 10 मि.ली. पाणी टाकावे. मिनरल ऑईल असेल तर मिश्रण गढूळ दिसते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,खाद्यतेलामध्ये एरंडेल तेल मिसळण्याचे प्रकार असतात. हे तपासण्यासाठी तेलाचा 1मि.ली. नमुना घेऊन त्यात 10 मि.ली. ऍसिडीफाईड पेट्रोलियम इथर टाकावे आणि ढवळावे. या टेस्टटयूबमध्ये अमोनियम मॉलिबडेटचे काही थेंब टाकावे. पांढरा गढूळ रंग आल्यास एरंडेल तेल मिसळले आहे असे समजावे.
लाल मिरचीच्या पावडरमध्ये रोडामिन मिसळले जाते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये लात तिखटाचे दोन ग्रॅम (अर्धा चमचा) नमुना घेऊन त्यावर 5 मि.ली. ऍसिटोन टाका. (मुली नेलपॉलिश काढण्यासाठी वापरतात तो द्राव ऍसिटोन असतो.) यातून ताबडतोब लाल रंग उठल्यास रोडामिन आहे असे समजा. लाल तिखटात काही वेळा विटकरीचा भुगा मिसळला जातो. यासाठी हे तिखट ग्लासभर पाण्यात टाका. विटकरीचा अंश वेगाने खाली जातो तर मिरचीचे तिखट पाण्यावर बराचवेळ तरंगते आणि हळूहळू खाली जाते.
हळदीमध्ये मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग मिसळला जातो. यासाठी या हळदीवर हायड्रोक्लोरिक आम्लाचे 4-5 थेंब टाका. या पदार्थात मेटॅलिन यलो पावडर असेल तर ताबडतोब रंग जांभळा होतो. यात थोडे पाणी टाकले तरी हा जांभळा रंग टिकून राहतो. ही त्याची खूण आहे.
हळदीमध्ये रंगीत भुसा किंवा खडूची पावडर मिसळली जाते. हा नमुना पाण्यात टाकल्यास खडूची पावडत तळाशी बसते व भुसा तरंगत राहतो. हळदीचा अंश पाण्यात मिसळून जातो.
मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग तुरडाळ, मुगडाळ किंवा चणाडाळीवरपण वापरला जातो. हे तपासण्यासाठी कोमट पाण्यात नमुन्याची डाळ टाका. हे पाणी वेगळे काढून त्यात वरील आम्लाचे 2-3 थेंब टाका. गुलाबी रंग आल्यास मेटॅलिक पावडर आहे असे समजावे.माहिती सेवा गृप 
हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्यांवर मॅलाचाईट ग्रीन हा घातक रंग टाकला जातो. यासाठी एक पांढरा टिपकागद घेऊन त्यावर थोडे पाणी टाकून ओला करा आणि भाजीचा नमुना त्यावर ठेवा. हिरवा रंग कागदावर उतरल्यास भेसळ आहे असे समजा.Ⓜ
काळया मि-यांमध्ये पपईच्या वाळलेल्या बिया मिसळल्या जातात. यासाठी हा नमुना मद्यार्कात टाका. काळी मिरी असतील तर ती खाली बसतात. मात्र पपईच्या बिया तरंगतात.
हिंगामध्ये पिवळया दगडाची पूड मिसळली जाते. हे तपासण्यासाठी पेलाभर पाण्यात हिंग पावडरीचा नमुना टाका. हिंग असेल तर तरंगतो. आणि दगडाची पूड असल्यास ती खाली बसते. (सूचना : शुध्द हिंग पाण्यात विरघळतो व पाण्याचा रंग पांढरा होतो. हिंग बनावट असेल तर असे होणार नाही)
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498