घर
कुटुंब
स्वभाव
क्रोध
मानसिक स्वास्थ्य
जर घरातील लोक एका क्षुल्लक गोष्टीवर ४५ मिनिटे व्याख्यान देत असतील व आपण काही बोललो तर विषय वाढत असेल, अशा वेळी स्थिती कशी संभाळावी? राग कसा नियंत्रित करावा?
2 उत्तरे
2
answers
जर घरातील लोक एका क्षुल्लक गोष्टीवर ४५ मिनिटे व्याख्यान देत असतील व आपण काही बोललो तर विषय वाढत असेल, अशा वेळी स्थिती कशी संभाळावी? राग कसा नियंत्रित करावा?
5
Answer link
संताप ही नैसर्गिक भावना आहे. पण योग्य ठिकाणी व्यक्त झाली तर चांगली आहे राव!! नाहीतर वर्षानुवर्षे जोपासलेली नाती संतापामुळे क्षणात तुटतात. अनेकदा तर संतापामुळे लग्ने तुटल्याचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याचवेळा भावना कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते आणि संताप उफाळून येतो. आणि मग तुमचा कबीर सिंग होतो. काहीवेळा तर् दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपणच जास्त बोलून बसतो.
असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरुन येतात, पण जिभेने झालेल्या कधीच भरुन येत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप काळ राहतो. परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
जर तुम्हाला तुमचे घरचे विणकर बोलत असल्याची फिलिंग येत असेल तर तसे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा. मनात भावना कोंडल्या गेल्या तर त्याचा उद्रेक संतापाच्या रूपात होतो. अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला संताप पण येत नाही. संताप आल्यावर कुणी तुम्हाला असा काही सल्ला देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे । राग यायला लागल्यावर शांतपणे स्वतःचे आत्मपरिक्षण करायला हवे. इतका राग का येत आहे या मागील कारणाचा शोध घ्यायला हवा. रागराग करणे खरेच गरजेचे आहे का?
जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशावेळी त्या ठिकाणावर निघून बाहेर फिरायला जाणे तुम्हांला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकते. भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस खूप लवकर शांत होतो.

0
Answer link
अशा परिस्थितीत तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- शांत राहा: सर्वप्रथम, स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या की या क्षणी शांत राहणे महत्त्वाचे आहे.
- ऐका: दुसरे काय बोलत आहे हे शांतपणे ऐका. मध्ये बोलू नका. त्यांना त्यांचे विचार पूर्णपणे व्यक्त करू द्या.
- सहमती दर्शवा: जर तुम्हाला काही मुद्द्यांवर सहमत असेल, तर ते सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणू शकता, "मला तुमचा मुद्दा समजला" किंवा "तुम्ही जे म्हणत आहात, त्यात तथ्य आहे."
- प्रश्न विचारा: जर तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट करायच्या असतील, तर प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्याने गैरसमज टळू शकतात आणि चर्चा सकारात्मक दिशेने जाऊ शकते.
- नम्रपणे असहमत व्हा: जर तुम्ही असहमत असाल, तर नम्रपणे आपले मत व्यक्त करा. "मला असे वाटते की..." किंवा "माझ्या दृष्टीने..." अशा वाक्यांचा वापर करा.
- विषय बदला: जर तुम्हाला चर्चा खूपच नकारात्मक दिशेने जात आहे असे वाटले, तर विषय बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणू शकता, "मला माफ करा, पण आपण यावर नंतर बोलू शकतो का? मला आता दुसरे महत्त्वाचे काम आहे."
- दूर राहा: जर तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण वाटत असेल, तर काही वेळासाठी त्या ठिकाणाहून दूर राहा.
- श्वासोच्छ्वास व्यायाम: दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
- ध्यान: नियमित ध्यान केल्याने मन शांत राहते.
- शारीरिक व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो.
- वेळेचे व्यवस्थापन: वेळेचे योग्य नियोजन करा.
- सकारात्मक विचार: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
टीप: जर तुम्हाला राग नियंत्रित करणे खूप कठीण वाटत असेल, तर तुम्ही व्यावसायिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.